शब्दशोध
शब्दशोध
उद्देश्य:
हा एक मनोरंजक तसेच परस्परांमध्ये संवाद आणि क्रिया घडवून आणणारा उपक्रम आहे ज्यामुळे मुलांचा सकारात्मक शब्दांशी परिचय होतो व असे शब्द मुलांच्या शब्दकोशात पक्के बसतात.
संबंधित मूल्ये:
- लक्ष केंद्रित करणे
- जागरूकता
- सावधानता
- सांघिक कृती
- समन्वय
- मैत्रीपूर्ण संबंध
- वेळेचे व्यवस्थापन
- शिस्त
साहित्य:
- A4 साईझचे जाड कागद/ कार्डबोर्ड
- मार्कर
तयारी
- ज्या शब्दांमधून मानवी मूल्ये सूचित होतात अशा साध्या शब्दांची यादी करावी. (उदा. ईश्वर, चांगले, प्रार्थना, वाटणी, काळजी, मदत, गाणे, हास्य, धन्यवाद, आनंद, आनंदी, पवित्र, प्रिय, खुश, आशा, सुरेख, व्यवस्थित, दयाळु, शुद्ध, स्वच्छ, सत्य, शांती)
- या शब्दांमध्ये वापरल्या गेलेल्या सर्व अक्षरांची तसेच पुनरावृत्ती झालेल्या अक्षरांची पण नोंद करा.
- प्रत्येक A4 साईझ कागदावर यातील एक-एक अक्षर तसेच पुनरावृत्तीत झालेली अक्षरेही लिहीत चला.
खेळ कसा खेळावा
- संपूर्ण वर्गामध्ये प्रत्येक मुलाला एक या प्रमाणे कागद वाटावेत.
- मुलांना खेळ स्पष्ट करून सांगावा.
- यादी मधील एक मूल्य-शब्द संपूर्ण वर्गाला सांगावा- उदा. वाटणी
- ज्या मुलांजवळ ही तीन अक्षरे असलेली कार्ड आहेत त्या मुलांनी पुढे यावे आणि आपल्या हातातील कार्ड सर्वाना दिसतील अशा प्रकारे धरून योग्य प्रकारे -वाटणी- हा शब्द तयार करावा.
- ज्या मुलांचा शब्द तयार करण्यामध्ये भाग घेऊन झाला आहे त्यांनी खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन बसावे म्हणजे इतर मुलांना पुढे येऊन खेळामध्ये भाग घेण्याची संधी मिळेल.
- आता दुसरा शब्द सांगा आणि अशा प्रकारे खेळ चालू ठेवा.
- यादीतील सर्व शब्द संपेपर्यंत खेळ चालू ठेवावा.
भिन्नता:
- निसर्गाशी संबंधित साधे शब्द (झाड, हवा, पाऊस, फळ, निसर्ग, चंद्र, पान, तारा, आकाश, सूर्य, ढग, टेकडी, पक्षी, नदी)
- धर्माशी संबंधित शब्द (गुरु, जिझस, राम, सीता, देवी, अल्लाह, ओम, हरी, हर, शिव, क्रॉस, होळी, दिवाळी, इस्टर, भारत, मंदिर, चर्च, मशीद)