शीर्षक – भव्य घोषणा

Print Friendly, PDF & Email
शीर्षक – भव्य घोषणा
उद्दिष्ट:

मुलांची कल्पनाशक्ती जागृत करण्याचा एक नवीन उपक्रम

संबंधित मूल्ये

कल्पनाशक्ती

जिज्ञासू वृत्ती

प्रशंसा

साहित्य:
  1. एक भांडे
  2. जर मी फुल (पुष्प) असतो तर मला… आवडले असते अशा प्रकारची वाक्ये लिहून तयार केलेल्या चिठ्ठ्या (वाक्यांच्या संदर्भातील इतर उदा. रामायण, महाभारत, संत, थोर व्यक्तिमत्त्वे, वृक्ष, पूजेचे उपकरण, पंचतत्त्वे, पशु-पक्षी)
  3. संगीत/भजन
गुरुंसाठी पूर्वतयारी:

काही नाही

खेळ कसा खेळावा
  1. गुरूंनी मुलांना गोल करून बसण्यास सांगावे.
  2. मुलांना खेळ कसा खेळायचा ते गुरुंनी समजावून सांगावे.
  3. भजन वा संगीत सुरू करावे
  4. चिठ्ठ्या असलेले भांडे एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे फिरवण्यास सांगावे.
  5. संगीत / भजन थांबल्यावर ज्या मुलांच्या हातात चिठ्यांचे भांडे असेल त्याने त्यातील एक चिठ्ठी उचलावी.
  6. उदा. 1 त्या चिठ्ठीवर जर ‘फुल’ हा शब्द लिहिलेला असेल तर तो मुलगा म्हणू शकतो, “जर मी फूल असतो तर मला कमळ व्हायला आवडले असते कारण ते आपले राष्ट्रीय पुष्प आहे”
  7. उदा. 2 चिठ्ठीवर जर पूजेचे उपकरण असे लिहिले असेल तर तू मुलगा म्हणू शकतो, “जर मी पूजेचे उपकरण असतो तर मला दीप व्हायला आवडले असते कारण तो त्याच्या आजूबाजूरला प्रकाशमान करतो.”
  8. अशाप्रकारे सर्व चिठ्ठ्या संपेपर्यंत आणि प्रत्येक मुलास त्याच्या कल्पनाशक्ती वाव देण्याची संधी मिळेपर्यंत हा खेळ सुरू ठेवावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *