ज्यांना आत्मविश्वास आहे त्यांच्यावरच ईश्वर प्रेम करतो

Print Friendly, PDF & Email
ज्यांना आत्मविश्वास आहे त्यांच्यावरच ईश्वर प्रेम करतो

Thenali meets the sage

वेदातील अतिशय पवित्र आणि प्रसिद्ध मंत्र म्हणजे ‘गायत्री’. सर्व प्रकाशाचे जे उगमस्थान आहे त्याची बुद्धीला उत्तेजित करण्यासाठी कृपा मिळविण्याचा प्रयत्न हा मंत्र करतो. आपली बुद्धी तीव्र असेल तर निसर्गातील एकत्वाचा अनुभव आपण घेऊ शकतो.

आंध्र प्रदेशातील प्रसिद्ध कवी, विनोदी वक्ता आणि तत्त्वज्ञ तेनाली रामकृष्ण एकदा घनदाट जंगलभागातून जात असताना रस्ता चुकला. इ. स. १५०० मध्ये विजयनगरच्या साम्राज्यातील राजा कृष्णदेवरायाच्या काळात तो होता. तो राजसभेशी संबंधित असून एक हुशार आणि हजरजबाबी मंत्री म्हणून त्याला सर्व मान देत. तो हताशपणे जंगलात भटकत असताना त्याने एक वृद्ध साधू पाहिला. रामकृष्ण त्याच्याकडे धावत गेला आणि नम्र अभिवादन करून त्याच्या पाया पडला. आपण त्या घनदाट जंगलात रस्ता चुकल्याचे त्याने सांगितले. तो साधू म्हणाला – “ज्या अद्भुत शक्तीने तुला येथे आणले आहे त्याच शक्तीने मलाही या ठिकाणी आणले आहे. जे शरीर मी इतके दिवस धारण केले ते टाकूनदेण्याचा क्षण आता आला आहे. माझा ताईत आणि संपत्ती म्हणून इतकी वर्षे म्हटलेल्या मंत्राची मी तुला दीक्षा देतो.’ तो कालीमातेचा मंत्र होता. तो त्याने रामकृष्णाच्या कानात सांगितला.

ही मोठीच भेट मिळाल्याने रामकृष्णाला अत्यानंद झाला. तो त्या घनदाट जंगलातून मधल्या वाटेने कालीमातेच्या मंदिराकडे धावला. आणि त्या महामंत्राचा जप करून तो कालीमातेच्या ध्यानात मग्न झाला. एकदा मध्यरात्री त्या जंगलाचा प्रमुख आदिवासी कोया त्या मंदिरात आला. कालीमातेला प्रसन्न करून तिची पूजा करण्यासाठी त्याने एक बकरा बळीबकरा बळी देण्यासाठी आणला होता. रामकृष्ण त्या मूर्तीच्या मागे लपला. जेव्हा सुरा बळीच्या मानेवर अगदी पडण्याच्या बेतात होता त्यावेळी तो (रामकृष्ण) उद्गारला – “तुझ्यासकट सर्व सजीवांची मी माता आहे. जर तू माझ्या बाळाला मारलेस तर मी तुझ्यावर प्रसन्न न होता उलट तुला शाप देईन.” कालीमाताच बोलली अशा विश्वासाने तो कोया थांबला आणि निघून गेला.

Menifestation of Kali before Thenali

नंतर कालीमाता रामकृष्णासमोर प्रकट झाली. तिने त्याला हवा तो वर मागण्याबाबत सांगितले. ती त्याच्या साधनेने संतुष्ट झाली होती. एका हातात दहीभाताची आणि दुसऱ्या हातात दूधभाताची थाळी घेऊन ती म्हणाली “यातली तुला कोणती हवी?” कोणत्याही एका थाळीतला भात खाण्यापूर्वी त्याचा परिणाम काय होईल हे जाणण्याची त्याची इच्छा होती. तिने उत्तर दिले. – “दही भाताने तुला संपत्ती आणि वैभव मिळेल तर दूधभाताने तू अशिय हुशार पंडीत होशील. तेव्हा आता तूच निवड कर!” रामकृष्णाने स्वतःशी विचार केला – “भली मोठी संपत्ती घेऊन पण मूर्ख म्हणून राहणे बरे नाही.” तो हुशार माणूस होता. त्याने आणखी एक प्रश्न विचारला – “माझ्यासमोर दोन थाळ्या आहेत मी त्यांतली एक निवडण्यापूर्वी प्रत्येकाची चव कशी आहे ते मला सांग पाहू!” देवी हसली आणि म्हणली – “मी चव कशी सांगणार आणि त्यांतला फरक तरी कसा सांगणार? तू स्वतःच दोन्हीची चव घेऊन बघ.” आणि तिने दोन्ही थाळ्या त्याला दिल्या.

हुशार रामकृष्णाने घाईघाईने त्या दोन्ही थाळ्या घेऊन थाळ्यातील दूध, दही भात एकदम तोंडात घालून गिळून टाकला! कालीमातेला दुःख झाले. ती म्हणाली की त्याच्या उतावळेपणाची त्याला मोठी शिक्षा भोगावी लागेल. रामकृष्णाने आपली चूक कबुल केली आणि ती सां गेल ती शिक्षा भोगायला तयार असल्याचे सांगितले. पण बाळाचे वर्तन दोषास्पद असले तरी आईच्या शिक्षेने त्याच्यावर वाईट परिणाम होतो का? कालीमाता म्हणाली- माझी वाणी तुझे रक्षणच करील, दुःख करू नकोस.” नंतर असे म्हणाली की “बिकट कवी हो” म्हणजे “हुशार विनोदी वक्ता (विदुषक) हो!” राजसभेत छाप पाडून संपत्ती संपादन करून ज्यांना उपदेशाची जरूर असेल त्यांना योग्य मार्गदर्शन कर.”

योग्य शब्द घालून गाळलेल्या जागा भरा
  1. रामकृष्ण —— च्या प्रांगणात रहात असत.
  2. त्यांना ——-चा मंत्र दिला होता.
  3. दैवी मातेने दिलेल्या पेल्यांमध्ये ——- होते.
  4. रामकृष्णांनी ——- मागितले.
  5. रामकृष्ण ——- म्हणून ओळखले जातात

[Source – Stories for Children – II
Published by – Sri Sathya Sai Books & Publications Trust, Prashanti Nilayam]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: