जैन धर्म

Print Friendly, PDF & Email
जैन धर्म

इ. स. पूर्व ८०० च्या सुमारास भगवान महावीरांनी जैन धर्माची स्थापना केली. जैन धर्म हा हिंदुधर्माचा भगिनी धर्म आहे. जैन धर्म जरी आर्यन धर्म असला तरी त्यांना वेदांचा अधिकार मान्य नाही.

इ. स. पूर्व आठव्या शतकाच्या दरम्यान आर्यन लोकांच्या एका गटाने वेदांमधील काही शिकवणी आणि हिंदु धर्मातील काही प्रथा ह्यांचा विरोध केला. भौतिक सुख प्राप्त व्हावे आणि स्वर्गात प्रवेश मिळावा ह्या हेतूने, परमेश्वरास प्रसन्न करण्यासाठी यज्ञामध्ये पशुबळी देण्याच्या हिंदू धर्मातील प्रथेचा स्वीकार करण्यास ते तयार नव्हते. जीवन अत्यंत पवित्र आहे आणि यज्ञाच्या नावाने एखाद्या निष्पाप पशूला यज्ञात बळी देणे पाप आहे, अशी त्यांची धारणा होती. त्या काळात प्रचलित असणाऱ्या धार्मिक प्रथांच्या विरोधात त्यांनी बंड पुकारले.

मनुष्यने कडक शिस्तीने आणि साधेपणाने जीवन जगावे आणि मनुष्यने त्याच्यामधील पशुवृत्तींचे दमन केले पाहिजे. ह्यावर त्यांचा विशेष भर होता. काळाच्या ओघात अशा विचारसरणीचे लोकं, वर्धमान महावीर ह्यांच्या शिष्यत्वाखाली एकत्र आले आणि त्यांनी जैन नावाचा दुसरा धर्म स्थापित केला. ह्या महान धर्माची पाळमुळं प्राचीन काळात सापडतील. ह्या धर्माचे मूळ ऋषभदेव नावाच्या एका महान राजाशी संबंधित आहे. जो नंतर एक थोर तपस्वी बनला.

जैन धर्मातील तीर्थंकर शब्दाचा अर्थ जो तुम्हाला तराफ्यात बसून संसार सागर पार करवतो. (ज्यांनी मुक्तीचा मार्ग शोधला आणि इतरांना दर्शवला ते तीर्थंकर) हा तराफा म्हणजे धर्म होय. ऋषभदेव हे पहिले तीर्थंकर, पार्श्वनाथ हे २३वे तीर्थंकर आणि २४वे व अखेरचे जैन तीर्थंकर वर्धमान महावीर असे मानले जाते.

महावीरांना ‘जीना’ असेही म्हटले जाते. त्याचा अर्थ विजेता. केवळ भूतलावरील राज्याचा विजेता नव्हे तर आध्यातमातील राज्यातील विजेता, तसेच ज्याने आत्मतत्त्वावर, इंद्रियांवर आणि भौतिक इच्छा वासनांवर विजय मिळवला आहे तो. जैन लोकं, सिध्द म्हणजेच ज्याला मोक्षप्राप्ती झाली आहे तो सर्वश्रेष्ठ असे मानतात.

वर्धमान महावीरांचे जीवन

वर्धमान महावीरांचा जन्म वैशाली साम्राज्याचे राजा सिद्धार्थ आणि कुंडलपुरच्या राणी त्रिशला ह्यांच्या पोटी झाला. बालवायातच वर्धमानांनी अनेक धाडसी कृत्ये केल्यामुळे त्यांना ‘महावीर’ संबोधू लागले.

महावीरांना विलासी जीवनात रस नव्हता. मानवजातीचे दुःख व त्याचे निवारण कसे करावे ह्यावर ते सतत विचार करत असत. त्यांनी ३०व्या वर्षी भौतिक जगाचा त्याग केला. १२ वर्षांच्या कठोर तपस्येनंतर त्यांना आत्मज्ञान प्राप्त झाले. त्यांनी मानवाच्या दुःखाचे कारण आणि त्याच्या निवारणाचा मार्ग शोधून काढला व जैन तत्त्वज्ञानात ते प्रतिपादित केले. जन्म, जीवन आणि मृत्यु ह्या चक्रातून पूर्णतः मुक्ती व सत्चित् आनंदावस्थेची प्राप्ती हे त्यांचे शिकवणीचे अंतिम ध्येय होते. जीवनाची उर्वरित तीस वर्षे त्यांनी जैन धर्माची शिकवण दिली. असंख्य लोक त्यांचे अनुयायी बनले. वयाच्या ७२व्या वर्षी, बिहारमधील पावापुरी येथे त्यांना मोक्षप्राप्ती (निर्वाण)झाली. त्यांच्या निर्वाणानंतर हा धर्म सुसंघटीतपणे सुस्थापित होता व संपूर्ण भारतामध्ये त्याचा विस्तार झाला.

जैनधर्माचे तत्त्वज्ञान

जेव्हा मनुष्य सर्व कर्मांमधून मुक्त होतो तेव्हा त्याला केवळ ज्ञान वा आत्मज्ञान प्राप्त होते, असे जैन लोकं मानतात. जन्म मृत्युच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी काही नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. संन्याशांसाठी नियम अत्यंत कडक आहेत. परंतु गृहस्थाश्रमी वा सामान्यजनांसाठी नियम खूप शिथिल आहेत.

ते खालीलप्रमाणे

  1. अहिंसा: प्रत्येक सजीव वस्तुमध्ये आत्मा विद्यमान असतो म्हणून त्याला कोणत्याही प्रकारची इजा न पोहचवता त्याच्याप्रती सकारात्मक दयाभाव दर्शवावा.
  2. सत्य: मनुष्याच्या वाणीमध्ये सत्यता असायला हवी
  3. अस्तेय: मनुष्याने चोरी करु नये. एवढेच नव्हे तर चोरीचा विचार करणेही पाप आहे.
  4. अपरिग्रह : मनुष्याला लालसा नसावी व त्याने धनसंपत्तीचा संचय करु नये. जगण्यासाठी जेवढे आवश्यक आहे तेवढे जवळ ठेवावे.
  5. ब्रह्मचर्य: मनुष्याच्या विचार, उच्चार आणि आचार ह्यामध्ये पावित्र्य असायला हवे.

जैन धर्माच्या शिकवणीतील जीवनविषयक तीन अनमोल रत्ने

  1. सम्यक ज्ञान
  2. सम्यक दृष्टी
  3. सम्यक चरित्र

Following these 3 precepts leads one to salvation, freedom from all misery, all pain. Jainism is a religion in which all life is considered worthy of respect and it advocates the protection of even the smallest creatures like microscopic organisms. Jain monks often wear a mask on their mouth to avoid breathing in micro-organisms and causing them harm. They walk barefoot so as not to harm tiny creatures they may step on.

ह्या तीन उपदेशांचे अनुसरण मनुष्याला सर्व दुःख वेदनांपासून मुक्त करुन मोक्षाप्रत घेऊन जाते. जैनधर्मात सर्व जीव आदरास पात्र मानले जातात आणि दुर्बिणीतून दिसणाऱ्या सूक्ष्मातील सूक्ष्म जीवाणुलाही संरक्षण मिळावे ह्याचे ते समर्थन करतात. श्वासाद्वारे ते सूक्ष्म जिवाणू मुखात येऊन, त्यांना इजा पोहचू नये ह्यासाठी जैन भिक्षु तोंडावर मास्क बांधतात. एखाद्या छोट्याशा जीवावर चुकून त्यांचा पाय पडला तर त्याला इजा पोहचू नये म्हणून ते अनवाणी चालतात. जैन धर्मग्रंथ प्राचीन काळात लिहिले गेले आहेत. परंतु बुध्द भिक्षु पंडीत उमास्वाती वा उमास्वामी ह्यांनी सुमारे १८०० वर्षांपूर्वी लिहिलेला ‘तत्त्वार्थ सूत्र’ ग्रंथ प्रख्यात आहे. खाली दिलेले चिन्ह हे जैन धर्मातील इतर काही महत्त्वाच्या चिन्हांनी बनलेले आहे. ह्या चिन्हामध्ये जैन धर्माच्या शिकवणीचा गाभा अंतर्भूत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *