जगन्नाथपुरी

Print Friendly, PDF & Email

जगन्नाथपुरी

दंतकथा असे सांगते कि, देवाने इंद्रधुम्न राजाला आज्ञा केली की, एक देऊळ बांध राजाने आपला सर्व वेळ संपत्ती व शक्ती एक भव्य देवालय उभारण्यासाठी खर्च केली. त्याला परत एक स्वप्न पडले त्यात समुद्रकिनान्यावर तरंगत असलेला ओंडका घेऊन त्यातून भगवंताची मूर्ति कोरायला सांगितली होती. मग देवाने आपला विश्वकर्मा नावाचा कारागीर एका म्हाताऱ्याच्या रूपाने हे काम करण्यासाठी पाठवला. त्याने अट घातली की तो काम करीत असताना ते पहाण्यासाठी कोणीही त्या खोलीत यायचे नाही. पण राणी स्वत:ला आवर घालू शकली नाही आणि पंधरा दिवसांनंतर धाडकन् दारे उघडून ती आत गेली, जगन्नाथ, त्याचा भाऊ बलराम व बहीण सुभद्रा यांच्या तीन अपूर्ण मूर्ती तिथे सोडून म्हातारा अंतर्धान पावला.

दर वर्षी सुप्रसिद्ध रथयात्रासोहळा पाहण्यासाठी लाखो लोक पुरीला गोळा होतात. तेव्हा या मूर्ती प्रचंड लाकडी रथातून मिरवत नेतात. हा प्रवास कृष्णाच्या गोकूळातून मथुरेला केलेल्या प्रवासाचे प्रतीक आहे.

[Source- Stories for Children – II]

Published by- Sri Sathya Sai Books & Publications Trust, Prashanti Nilayam

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: