हे शिव शंकर- पुढील वाचन

Print Friendly, PDF & Email
भवानी शंकराचा आंतरिक अर्थ (गट -१- साठी भजन-हे शिव शंकर)

भगवान म्हणतात- ‘भवानी शंकर’ याचा अर्थ शिव आणि शक्तीचे साकार रूप होय. ‘भवानी श्रद्धेचे प्रतीक आहे. (प्रामणिक हेतु) आणि ‘शंकर’ विश्वाचे. जेव्हा श्रद्धेचे प्रतीक असलेली देवी भवानी उपस्थित असते, तेव्हा विश्वासाचे निदर्शक असलेले भगवान शंकर नृत्य करतात. कोणत्याही कामातील प्रमाणिकपणा आणि विश्वासाशिवाय तुमचे जीवन व्यर्थ आहे. ‘भवानी’ आणि ‘शंकर’ दोघेही तुमच्या आंतच असून सुद्धा यावर आजकाल माणसाचा विश्वास नाही. संपूर्ण विश्वाचीच निर्मिति पौरुषत्व आणि स्त्रीतत्त्वाचे पैलु असलेल्या ‘अर्धनारीश्वराच्या’ तत्त्वावर आधारलेली आहे. प्रत्येक माणसाने त्याच्यातील दिव्यत्व जाणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणतेही अध्यात्म यापेक्षा श्रेष्ठ नाही. म्हणून ह्या भवानीशंकर तत्त्वाला पूज्य मानणे, हे प्रत्येक माणसाचे आद्य कर्तव्य आहे.

[source: http://sssbpt.info/summershowers/ss1978/ss1978-23.pdf]

जीवनातील सुसंवादाचे परिपूर्ण उदाहरण- भगवान शंकरांचे कुटुंब

येथे आपल्या पुराणांतील एक छान उदाहरण उदधृत करता येईल. आपण भगवान शिवांच्या कुटुंबाचा अभ्यास करू या. भगवान शिवांनी आपल्या मस्तकी गंगा आणि दोन डोळ्यांच्या मध्ये कपाळावर अग्नी धारण केला आहे. म्हणून त्यांना त्रिनेत्रधारी देव असे म्हणतात. पानी आणि अग्नी हे स्वभावतः एकमेकांच्या विरोधात असून, एकमेकांसोबत राहू शकत नाहीत. शिवांनी आपल्या गळ्याभोवती विषारी सर्प धारण केले असल्याने त्यांना पन्नगाधर, नागभूषण असे म्हणतात.

त्यांच्या थोरल्या पुत्राचे, भगवंत सुब्रमण्यमचे वाहन मोर आहे. परंतु सर्प आणि मोर एकमेकांचे शत्रु आहेत. भगवान शिवांची अर्धांगी पार्वतीचे वाहन सिंह असल्याने ती सिंहवाहिनी आहे. भगवान शिवांच्या दुसऱ्या पुत्राचे मुख हत्तीचे आहे. म्हणून भगवान गणेशास गजानन संबोधतात…. हत्ती तर स्वप्नात सुद्धा सिंहाकडे पाहू शकत नाही. पार्वतीकडे अनेक रत्न आभूषण आहेत. पण भगवान शंकर दिगंबर असून अत्यल्प वस्त्र परिधान करतात. आणि संपूर्ण शरीरावर भस्माचे पट्टे ओढल्याने ते ‘भस्मभूषितांग’ आहेत. जरी शिवांच्या कुटुंबात अनेक परस्पर-विरोधी आणि विसंगत गोष्टी आहेत. तरीही त्यांच्यामध्यें अखंडता समानता, ऐक्य आणि मेळ आहे. त्याचप्रमाणे तुमच्या कुटुंबातील व्यक्ति पण वेगळ्या भिन्न स्वभावाच्या असल्या तरीही शिवांच्या कुटुंबाप्रमाणे तुम्ही एकवाक्यता साधून जीवन जगले पाहिजे. गेली अनेक युगे, भगवान शंकर जगाला हीच शिकवण देत आहेत.

[संदर्भ- सत्यसाईंशी संवाद, सत्योपनिषद भाग ४]