तर्क करून शब्द ओळखा

Print Friendly, PDF & Email
तर्क करून शब्द ओळखा.
उद्दिष्ट

ह्या उपक्रमाची रचना अशी केली आहे की ज्याद्वारे पाहिलेल्या वस्तू क्रमाने आठवण्याच्या क्षमतेस चालना दिली जाईल. (व्हिज्युअल सिक्वेन्शिल मेमरी स्किल)

संबंधित मूल्ये
  1. लक्ष केंद्रित करणे
  2. सतर्कता
  3. वेळेचे व्यवस्थापन
साहित्य

६/७ कार्ड्सचा मिळून एक सेट असे कार्ड्स सेट. त्या सेटवर, सहजगत्या निवडलेले शब्द लिहिणे. उदा.- कोणताही विशिष्ट क्रम न ठेवता.

  1. उदा.
  2. देवता
  3. निसर्ग
  4. थोर स्त्रिया आणि पुरुष
  5. संत
  6. धर्म इ…..
खेळ कसा खेळावा
  1. ३/४ मुलांचा १ गट असे छोटे छोटे गट बनवा.
  2. गुरूंनी प्रत्येक गटाला १ कार्ड्सचा सेट द्यावा आणि उदाहरण देऊन खेळ कसा खेळावा हे समजावून सांगावे.
  3. सेट -१ निसर्ग (ढग, नद्या, आकाश, वृक्ष, चंद्र, टेकड्या)
  4. गटातील एका मुलाने वरील ६ कार्ड्स पिसून त्याच्यासमोर ओळीने मांडावीत.
  5. गटातील उरलेल्या मुलांना २/३ सेकंदाचा अवधी देऊन त्याचा क्रम लक्षात ठेवण्यास सांगावा.
  6. त्यानंतर, ती कार्ड उचलून पहिल्या खेळाडूने पुन्हा एकदा पिसावीत.
  7. आता गटातील उरलेल्या मुलांपैकी एकेकाला सेट द्यावा आणि जे सर्व सहा कार्ड्स पूर्वक्रमानुसार लावू शकतील त्यांना गुण द्यावेत.
  8. गुरुंनी बनवलेले वरील ५ कार्ड्सचे सेट पाळीपाळीने ५ गटांमध्ये फिरवावेत.
  9. प्रत्येक गटातील प्रत्येक मुलास मुख्य खेळाडू बनण्याची संधी मिळाली आहे ना हयाची गुरूंनी खात्री करून घ्यावी.
खेळात थोडा बदल

मुलांना किती अवघड वाटेल हयाचा विचार करून सेट मधील कार्ड्सच्या संख्येत बदल करावा.

गुरूंना सूचना

शब्दांचा प्रत्येक सेट बनवताना, सहजगत्या येणारे शब्द निवडावेत, ज्यांच्यामध्ये कोणताही विशेष क्रम नसेल.( उदा.- पुरुषार्थ – ज्यामध्ये विशेष क्रम आहे.) असे शब्द गाळावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *