मानवी प्रयत्नांना दैवी मदत मिळते

Print Friendly, PDF & Email
मानवी प्रयत्नांना दैवी मदत मिळते

एक सत्पुरुष काही खेडुतांशी देव , त्याची कृपा यासंबंधी बोलत होता. “देव दयाळू आहे. प्रेमळ आहे. .देव म्हणजे शक्ती आणि सामर्थ्य आहे ‘ तो सत्पुरुष त्यांना सांगत होता. “जेव्हा केव्हा तुम्ही अडचणीत असाल आणि तुमची शक्ती अपुरी पडेल तेव्हा देवाची प्रार्थना करा त्यातून बाहेर पडायला तो नक्कीच मदत करील”. श्रोत्र्यांमध्ये रामचरण नावाचा गाडीवान होता. तो मोठा हनुमानभक्त होता. देव भक्तांना मदत करतो हे ऐकून त्याला आनंद झाला.

Ramcharan's praying Hanuman to push his cart

एक दिवस पाऊस पडत होता. रामचरण तांदळाची पोती भरलेली आपली बैलगाडी चालवीत होता. तो थोडेसे अंतर् गेला असेल तोच त्याच्या गाडीची दोन्ही चाके चिखलात रुतली. रामचरणला त्या सत्पुरुषाच्या शब्दांची आठवण झाली. हात जोडून, डोळे मिटून त्याने प्रार्थना करायला सुरवात केली. “हे हनुमानजी,कृपया या आणि माझी गाडी चिखलातून बाहेर ढकला. त्याने पुन्हा पुन्हा प्रार्थना केली पण कोणी देव त्याच्यासमोर प्रगटला नाही. निराश होऊन तो हनुमंतावर रागावला. इतकेच नव्हे तर त्याने त्याला दूषणे दिली.

Then his anger turned on to the saint. He rushed to the temple where the saint was staying and said, “Maharaj, you have fooled us all. God never helps man. My cart is stuck in mud. I prayed to God ten times for help, but all in vain.” Then, he explained angrily all that had happened.

मग त्याचा राग त्या सत्पुरुषाकडे वळला. ते राहत होते त्या देवळाकडे तो धावला आणि त्यांना म्हणाला, “महाराज, तुम्ही आम्हा सर्वांना फसवलं आहे. देव माणसाला कधीच मदत करीत नाही माझी गाडी चिखलात फसली आहे. मी मदतीसाठी देवाची दहा वेळा प्रार्थना केली पण सगळं व्यर्थ! नंतर त्याने आणखींच रागीट शब्दात काय घडले ते सारे सांगितले. सत्पुरुषाने रामचरणचे सर्व काही शांतपणे ऐकून घेतले.

Saint advicing him to try with his full energy first

मग त्याच्या पाठीवर प्रेमाने व सहानुभूतीने थोपटीत ते म्हणाले, बाळा, तुला किती निराशा झालीय ते मला कळलय पण जेव्हा तुम्ही आपलं सारं बळ वापरलेलं असत, तेव्हा देव तुमच्या मदतीला येतो असं मी सांगितलं नव्हते काय? जर तुम्ही एखाद्या विहिरीपाशी उभे राहिलात आणि म्हणालात ‘हे विहिरी, मला तहान लागली आहे. मला थोडे पाणी दें. तर तुम्हाला काय मिळेल? काहीच नाही. तुम्हाला बादली विहिरीत सोडावी लागते आणि वर ओढावी लागते मग तुम्हाला विहिरीतल पाणी मिळत. तसच देवाचेही आहे. तुम्हाला त्याने दिलेली सर्व शक्ती वापरा आणि मग त्याची मदतीसाठी प्रार्थना करा.”

 Ramacharan feels help while pushing the cart

रामचरण आपल्या गाडीकडे पळत गेला त्याने एका चाकाला खांदा लावला. बैलांना पुकारून गाडी ओढायला उध्युक्त केले व स्वतःही सर्वशक्तिनिशी चाक ढकलले. त्याच क्षणी रामचरणला असे जाणवले की, कोणीतरी दुसरे चाक अधिक जोराने ढकलीत आहे. “ते चाक कोण ढकलतय?’ रामचरण विचार करू लागला. “मी ज्यांची प्रार्थना केली ते हनुमानजीच असणार,” चाकाला आणखी एकदा थक्का देताना तो म्हणाला. ताबडतोब दोन्ही चाके चिखलाबाहेर आली व बैलांनी आनंदाने गाडी ओढीत धावायला सुरूवात केली. बैलाच्या गळ्यातील घंटा वाजू लागल्यावर रामचरणने प्रार्थना म्हणायला सुरवात केली. तिच्यात हनुमंताविषयी कृतज्ञता व्यक्त केली होती.

त्यानंतर जेव्हा जेव्हा त्याचे मित्र संकटात पडत तेव्हा रामचरण त्यांना नेहमी सांगत असे: “मदतीसाठी देवाची प्रार्थना करण्यापूर्वी तुमची बुध्दी व बळ वापरा. देव नक्कीच येईल आणि आवश्यक ते करील . जे प्रथम स्वतः प्रयत्न करतात त्यांना देव नेहमीच मदत करतो”

प्रश्न:
  1. रामचरणने प्रथम प्रार्थना केली तेव्हा देव मदतीसाठी का आला नाही?
  2. देवाने त्याला केव्हा मदत केली?
  3. तुम्हाला देवाच्या मदतीची आवश्यकता केव्हा भासते ?ती मिळवण्यासाठी तुम्ही काय कराल?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: