परमेश्वर एक आहे

Print Friendly, PDF & Email
परमेश्वर एक आहे

एकदा एक पर्शियाचा, अरबस्तानचा, तुर्कस्तानचा आणि ग्रीसचा अशी चार माणसे खेडेगावातील रस्त्यावर उभी होती. ते एकत्र दूरच्या प्रवासाला निघाले होते. त्यांच्याजवळ एकच नाणे शिल्लक राहिले होते आणि प्रत्येकाला त्याच्या इच्छेनुसार ते खर्च करायचे होते, आणि त्यावरून त्यांचा वाद चालला होता.

पर्शियन म्हणाला, “मला अंगूर विकत घ्यायचे आहेत!” अरब म्हणाला, “इनाब!” तुर्क म्हणाला, “नाही! आपण यातून उझम विकत घेऊ या.” ग्रीक ओरडला, “मुळीच नाही. आपण या पैशांनी स्टॅफिल घेऊ या.” एका चतुर वाटसरुने त्यांचा वाद ऐकला. त्याला त्यांच्या सर्वांच्या भाषा कळत होत्या. तो म्हणाला, “मला पैसे द्या, मी सर्वांची इच्छा पूर्ण करतो.” प्रथम त्यांचा विश्वास बसला नाही, पण नंतर त्यांनी त्याला ते नाणे दिले. त्या माणसाने फळवाल्याकडून त्या पैशांनी द्राक्षांचे चार घोस विकत घेतले. पर्शियन म्हणाला, “ही माझी अंगूर,” तुर्क म्हणाला,”यालाचा मी उझम म्हणतो.” तेवढ्यात अरब म्हणाला ,”तुम्ही मला इनाब दिलीत “. ग्रीक म्हणाला,” माझ्या भाषेत ही स्टॅफिल आहेत!” मग त्यांच्या लक्षात आले की त्यांना एकमेकांच्या भाषा कळत नसल्याने ते भांडत होते.

[Illustrations by A.Jeyanth, Sri Sathya Sai Balvikas Student]

(“स्पिरिच्युअल सायन्स पुस्तक ३” वर आधारित )

“हे दिव्यात्मस्वरूपांनो! इथे आल्यावर फक्त एकच गोष्ट तुम्हा सर्वांसाठी जीवनावश्यक आहे. हे तुम्ही ओळखावे आणि समजून घ्यावे. प्रजाती, धर्म, जात, पंथ हे सर्व भेद विसरून,वर्ग आणि जमातींच्या विचारांकडे दुर्लक्ष करून, तुम्हाला ही जाणीव व्हायला हवी की तुम्ही त्या एका परमेश्वराचे’ पुत्र आहात”.

(भगवान बाबांचा दिव्य संदेश ,२० ऑक्टोबर १९८८)

GOD IS ONE

खरे आहे- परमेश्वर एकच आहे आणि आपण सर्व त्या एका परमेश्वराची मुले आहोत. गाई अनेक रंगाच्या असल्या तरी दुधाचा रंग एकच असतो. चांदण्या अनेक असतात ,परंतु आकाश एकच आहे. राष्ट्रे अनेक पण धरती एक. तसेच देव एक आहे.

एकम सत् -विप्रा बहुधा वदन्ति, असे वेदात म्हटले आहे. “सत्य एक आहे,ज्ञानी त्याला विविध नावे देतात.”

“मुस्लिम त्याला अल्लाह म्हणून पुजतात,
ख्रिश्चन धर्मीय त्याला ‘जेहोवा ‘ म्हणतात,
विष्णूचे भक्त कमल नयन प्रभू म्हणतात,
शिवभक्तांसाठी तो ‘शम्भू’ आहे,
कोणत्याही मार्गाने त्याला पूजले ,तरी तो आनंदाने साद देतो,
आणि आनंदाचा वर्षाव करतो
तो एक आहे,
तोच आहे परमात्मा “

असे आपले प्रिय भगवान श्री सत्यसाईबाबा म्हणतात.

धर्म भेदाभेद शिकवत नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: