जपमाळेसहित जप

Print Friendly, PDF & Email
जपमाळेसहित जप

इ. स. पूर्व ८०० ह्या काळात अथर्व वेदामध्ये जपमाळेसहित मंत्रोच्चारणाचा पहिला उल्लेख आढळतो. जपमाळेत मण्यांची संख्या १०८ असते. जरी माळेमध्ये १०८ मणी असले तरी जपमाळ तुम्हाला ऐक्य शिकवते. माळेतील धागा सर्व मण्यांना एकत्र बांधून ठेवतो आणि हाच माळेच्या अस्तित्वाचा पाया आहे

[SSS Volume 7, p36]

जप करण्यासाठी जपमाळ कशी वापरावी?

करंगळी, अनामिका (Ring Finger) आणि मधलं बोट ही तिन्ही बोटं ३ गुणांचे प्रतिनिधित्व करतात. ते तीन गुण म्हणजे सात्विक, राजसिक आणि तामासिक, मधले बोट शुद्धतेचे (सत्व) प्रतिक आहे. अंगठयाच्या बाजूचे बोट म्हणजेच तर्जनी जीवाचे प्रतिक आहे. आणि अंगठा परब्रह्माचे प्रतिक आहे. तर्जनी आणि अंगठा ह्यांची टोके जुळवून, उरलेली तीन बोटे एकमेकांना न चिकटवता ताणून रण्याचा हा पवित्रा जीवात्म्याची परमात्म्याशी एकरूप होण्याची इच्छा प्रदर्शित करतो. ह्या मुद्रेस चिनमुद्रा म्हणतात. मनामध्ये नामस्मरण करताना, जपमाळ मल्या बोटावर ठेवावी जे सत्व गुणाच प्रतिनिधित्व करते आणि अंगठयाचे टोक मण्यावर ठेवून एकेक मणी फिरवावा आणि तर्जनी जी जीवाचे प्रतिक आहे तिला गुणांपासून बाजूला. ह्या प्रक्रियेत जरी चुकुन तर्जनीचा मल्या बोटाला स्पर्श झाला तरी त्याला सात्विक गुणांचा लाभ होईल. बाकी इतर गुणांचा नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *