हर हर शंकर सांब सदाशिव
भजनाचे बोल
- हर हर शंकर सांब सदाशिव ईशा महेशा
- तांडव प्रियकर चंद्रकलाधर ईशा महेशा
- अंबा गुह लंबोदर वंदित ईशा महेशा
- तुंग हिमाचल श्रुंग निवासित ईशा महेशा
अर्थ
शंकर, सांब, सदाशिव आणि महेश अशा परमेश्वराच्या अनेक नामांचे उच्चारण करा. हे भगवान महेशा! तुला तांडव नृत्य प्रिय आहे. मस्तकावर धारण केलेली चंद्रकोर तुझे मस्तक सुशोभित करते. अंबा सुत लंबोदर तुझी भक्ती करतो. हिमालय पर्वत तुझे निवासस्थान आहे.वरती निर्देशित केलेल्या नामांचे उच्चारण केल्याने भगवंत अमंगलाचा नाश करून आपले रक्षण करतो.
स्पष्टीकरण
हर हर शंकर सांब सदाशिव ईशा महेशा | हे भगवान शिव! हे देवाधिदेवा! तू नित्य मंगलकारक आहेस,संदेह निवारक आहेस, सृष्टीचा स्वामी आहेस आणि सर्व चांगुलपणाचा व समृद्धीचा स्त्रोत आहेस. |
---|---|
तांडव प्रियकर चंद्रकलाधर ईशा महेशा | हे भगवान शिव! तू सर्वश्रेष्ठ नर्तक आहेस,तुला तांडव नृत्य प्रिय आहे. तू समस्त विश्वांच्या गतीचे नियंत्रण करतोस आणि त्यांच्यामध्ये अचूक समतोल आणि ताळमेळ राखतोस. तू मस्तकावर चंद्रकोर धारण केली आहेस. तू सदा प्रसन्न आणि शांत असतोस. तुझे काळावर पूर्ण नियंत्रण आहे. |
अंबा गुह लंबोदर वंदित ईशा महेशा | हे शिव परमेश्वरा! माता पार्वती, श्री सुब्रमण्यम आणि श्री गणेश तुझी भक्ती करतात. तू सर्व – शक्तिमान परमेश्वर आहेस! |
तुंग हिमाचल श्रुंग निवासित ईशा महेशा | हे भगवान शिव! हिमालयासारख्या अचल आणि शुद्ध हृदयांमध्ये वास करणारा तू परम पवित्र आहेस. तू आमच्या शुद्ध आणि परम शांत हृदयात वास करू शकतोस. |
राग: बहुतांशी दरबारी कानडा रागावर आधारित
श्रुती: सी #( पंचम )
ताल: कहरवा किंवा आदी तालम – ८ ताल
Indian Notation
Western Notation
Adopted from : https://archive.sssmediacentre.org/journals/vol_12/01FEB14/Hara-Hara-Shankara-Samba-Sadashiva-Eesha-Mahesha-bhajan-tutor-february.htm