वैकुण्ठ किती दूर आहे

Print Friendly, PDF & Email

वैकुण्ठ किती दूर आहे

Pandit narrating Gajendra Mokshamएक विद्वान पंडीताने राजदरबारामध्ये, महाराज व त्यांचे राजदरबारी ह्यांच्यासमोर भागवतातील गजेंद्रमोक्षाच्या कथेचे पाल्हाळ लावले होते. तो खुलवून खुलवून कथा सांगत होता. एका हत्तीचा पाय आक्राळ विक्राळ मगरीने आपल्या जबड्यामध्ये पकडला होता. त्यातून सुटका करून घेण्यासाठी तो वेदनांनी विव्हळ झालेला हत्ती परमेश्वराकडे मदतीची याचना करत होता.

त्याच्या त्या करुण हाका ऐकून परमेश्वराने तो कोठे व कशासाठी चालला आहे हे त्याच्या अर्धांगिनीला न सांगताच तो स्वर्गातून त्वरेने निघाला. विद्वान पंडीत ह्या प्रसंगाचे तपशीलवार वर्णन करत होता.

अचानक, महाराजांनी त्याला मधेच अटकाव करून एक प्रश्न विचारला,” हे पंडित, येथून वैकुंठ किती दूर आहे?

विद्वान पंडीतास उत्तर माहित नसल्याने तो निरुत्तर झाला. दरबारातील इतर पंडीतांनाही ते माहित नव्हते.

परंतु महाराजांना सिंहासनाच्या मागून चवरी (पंखा)ढालणाऱ्या सेवकाने, त्याच्या धिटाईस माफ केल्यास,तो उत्तर देण्यास तयार असल्याचे सांगितले. पंडीताला त्याची ती धिटाई पाहून धक्काच बसला. तथापि महाराजांनी त्याला बोलण्यास अनुमती दिली.

Servant giving the answer

“सरकार! जेवढ्या दूरवर हत्तीचे रुदन ऐकू येईल तेवढ्या अंतरावर वैकुण्ठ आहे.” तो म्हणाला.

हो बरोबर, जेव्हा भक्त त्याच्या मनोवेदना, रुदन कण्हणे वा उसासा ह्यांच्याद्वारे व्यक्त करतो तेव्हा परमेश्वर ते ऐकू येईल एवढ्याच दूर अंतरावर असतो. तो नेहमीच त्याच्या मुलांच्या रुदनाबाबत दक्ष असतो. वैकुंठ त्याचे निवासस्थान, हे प्रत्येक दुःखातून निर्माण होणारे प्रत्येक रुदन ऐकू येईल एवढ्या अंतरावर आहे. त्या अशिक्षित सेवकाने क्षणार्धात परमेश्वराची सर्वव्यापकता व करुणा जाणली. परमेश्वर सर्व व्यापक आहे आणि मूर्तिमंत कारुण्य आहे.

[Ref: China Katha – Part 1 Pg:130]

 Illustrations by Ms. Sainee &
Digitized by Ms.Saipavitraa
(Sri Sathya Sai Balvikas Alumni)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: