समाजातील हातांचे कार्य

Print Friendly, PDF & Email
समाजातील हातांचे कार्य
उद्दिष्ट

विविध व्यवसायातील व्यक्ती समाजासाठी कोणते चांगले काम करतात, हे जाणून घेत असताना मुलांना सहाय्यभूत होणारा, असा हा एक प्रेरणादायक खेळ आहे.

संबंधित मूल्ये

आपल्यातील कला कौशल्येआचरणात व व्यवहारात आणणे आणि समाजातील विविध व्यक्तींची भूमिका समजून घेणे.

आवश्यक साहित्य

मानवी मूल्यांच्या कार्डांचा संच.

गुरूंची पूर्वतयारी

काही नाही.

खेळ कसा खेळायचा
  1. वर्गातील मुलांचे २ गटात विभागणी करावी. दोन्ही गटातील मुले २ अर्धवर्तुळात बसून एकदम, एकाच वेळी खेळ खेळतील.
  2. समाजातील विविध व्यक्ती वेगवेगळी भूमिका निभावत असताना आणि प्रत्येक जण समाजाच्या हितासाठी, लोकांच्या कल्याणासाठी त्यांच्या परीने उत्तम काम करत असतो. याबद्दल गुरु मुलांना समजावून सांगतील.
  3. प्रत्येक गटातील एक खेळाडू गुरुंजवळ येईल आणि गुरू त्यांच्या कानात एका व्यवसायाचे नाव सांगतील. मुले आपापल्या गटात परत जातील आणि कोणताही आवाज न करता, न बोलता, ते त्या संबंधित व्यवसायाबद्दल अभिनय करून सांगतील.
  4. तो व्यवसाय सर्वात प्रथम ओळखणाऱ्या गटाला एक ‘मूल्याचे कार्ड’ मिळेल. प्रत्येक राउंड नंतर दोन्ही गटातील मुलांनी, त्या व्यवसायातील व्यक्ती समाजहिताचे कोणते काम करतात, हे विशद करावे.
  5. विविध व्यवसायातील व्यक्ती समाजाच्या हिताची कोणकोणती कामे करतात, त्यावर ह्या खेळातून प्रकाश टाकला जाईल. आणि तोच या खेळाचा उद्देश आहे.
  6. खेळ असाच पुढे चालू राहील आणि दरवेळी नवीन मुलांना विविध व्यवसायांबद्दल अभिनय करण्याची संधी मिळेल.
गुरुंसाठी सूचना
  1. जर वर्गात मुलांची संख्या कमी असेल, तर त्यांचे दोन गट पाडू नये. त्याऐवजी एकेका मुलाला संधी देऊन हा खेळ खेळता येईल.
  2. जो मुलगा व्यवसाय बरोबर ओळखेल, त्याला एक ‘मानवी मूल्य कार्ड’ मिळेल.
  3. अशा अनेक फेऱ्या झाल्यानंतर ज्या मुलाकडे सर्वात जास्त ‘मानवी मूल्यांची कार्डे’ जमा झाली असतील, तो विजेता ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: