जगदीश्वरी जय माता भवानी
भजनाचे बोल
- जगदीश्वरी जय माता भवानी
- कारुण्य लावण्य अखिलांडेश्वरी
- जगदीश्वरी जय माता भवानी
- हे शिव शंकरी त्रिलोक पालिनी
- शरणागत परिपालिनी माता
अर्थ
भवानी माता ही अखिल जगताची देवी आहे. ती तिन्ही लोकांचे पालन करते. ती करुणामयी आहे, सुंदर आहे.
ती भगवान शंकराची अर्धांगिनी आहे. तिला शरण येणाऱ्यांची ती सर्वतोपरी काळजी घेते.
स्पष्टीकरण
जगदीश्वरी जय माता भवानी | परमेश्वराची माता, सर्व जीवांची प्राणशक्ती,प्रेम आणि शांतीचे अमर्याद भांडार असलेल्या जगन्मातेचा जयजयकार असो! |
---|---|
कारुण्य लावण्य अखिलांडेश्वरी | हे दिव्य माते! तू अत्यंत करुणामय आहेस आणि लावण्यवती आहेस. तू अखिल विश्वाची स्वामिनी आहेस. |
जगदीश्वरी जय माता भवानी | परमेश्वराची माता, सर्व जीवांची प्राणशक्ती,प्रेम आणि शांतीचे अमर्याद भांडार असलेल्या जगन्मातेचा जयजयकार असो! |
हे शिव शंकरी त्रिलोक पालिनी | हे दिव्य माते! भगवान् शिवाची अर्धांगिनी, तू सर्व मांगल्याचा स्त्रोत आहेस. तू तिन्ही लोकांचे पालन करतेस, रक्षण करतेस. |
शरणागत परिपालिनी माता | हे माते! जे तुला पूर्ण शरणागत होतात, त्यांचे तू पालनपोषण आणि रक्षण करतेस. |
राग- बहुतांशी हंस विनोदिनीवर आधारित
श्रुती- c # (पंचम)
ताल- केहरवा किंवा आदितालम
Indian Notation
Western Notation
Adopted from : https://archive.sssmediacentre.org/journals/vol_12/01SEPT14/Jagadeeshwari-Jaya-Mata-Bhavani-radiosai-bhajan-tutor.htm