अनुभवजन्य ज्ञान – ह्या वर्ग उपक्रमाचा काय फायदा होतो.
वर्गातील सर्व मुलांना खात्रीने ह्या उपक्रमात सहभागी होता येते.
ह्या उज्ज्वल विचार करण्याच्या अभ्यासामुळे प्रतिबंधात्मक अडथाळ्यांविना वा मर्यादित विचार प्रक्रियांविना सर्जनशील विचार प्रक्रियेस चालना मिळते. आणि कल्पना, संकल्पनांचा मुक्त प्रवाह वाहू लागतो.
उज्वल विचार करण्याच्या’ टप्प्यानंतर मन मापन आणि वेब चार्टिंग पध्दतशीर अभ्यास आणि प्रक्रिया करण्यास सहाय्य करते. मुलांना विविध शीर्षकाअंतर्गत शब्दांचे गट बनविण्यास सांगितल्याने सुसंघटित विचार प्रक्रियेस उत्तेजना दिली जाते.
हा अभ्यास मुलांना त्यांच्या विचारांमध्ये सुसूत्रता, सुसंघटितता आणण्यास तसेच त्यांचे कार्य पद्धतशीरपणे करण्यास सक्षम बनवतो.
ते विचार मंथन करायला, बारकाईने अभ्यास करायला शिकतात. व अखेरीस उत्तम परिस्थितीप्रत पोहोचतात.
शिवाय हा उपक्रम सहकार्य, समन्वय, कल्पनांची देवाण घेवाण आणि तर्कशुध्द विचार प्रक्रिया ह्या सर्व गोष्टींना चालना देतो.