पुढे कसे जायचे?

Print Friendly, PDF & Email

पुढे कसे जायचे?

  1. सर्व प्रथम, कार्यक्रमाचा विषय निवडण्यासाठी वर्गामध्ये चर्चा करावी. या चर्चेचे लक्ष्य योग्य विषयाची निवड हेच असावे. असा विषय निवडावा की त्यामुळे मुलांचे कुतुहल टिकून राहील. मुलांच्या अगदी जवळच्या वातावरणाशी आणि जीवनातील परिस्थितीतल्या त्यांच्या भूमिकेशी हा विषय प्रसंगोचित आहे हे मुलांच्या लक्षात आले, तर ते शक्य होईल.
  2. एकदा विषयावर सहमत झाले की वर्गात ‘मनाला सुव्यवस्थित रूप देणे’ (MIND MAPPING) या पाठाला सुरुवात करावी. सर्व प्रथम निवडलेल्या विषयाशी संबंधित असलेले जे शब्द मुलांच्या मनात येतील, ते शिक्षकांनी मुलांना सांगण्यास सांगावे. या शब्दांची संपूर्ण यादी फळ्यावर लिहिता येईल. यामुळे मुलांकडून बऱ्याचशा कल्पक सूचना मिळविण्यास वाव मिळेल. कधी कधी सांगण्यात आलेले बरेचसे शब्द अपरिचित आणि शिक्षकांना थक्क करून सोडणारे असतात. अर्थातच ते एखाद्या पाठ्यपुस्तकाच्या किंवा अभ्यासक्रमाच्या बंधनात बांधलेले नसतात. परंतु मुलांची समज आपण स्वीकारली पाहिजे.
  3. “मनाला सुव्यवस्थित रूप देण्याचा” पाठ (MIND MAPPING EXERCISE) समाधानकारक अवस्थेला पोहोचला की वर्ग एक ‘वेब चार्ट’ (किचकट जाळीदार रेखाचित्र ) तयार करण्यास सुरुवात करेल. या वेब चार्टचा प्रत्येक भाग म्हणजे शब्दांचा एक संच असतो. हे रेखाचित्र या कार्यक्रमामार्फत ‘शब्द आणि शोध’ यांच्या विषयाशी संबंधित असलेल्या वावाची रूपरेशा आहे. साधारणतः असे लक्षात येते की विज्ञान, गणित सामान्यविज्ञान, भाषा इत्यादी विषयांशी संबंधित असलेले शब्द मुले अधिक प्रमाणात एकत्र करतात. कारण त्यांच्या जवळ व्यवस्थितरित्या आखलेली विषयानुक्रमणिका असते.
  4. वेब चार्ट तयार करतांना कल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी, मुले लहान लहान गटांमध्ये विभागली गेली तर ते अधिक उपयुक्त ठरेल. वर्तुळाकार रचनेत बसल्याने परस्परक्रियेला अधिक स्वातंत्र्य मिळेल. सुरुवातीच्या पहिल्या थोड्या सत्रांमध्ये शिक्षकांना आढळून येईल. की मुले फार जास्त बोलतात किंवा मोठ्या आवाजात बोलतात. एकदा ती कामात गुंतली आणि त्यांनी स्वतःपुढे साध्य करण्यासाठी लक्ष्य ठेवले,की आवाजाचा स्तर खाली येईल.
  5. यानंतर या सर्व गटांमधील कल्पना संपूर्ण वर्गात वाटून घेता येतील. सुरुवातीला वेब चार्ट फार मोठा, विस्तारपूर्वक किंवा किचकट वाटेल. याशिवाय शिक्षकांना असेही वाटेल की कदाचित यातले काही जोड मुलांच्या लक्षात आले नसतील;तरीही या अवस्थेला कोणत्याही प्रकारचे थेट मार्गदर्शन टाळावे. तरीसुद्धा सादरीकरणाशी संबंध जोडण्यासाठी कदाचित शिक्षक/शिक्षिकेला कुशलतेने मुलांचे मार्गदर्शन करावे लागेल. मुलांनी दाखविलेल्या कुतुहलावर आधारुन शिक्षकांनी मुलांना सल्ला द्यावा की त्यांनी काही निवडक भागांवर काम करावे.
  6. वेब चार्ट बनविल्यानंतर वर्गाला गटांमध्ये विभागावे. प्रत्येक गटात ५ ते ६ मुले असावीत. प्रत्येक गटाने वेब चार्ट च्या एका विशिष्ठ भागावर काम करावे. अर्थातच मुले त्यांच्या आवडत्या भागाची निवड करतील. शिक्षकांनी कामाचे रुप अशा रितीने फिरवत रहावे की विषय व्यासंगाला फारसे उत्तेजन मिळणार नाही. सर्व मुलांना थोड्याच अवधीत सर्व प्रकारची कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळाली पाहिजे.

शक्य असलेल्या कार्यक्रमांची यादी आता मुलांना तयार करता येईल. हे मुलांनी दाखविलेल्या निपुणतेवर आणि कौशल्यांवर अवलंबून राहील. साधारणतः कार्यक्रमाचे क्षेत्रफळ बऱ्याच प्रकारात मोडेल जसे, भाषाकौशल्य (गीते, कविता, ‘नाट्यलेखन’ किंवा नात्यीकरण) गणितविषयक कौशल्य (मोजमाप, सरासरी, किमतीचे अंदाज, नकाशे व आलेख काढणे), कल्पक सर्जनशील कौशल्य (चित्रकला, हस्तकला, संगीत,नाट्यप्रयोग) आणि परस्परसंबंध विषयक कौशल्य (मुलाखती, कथाकथन, भाषण व लेखन)

अनुभवजन्य अध्ययनाच्या प्रत्येक विषयाचा कालावधी ६ ते १६ तासापर्यंत बदलता असू शकेल. यासाठी शाळेतर्फे दररोज एक तास या प्रमाणे काही दिवस नेमून देता येतील. वस्तुतः बहुतेक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात सहज बदलण्याजोगे वेळापत्रक आणि अभ्यासक्रम निवडायची क्षमता असते, पण साधारणतः त्यावर विचार केला जात नाही. नवनूतन पध्दती अमंलात आणणे आणि अनियोजित वेळापत्रकाची सुविधा पुरविणे या बाबतीत शाळा आणि शिक्षकांना दृढविश्वास वाटला पाहिजे.

  • पाठ पूर्ण झाला की इतर वर्ग/पालक/ पाहुणे यांच्या समोर सादरीकरण करण्याची संधी मुलांना देण्यात यावी. रेखाचित्रे, प्रतिकृती, नाटयीकरण, गाणी, खेळ, गोष्टी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमाचा उपयोग करून सादरीकरण अधिक परिणामकारक करता येईल. त्यानंतर वर्गाला पुढच्या विषयाकडे वळता येईल.
शिक्षक/शिक्षिकेची भूमिका

या संपूर्ण कार्यप्रक्रियेत शिक्षक/शिक्षिकेची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आवश्यक उद्दिष्ट्ये शिक्षकांनी सदैव लक्षात ठेवावीत. मुलांसाठी शिक्षक/शिक्षिका मित्र, मार्गदर्शक आणि तत्त्वज्ञानी असतात. मित्र आशा दृष्टीने की, मुलांना त्यांच्याकडे केव्हाही अगदी सहजतने जाता यावे आणि त्यांना वेळोवेळी, शिक्षकांकडून प्रोत्साहन मिळायला हवे. मार्गदर्शक अशासाठी की शिक्षकसल्ला देण्याचा दृष्टिकोन स्वीकारतात, सत्ता गाजविण्याचा नाही, ते काळजीपूर्वक रित्या सल्ला किंवा इशारा देतात.; वर्गात सकारात्मक स्वरुपाची प्रश्नोत्तरे आणि चर्चा आयोजित करतात. तत्त्वज्ञानी अशासाठी की शिक्षकाचे सान्निध्य आणि नैतिक बळ, इशारे आणि सूचना मुलांवर प्रभाव पाडतात ज्यामुळे सर्व प्रकारच्या अध्ययनात स्वाभाविकतः उपस्थित असलेल्या मूल्यांचा शोध लावण्यास ते/ त्या मुलांना प्रभावित करतात.

आधी सांगितल्याप्रमाणे, अनुभवजन्य अध्ययन हा एक प्रवेश (approach) आहे, विषय नव्हे. त्यामुळे अभ्यासक्रमापुरत्या मर्यादित असलेल्या स्वतःच्या संकुचित विचारसरणीतून शिक्षक/शिक्षिकेने बाहेर पडावे. मुले जेव्हा कामात गुंग होऊन त्याचा आनंद घेतात, जेव्हा ती भिन्न घटना आणि दृकचमात्कारातील परस्पर नात्याची खोलवर जाणीव विकसित करतात, तेव्हा निरिक्षणामार्फत जे शिकले जाते, ते त्यांना परिणामकारकारित्या व्यक्त करता येते. आणि त्यांच्या विचार भावना, कृतींमध्ये ऐक्य आल्याने,जेव्हा त्यांचे एकत्रित अस्तित्व बनते, तेव्हा आपल्या प्रयत्नांचा परिणाम पाहून आपल्याला समाधान वाटले पाहिजे.

[Source – ‘Towards Human Excellence Sri Sathya Sai Education for Schools’ Book 7, “Experiential Learning” published by Institute of Sathya Sai Education, Mumbai.]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *