कृतज्ञता

Print Friendly, PDF & Email
कृतज्ञता
माझ्याकडे असणाऱ्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञ भाव असायला हवा.

वैश्विक प्रकाशाचे मनामधील काल्पनिक दृश्य

(दोन पॅरेग्राफ आणि बिंदूंमध्ये विराम) त्यानंतर खालील प्रमाणे कृती करावी.

१)  “प्रथम, सुखकारक स्थितीमध्ये खुर्चीवर किंवा जमिनीवर मांडी घालून बसा. तुमचा पाठीचा कणा ताठ ठेवा आणि डोकं सरळ ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या आणि श्वास सोडताना, शरीर सैल सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या…… आणि अजून एक……”

२) आता शरीरामधील सर्व ताण बाहेर काढून टाका. तुमची बोटे ओढा आणि नंतर सैल सोडा. पोटरीचे स्नायू आवळून त्यांना ताण द्या आणि नंतर शिथिल करा. तुमच्या पायाचा वरच्या भागातील आणि मांड्यांच्या स्नायूंना ताण द्या आणि शिथिल करा. तुमचा पोटाचे स्नायू आत ओढून घ्या आणि नंतर शिथिल करा. तुमचे खांदे मागे ओढून धरा आणि नंतर शिथिल करा. तुमचे खांदे खाली आणि वर करा. डावीकडे पाहा, समोर पाहा, उजवीकडे पाहा, समोर पाहा. तुमचा चेहऱ्याचा स्नायूंना ताण द्या आणि नंतर शिथिल करा. तुमचे संपूर्ण शरीर तणावमुक्त झाल्याचे तुम्हाला जाणवेल. तुमच्या शरीरातील सर्व ताणतणाव नाहीसा झाला असेल.

Step 3 : कल्पना करा तुम्ही समुद्रकिनाऱ्यावर पायी फिरत आहात…

सूर्याची उब आणि गालांना स्पर्श करून जाणाऱ्या वाऱ्याच्या मंद झुळूकींची अनुभूती घ्या…

तुमच्या पायाखालील मऊशार, उबदार वाळूची अनुभूती घ्या.

तेथील प्रत्येक सुंदर गोष्ट पाहून तुम्ही आनंदित होता…

किनाऱ्यावर हळुवारपणे येणाऱ्या लाटा पाहा… तुमच्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट सुंदर आहे…

तुमच्याकडे असणाऱ्या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला आनंद देतात, त्याचा विचार करा.

तुम्ही असा सर्व गोष्टींचा विचार करा ज्या तुम्हाला आनंदी बनवतात ज्यांच्यासाठी पैसा खर्च करावा लागत नाही वा विश्वातील साधन संपत्तीचा वापर करावा लागत नाही…

अशा लोकांचा विचार करा जे तुमच्यावर प्रेम करतात — तुमचे कुटुंब, तुमचे मित्र, तुमचे गुरु…

हे सर्व प्रेम आणि तुमच्या जीवनातील सुंदर गोष्टींविषयी कृतज्ञता बाळगा…

तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल आनंद माना आणि कृतज्ञ भाव ठेवा…

४) आता तुमचे लक्ष पुन्हा वर्गामध्ये आणा, डोळे उघडा आणि ताण द्या. हा सराव करून झाल्यानंतर तुमच्या शेजारी बसलेल्या व्यक्तीकडे बघून स्मितहास्य करा.

‘सत्य साई मानवी मूल्य शिक्षण’ या पुस्तकातून (प्रकाशक: BISSE Limited)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *