मूल्यांना धरून राहणे
मूल्यांना धरून राहणे
उद्दिष्ट:
एकाग्रतेसाठी हा एक उत्तम खेळ आहे. ह्या खेळातून स्मरणशक्ती, लक्ष्यीकरण (लक्ष्य साधणे ) सस्टेन्ड व्हिज्युअल अटेन्शन, लक्ष केंद्रित करण्याचे कौशल्य ह्यामध्ये सुधारणा होते. ह्या खेळातील गर्भित संदेश असा आहे की मुलांनी चांगल्या मूल्यांचे अनुसरण करण्याचे प्रयत्न सोडू नयेत, मार्गात कितीही अडचणी आल्या तरी त्यांनी मूल्यांना धरुन राहिले पाहिजे.
संबंधित मूल्ये:
- एकाग्रता
- जागरुकता
- दृढनिश्चय
साहित्य:
- ३ एकसारखे प्लास्टिकचे कप
- १ पिंग पाँग बॉल ज्याच्यावर एक मानवी मूल्य लिहिले आहे. (उदा.- सत्य)
- १ टेबल
खेळ कसा खेळावा:
- गुरुंनी त्यांच्या वर्गाची २ गटात विभागणी करावी आणि खेळ कसा खेळावा ते सांगावे.
- एका गटातील एका मुलाला बोलवावे व त्याला एका ओळीत ३ प्लास्टिकचे कप उलटे ठेवण्यास सांगावे. त्याने त्यापैकी एका कपाखाली मूल्य लिहिलेला पिंग पाँगचा बॉल ठेवावा. वर्गातील सर्व मुलांचे लक्ष त्याच्याकडे आहे ह्याची खात्री करून घ्यावी आणि कोणत्या कपाखाली बॉल आहे त्याला माहीत असावे.
- त्याने टेबलावर कप मागे, पुढे, बाजूला सरकावून त्या तिन्ही कपांच्या जागांची अदलाबदल करावी. हे सर्व त्याने जलद गतीने करावे. ते झाल्यावर त्याने पुन्हा ते कप ओळीत मांडावेत.
- ब गटातील मुलांनी मूल्य लिहिलेला बॉल कोणत्या कपाखाली आहे ते ओळखावे.
- ब गटातील जो कोणी बरोबर उत्तर देईल तो विजेता ठरेल.
- आता त्या कपांना हलवून जागेची अदलाबदल करण्याची त्यांची पाळी असेल व अ गटातील मुलांनी कोणत्या कपाखाली बॉल आहे ते ओळखायचे आहे.
गुरुंना सूचना:
- गुरुंनी मुलांना प्रल्हाद आणि हरिश्चंद्र ह्यांच्या गोष्टी सांगाव्यात ज्यांनी अनेक समस्या व अडचणींना तोंड दिले परंतु त्यांनी जपलेल्या मूल्यांना घट्ट धरून ठेवले!