कृतज्ञता

Print Friendly, PDF & Email

कृतज्ञता

कृतज्ञता हा एक दैवी गुण आहे आणि स्वामींच्या असंख्य कृतींमधून तो आपण पाहतो.

अनेक वर्षांपूर्वी स्वामी त्यांच्या भक्तसमुदायाबरोबर’ हॉर्सली हिल्सवर मुक्कामास गेले होते.

हे नयनरम्य स्थळ समुद्रासपाटी पासून ३८०० फूट उंचीवर वसले आहे.

टेकड्यांमध्ये वसलेल्या एका ठिकाणी त्यांनी तळ ठोकला होता. व त्या जागी फक्त जीपने जाणे शक्य होते. त्याच्यामुळे गावकऱ्यांना टेकड्यांच्या तळाशी असलेल्या छोट्या खेड्यांमधून अन्न धान्य व पिण्याचे पाणी वरती आणावे लागे. बंगल्यावरील एका म्हशीच्या पाठीवर पाण्याने भरलेल्या पखाली ठेवून वर पाठवल्या जात होत्या. त्यासाठी त्या म्हशीला दिवसभरात अनेक फेऱ्या कराव्या लागत.

बाबांच्या मधुर ज्ञानामृताचे श्रवण करत त्यांच्या दिव्य सान्निध्यात व्यतीत केलेल्या त्या आनंददायी व शांतीपूर्ण दिवसांचा सर्वांनी आनंद लुटला.

परत जाते वेळी बाबांनी सुचवले की ते सर्वजण एकत्रितपणे चालत खाली उतरतील. अचानक ते थांबले व म्हणाले,” मी दोन मिनिटात जाऊन परत येतो. मला त्या महत्त्वाच्या जीवाचा निरोप घेतला पाहिजे “काही भक्त गुपचुप बाबांच्या मागोमाग गेले. आणि त्यांनी, बाबा, त्या’ महाशिचा निरोप घेतल्याचे पाहिले! त्यांनी प्रेमाने तिच्या पाठीवर थोपटले व म्हणाले, “तू माझी खूप चांगली सेवा केलीस बंगारू!” (बंगारू ही अत्यंत प्रेमासाठी वापरण्याची संज्ञा आहे. त्याचा अर्थ सुवर्ण)

अगदी छोट्यातल्या छोट्या सेवाकार्याची बाबा दखल घेतात व त्याचे कौतुक करतात.

[Source : Lessons from the Divine Life of Young Sai, Sri Sathya Sai Balvikas Group I, Sri Sathya Sai Education in Human Values Trust, Compiled by: Smt. Roshan Fanibunda]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *