प्रमाणिकपणा
प्रमाणिकपणा
रामू हा एक प्रामाणिक गवळी म्हणून प्रसिद्ध होता . त्याला दोन मुलगे होते. एकाचे नाव सूर्य आणि दुसऱ्याचे नाद चंद्र रामू त्यांना नेहनी सांगत असे, “हे पाहा, कोणालाही फसवू नका किंवा लबाडी करु नका. केवळ प्रामाणिकपणे केलेले कष्टच तुम्हाला जीवनात खरी शांती व सुख मिळवून देतात.
एके दिवशी जनावरांना चरायला घेऊन न गेल्याबद्दल (गाई म्हशी चरायला नेल्या नाहीत म्हणून) रामू सूर्याला खूप रागावला. सूर्याला ते इतके लागले की कधीही परत न येण्याचा निश्चय करून तो घर सोडून निघून गेला.
रामूला सूर्याची नेहमी आठवण येई तेव्हा तो चिंताग्रस्त व कष्टी होत असे. त्याच्या मृत्यूपूर्वी काही दिवस अगोदर तो चंद्राला म्हणाला, “प्रिय मुला, तुझ्या भावाला, सूर्याला शोधण्याचा शर्थीचा प्रयत्न कर .त्याच्या कपाळावर असणाऱ्या मोठ्या काळ्या व्रणामुळे तू त्याला ओळखू शकशील. आपल्यापाशी असलेल्या दहा म्हशीपैकी तू त्याला पाच म्हशी दे.
रामुच्या मृत्युनंतर चंद्र हा जवळपासच्या गावातील प्रत्येक जत्रेला व मेळयाला जात असे. त्याला आशा वाटत होती की कुठेतरी सूर्य भेटेल. पण त्याचे सगळे प्रयत्न व्यर्थ गेले. एके दिवशी सायंकाळी चंद्र परत येत होता. वाटेतील गावात त्याने एका अनोळखी इसमास एका झाडाखाली बसलेले पाहिले. चंद्र त्या इसमाच्या जवळ गेला आणि त्या इसमाच्या कपाळावरील मोठा काळा व्रण पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने तो आपलाच भाऊ आहे हे ओळखले आणि त्याच्या अंगावरील अत्यंत मळके व फाटके तुटके कपडे पाहून चंद्र अत्यंत दुःखी झाला. त्याला रडूच फुटले व तो म्हणाला, सूर्या तू हे असले कपडे का घालतोस व असले दीनवाणे जीवन का जगतोस? माझ्याबरोबर घरी चल. पिताजींनी आपल्यासाठी ठेवलेल्या दहा म्हशींपैकी पाच तू घे आणि दूध व लोणी विकून सुखाने जीवन जग”, सूर्य त्याच्या भावाबरोबर घरी गेला, परंतु तो सर्व वेळ गप्पच होता. एकत्र जेवण झाल्यानंतर चंद्राने एक मोठी घोंगडी अंथरली व लवकरच ते दोघे गाढ झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी चंद्र सकाळी जागा झाला आणि सूर्य पाच महर्षि घेऊन गेल्याचे पाहून आश्चर्यचकित,झाला.नंतर मात्र त्याच्या मनात शंका उत्पन्न झाली “सूर्याने पाच म्हशी घेऊन पळून का जावे “मला कोणी लबाड माणसाने फसवले तर नाही ना? “थोडा विचार करुन त्याने स्वतःचे सांत्वन केले “मी प्रामाणिकपणे वागलो व पिताजींनी मला सांगितले होते ते केले.परमेश्वर याला साक्षी आहे.मग मी कशाला कळजी करु?”.
काही दिवसांनी चंद्राध्या दारात एका सुंदर सजवलेली बैलगाडी थांबली. चंद्राने बाहेर डोकावले तर कपाळावर एक मोठा काला व्रण असलेला मनुष्य त्याच्याकडेच येत असलेला त्याला दिसला परंतु आता त्याच्या अंगावर अगदी चांगले कपडे होते व तो चांगलाच श्रीमंत दिसत होता. तो चंद्रा जवळ आला व म्हणाला , “हे काय भाऊ? तू मला ओळखले नाही ? चंद्र खिन्न स्वरात म्हणाला, “भाऊ मी तुला ओळखले परंतु मी एक घोडचूक केली आहे. मी दोन आठवड्यापूर्वी तुझ्या हिश्श्याच्या पाच म्हशी एका माणसाला, तूच आहेस असे समजून देऊन टाकल्या पण माझ्या चुकीसाठी तुला त्रास व्हावा असे मला वाटत नाही मी तुला माझ्या हिश्श्याच्या पाच म्हशी देईन.
“भावाला गाढ आलिंगन देऊन सूर्य म्हणाला,” प्रिय चंद्रा, तू काहीही चूक केलेली नाहीस. तुझ्या प्रामणिकपणाची कसोटी पाहण्यासाठी मीच त्यावेळी दरिद्री माणसाच्या वेषात आलो होतो.
खरोखरीच तू आपल्या प्रिय पिताजींप्रमाणे अत्यंत प्रामाणिक आहेस. त्यांच्या आशीर्वादाने मी ही फळे व भाजीपाला यां व्यापारात चांगला जम बसवला आहे आणि त्यामुळे चांगला सधन मनुष्य बनलो आहे.मी तुला माझ्याबरोबर राहायला येण्यासाठी, शहरात नेण्यासाठी आलो आहे.मी तुझ्यासाठी बाजारात एक छोटीशी खोली घेतली आहे. तेथे तुला दुधाचा द मिठाईचा व्यवसाय करता येईल.
दोघेही भाऊ नंतर हातात हात घालून वडिलांच्या छोट्या तसबिरीसमोर उभे राहिले व म्हणाले, “पिताजी, तुम्ही आम्हाला नेहमी प्रामाणिक राहण्याबद्दल शिकवले. खरोखर आम्ही भाग्यवान आहोत म्हणून हे तुमच्याकडून शिकू शकलो आज आमच्या या प्रामाणिकपणाने आम्हाला जी शांती व आनंद मिळाला आहे तो कितीही पैसे दिले असते तरी मिळाला नसता”.
प्रश्न :
- चंद्राला प्रामाणिकपणाचे कोणते बक्षिस मिळाले?
- प्रामाणिक असल्याबद्दल सूर्याला काय मिळाले
- दोघे भाऊ त्यांच्या वडिलांकडून काय शिकले? त्यांना त्यांच्या वडिलांबद्दल कृतज्ञता का वाटत होती?