कर चरण श्लोका – उपक्रम

Print Friendly, PDF & Email
कर चरण श्लोका – उपक्रम
उपक्रम: झोपायला जाण्यापूर्वी आत्म परिक्षण करा.

प्रिय मुलांनो, दिवस संपल्यानंतर तुम्ही काय करता? तुमचा दिवस कसा होता? तुम्ही दिवसभर काय केलेत? तुम्ही दिवसभर चांगल्या गोष्टी केल्यात का? तुम्ही कळत नकळत कोणाचे मन दुखावलेत का? ह्या सर्व गोष्टी तुम्ही कोणाला सांगणार? तुम्ही हे सर्व तुमच्या जिवलग मित्रास सांगू शकता. तुमचा जिवलग मित्र कोण आहे ते तुम्हाला माहित आहे का? हो—तो परमेश्वर आहे. तो तुमचा परम प्रिय मित्र आहे. परमेश्वर सदैव तुमच्या बरोबर असतो व तो कधीही तुम्हाला सोडणार आहे. तो सदैव तुमचे मनोगत ऐकण्यासाठी तुमच्या बरोबर असतो. दिवस संपल्यानंतर झोपायला जाण्यापूर्वी, दिवसभरात तुम्ही जे काही केलेत ते सर्व परमेश्वरास सांगा. सर्व चांगल्या गोष्टी, ज्यातून तुम्हाला आनंद मिळाला त्या सर्व त्याला सांगा. तसेच दिवसभरात तुमच्या हातून घडलेल्या सगळ्या चूका त्याला मोकळेपणाने सांगा तुम्ही त्याच्याशी कोणत्याही भाषेत बोलू शकता. कारण त्या संभाषणात एकमेव भाषा असते ती म्हणजे हृदयाची भाषा.
परमेश्वर
तुम्हाला सदैव मार्गदर्शन करेल आणि तुम्ही एक सुंदर पुष्प बनून सदा सर्वत्र सुगंध पसरवाल. मुलांनी दररोज झोपायला जाण्यापूर्वी आत्मपरीक्षण कसे करावे हे गुरूंनी स्पष्ट करावे. कृपया खालील चित्राचा संदर्भ द्यावा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: