तुम्ही तुमचे वचन पाळा
तुम्ही तुमचे वचन पाळा.
गदाई म्हणाला, धानी ही मला भिक्षा देणारी माता असली पाहिजे प्रत्येकजण “नाही” म्हणाला, परंतु गदाई ऐकण्यास तयार नव्हता. शेवटी सर्वांना त्याचे म्हणणे मान्य करावे लागले .
वयाच्या नवव्या वर्षी गदाईची मुंज होणार होती. त्याचा सर्वात मोठा भाऊ रामकुमार कुटुंबप्रमुख होता. तो सर्व व्यवस्था करीत असे. परंतु गदाई म्हणाला या समारंभानंतर लोहाराच्या जातीच्या बाईकडून तो प्रथम भिक्षा घेईल. तिने गदाईच्या जन्माच्या वेळी चंद्राला मदत केली होती. म्हणून तो तिला त्यावेळच्या पद्धतीप्रमाणे आई म्हणत होता. रामकुमाराने आक्षेप घेतला कारण खुदीरामाच्या कुटुंबात अशी पद्धत होती की केवळ ब्राह्मण कुटुंबातील स्त्रीनेच ‘आई’ म्हणून प्रथमतः ब्राह्मण मुलाला भिक्षा घालायची.
परंतु गदाई म्हणाला, “ते व्हायलाच पाहिजे. मी धनीला वचन दिले आहे की मी तिला आई म्हणेन व सर्वप्रथम तिच्याकडून भिक्षा स्वीकारीन. “मी माझे शब्द मागे घेऊ शकत नाही.” ज्यावेळी गदाई लहान होता, त्यावेळी एक दिवस धनीने विचारले होते की ज्यावेळी तुझी मुंज होईल त्यावेळी तू माझा प्रथम भिक्षा घालणारी आई म्हणून स्वीकार करशील का? गदाईने हो असे उत्तर दिले होते आणि हे जणू काही वचनच होते. त्यावर असा वाद घालण्यात आला की अशी वचने निरर्थक असतात. परंतु गदाईने खंबीर धोरण स्वीकारले. जर त्याने शब्द मोडला असता तर ते असत्याचे आचरण झाले असते.
म्हणून सगळ्यांना ते मान्य करावे लागले. समारंभ झाला. धनी प्रथम भिक्षा घालणारी आई ठरली. धनीला केवढा म्हणून आनंद झाला !
मुंज झाल्यानंतर गदाईला रघुवीर आणि सीतालाची पूजा करण्याची परवानगी मिळाली.हे काम त्याला अतिशय आवडे. पूजा करीत असताना रघुवीराच्या विचारात तो इतका गढून जाई की बाह्य जगाचे त्याला भान राहात नसे आणि त्याच्या स्वतःच्या हृदयातच परमेश्वराचे दर्शन त्यास होत असे.
प्रश्न
- गदाईला कोणाकडून प्रथम भिक्षा स्वीकारण्याची इच्छा होती?
- रामकुमारानी त्याच्यावर का आक्षेप घेतला?
- त्यावर गदाईचे काय उत्तर होते?
- या गोष्टीमधील गदाईचे दोन सद्गुण सांगा.