सम्बंधित कथा

Print Friendly, PDF & Email
श्री गणेश- कथा- बाबांच्या दिव्य संदेशांमधून
गणपतीची सर्वश्रेष्ठता

एकदा गणपती आणि सुब्रमण्यम ह्यांचे मातापिता पार्वती आणि परमेश्वर ह्यांना पुत्रांच्या बुध्दिमत्तेची कसोटी घेण्याची इच्छा झाली. त्यांनी त्या दोघांना बोलावले व दोघांना पृथ्वी प्रदक्षिणा घालण्यास सांगितले. दोघांपैकी कोण प्रथम पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करतो हे त्यांना पाहायचे होते. दोघांमधील ज्येष्ठ पुत्र गणपती त्याच्या जागेवरून हलला नाही. पुत्र सुब्रमण्यम त्याच्या मयूरावर बसून पृथ्वी प्रदक्षिणेस निघाला महत्प्रयास करून त्याने प्रदक्षिणा पूर्ण केली. व त्याच्या पालकांकडे गेला. दूरवरून त्याला येताना पाहून गणपतीने त्याच्या मातापित्यांना प्रदक्षिणा घातली व विजयी झाल्याचा दावा केला. माता पार्वतीने त्याला विचारले, “गणपती, एक तुझा भाऊ जो पृथ्वी प्रदक्षिणेस गेला व दुसरा तू, जो ह्या जागेवरून हललाही नाही. तू कोणतेही प्रयत्न केले नाहीस. तू पृथ्वी प्रदक्षिणा केल्याचा दावा कसा करू शकतोस? गणेश उत्तरला,” माते, हे विश्व जड आणि चैतन्याचा संयोग आहे.- पिता आणि माता ह्यांचा संयोग. जेव्हा मी तुम्हाला प्रदक्षिणा घातली तेव्हा मी पृथ्वी प्रदक्षिणा केली कारण तुम्ही ह्या विश्वाचे माता पिता आहात. विश्वामध्ये असे कोणतेही स्थान नाही जेथे तुम्ही दोघे विद्यमान नाही. मी तुमचे विश्वव्यापकत्व पाहतो. तुम्हाला दोघांना प्रदक्षिणा घालून मी पृथ्वी प्रदक्षिणेचा दावा करू शकतो. त्याने हे शब्द उच्चारता क्षणीच ईश्वर (शिव) त्याच्या पुत्राच्या तीव्र बुद्धीमत्तेने थक्क झाले. त्याने दिव्य पालकांचे सत्य जाणले होते. ईश्वर म्हणाले, “विनायका! तू सर्वांसाठी एक आदर्श पुत्र आहेस. माझे पूजन करण्या आगोदर सर्वजण तुझे पूजन करतील. मी तुझ्यापुढे बुध्दीमान नाही. आम्ही तुझे पालक असून तुझ्याहून अधिक बुध्दीमान नाही. ईश्वराने घोषित केले,” माझ्याकडे अनेक गुण आहेत. परंतु तुझ्यासारखी बुद्धीमत्ता नाही. म्हणून माझे पूजन करण्या आगोदर सर्व लोकांनी तुझे पूजन करावे, असे मी तुला वरदान देतो.”

Sai Baba, SS. 10/98, pp. 255-256

विनायकास फुले आणि दुर्वाचे अर्पण

ज्याला काहीही मूल्य नाही अशी रुईची फुले गणपतीला वाहतात. ती फुले त्याला प्रिया आहेत. ती फुले खाल्ली तर , जो ही फुले खातो तो भ्रमिस्ट / वेडसर होतो असे म्हणतात. अशी फुले विनायकाला अर्पण करतात. तसेच विनायकास दूर्वाही वाहतात.

Sai Baba, SS, 10/95. p. 256

विनायकास दुर्वा अर्पित करतात त्याची गोष्ट

एक पौराणिक खथेत असे सांगितले आहे की, एकदा शिव आणि पार्वती सारीपाट खेळात होते. कोणत्याही खेळासाठी एक पंच नेमला जातो, जो विजयी खेळाडूस घोषित करतो. शिव आणि पार्वती नंदीस पंच म्हणून मान्यता दिली व नंदी शिवाचे वाहन असल्यामुळे शिवास प्रिया आहे. खेळामध्ये शिव हरले असूनही नंदी त्यांना विजयी घोषित करतो. नंदीच्या पक्षपाती निर्णयाने पार्वती क्रोधीत होऊन नंदीस शाप देते की तो असाध्य रोगाने मृत्यू पावेल. नंदी पार्वतीच्या चरणांवर लोळण घेऊन क्षमायाचना करतो, “मते! मला क्षमा कर. माझ्या स्वामीप्रती मी किमान एवढी कृतज्ञता तरी दाखवायला नको का? माझे स्वामी खेळामध्ये हरले हे घोषित करणे किती अवमानकारक आहे. त्यांचा मान राखण्यासाठी निःसंशयपणे मी असत्य कथन केले. अशा ह्या क्षुल्लक चुकीसाठी मला एवढी कडक शिक्षा देवी दिलीत? अशा तर्हेने नंदीने क्षमा याचना केली. पार्वतीने त्याला क्षमा केली आणि त्याच्या चुकीबद्धल प्रायश्चित कसे ज्ञावे हे समजावून सांगितले. ती त्याला म्हणाली, “भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी माझ्या पुत्राचा जन्मदिवस साजरा केला जातो. त्या दिवशी, तुला जे अत्यंत प्रिय आहे (हिरवे गवत / हरितकी) ते तू माझ्या पुत्रास अर्पण कर. ह्याचा अर्थ असा आहे की जर एकाध्यास त्याच्या पापाचे प्रायश्चित द्यायचे असेल तर त्याने स्वतःला अत्यंत प्रिय असलेली गोष्ट परमेश्वरास अर्पण केली पाहिजे. असे केल्याने पापक्षालन होते. नंदीसाठी हिरव्या गर गवताचा चारा अत्यंत प्रिय आहे. पार्वतीने सांगितल्यानुसार नंदीने हिरवे गवत अर्पण करून गणपतीचे पूजन केले व त्याची असाध्य रोगातून मुक्तता झाली. त्याची आरोग्य प्रकृती सिद्धरली व पार्वतीच्या कृपेने तो पापमुक्त झाला.

Sai Baba, SS, 10/95, p. 256

कथेचा प्रतिकात्मक अर्थ

गया, बनारस वा इतर तीर्थक्षेत्रांना भेट दिल्यावर, आपल्याला अत्यंत प्रिय असलेली गोष्ट परमेश्वरास अर्पण करण्याची प्रथा ह्या प्रसंगामुळे सुरु झाली. ह्याचा अर्थ की त्यांनी आपल्याला प्रिय असणाऱ्या गोष्टीचा त्याग केला पाहिजे. अशा कोणत्या गोष्टीचा नव्हे की जी त्यांना आवडत नाही. जे फळ अथवा जी भाजी तुम्ही परमेश्वराला अर्पण करण्यासाठी सोडणार आहात ती तुमच्या आवडीची असली पाहिजे. ह्याचा अर्थ असा की ती भाजी वा फळ परमेश्वरास अर्पण केल्यानंतर तुम्ही ती खाण्यात वर्ज केली पाहिजे. जे यात्रेकरू, गंगा, यमुना ह्या नद्यांमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी, बनारस, प्रयाग वा इतर तीर्थक्षेत्ररांना भेट देतात त्यांच्यामध्ये खूप प्राचीन कालापासून ही प्रथा रूढ़ झाली आहे.
लोकांनी आपल्याला सर्वात प्रिय असलेली गोष्ट,सर्वोत्तम समर्पण म्हणून परमेश्वरास अर्पित केली पाहिजे परंतु ते त्यांना आवडत नसलेली गोष्ट अर्पित करतात. हृदयातील परमेश्वर म्हणतो, “तथास्तु!” जे तुम्हाला सर्वाधिक प्रिय आहे ते अर्पित न करता जे तुम्हाला अजिबात आवडत नाही ते तुम्ही अर्पण केलेत, परमेश्वरही तुम्हाला तेच देईल, जे तुम्हाला अजिबात आवडत नाही. अशा ह्या शंकास्पद समर्पणाच्या बदल्यात परमेश्वर तुम्हाला आरोग्याच्या ऐवजी व्याधी भेट देईल. जे चांगले आहे ते जर तुम्ही परमेश्वराला दिलेत तर तो तुम्हाला तुमच्यासाठी जे चांगले आहे ते देणार नाही का?”

Saibaba SS10/95 P-257

जे तुम्हाला अत्यंत प्रिय आहे ते गणेशाला अर्पित करा.

ज्या गोष्टी परमेश्वराला आनंदीत करतील, त्या तुम्ही त्याला अर्पण करा. हेच पार्वतीने नन्दीश्वराला बजावून सांगितले. ती त्याला म्हणाली, “माझ्या पुत्राला जे आनंदीत करेल ते व जे तुला सर्वाधिक प्रिय आहे ते तू त्याला अर्पण कर. विनायकास अशा प्रसन्न करणाऱ्या गोष्टी अर्पण करण्यासाठी गणेश उत्सव साजरा” केला जातो.

Sai Baba SS 9/97 P-238

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाला काय अर्पण कराल?

विनायक चतुर्थीच्या दिवशी तुम्ही विनायकास काय अर्पण केले पाहिजे. आजकाल लोकं परमेश्वरास विविध फळे व पदार्थ अर्पण करण्यासाठी भरपूर पैसे खर्च करतात. हे सर्व अर्पण केवळ विधी म्हणून केले जाते. शेवटी ते सर्व स्वतःच खातात. हे सर्व अर्पण केल्याने कोणताही लाभ होत नाही. पत्रं, पुष्पं, फलं, तोयं- ह्या चार गोष्टी परमेश्वराला अर्पण कराव्यात.

येथे पत्रं (पान) म्हणजे देह. हा देह कोणत्याही क्षणी नाश पावू शकतो. म्हणून कधीही देहाविषयी आसक्ती विकसित न करता तो परमेश्वरास अर्पण करा. पुष्पं (फुल) म्हणजे ह्रदय, असे फुल जे कधी कोमेजत नाही. मनाची तुलना फलं म्हणजे फळाशी आणि तोयं म्हणजे आनंदाश्रू ह्यांच्याशी केली जाऊ शकते. “हे सर्व परमेश्वरास अर्पण केले पाहिजे. ह्या अर्पणाची परमेश्वरास अपेक्षा आहे.”

Sai Baba,SS10/99 P-257

विशेष अर्पणाचे महत्त्व

गणेशाला अर्पण केल्या जाणाऱ्या विशेष पदार्थाना खूप महत्त्व आहे कारण ते डाळीचे पीठ आणि गूळ वा काळी मिरी ह्यापासून बनवले जाते व त्याचे आवरण पीठापासून बनवून ते तेलाचा वापर न करता वाफेवर शिजवले जाते. आयर्वेदानुसार हा पदार्थ अत्यंत आरोग्यदायी व रुचकर आहे. आधुनिक काळातील डॉक्टरही वाफेवर उकडलेल्या इडलीचे महत्त्व जाणतात. त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रुग्णांच्या आहारात ह्या पचनास हलक्या असणाऱ्या पदार्थाचा समावेश करण्यास सांगतात. वात नियंत्रण करणे हा गुळाचा गुणधर्म आहे. हे पदार्थ नेत्रविकार आणि वातविकार ह्यापासून मुक्ती देतात. प्राचीन परंपरेनुसार उत्सव साजरे करताना देह आणि मनाच्या आरोग्यसंपन्नतेवर विशेष भर दिला आहे. आध्यात्मिक मार्गाचा पाठपुरावा करण्यासाठी आरोग्यपूर्ण देह व मन पूर्वापेक्षित आहे. मानवी जीवनाची, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही चार ध्येये साध्य करण्यासाठी मूलतः शरीर निरोगी, निरामय असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला उचित (धर्म)मार्गाने धन अर्जित करायचे असेल आणि मनामध्ये मुक्तीप्रत नेणाऱ्या इच्छा असतील तर तुमचे आरोग्य उत्त्तम असले पाहिजे.”

Sai Baba-SS 10/94 P-265

“तेलविरहित पदार्थ पचनास हलके असतात असे लक्षात आले आहे. तिळाच्या सेवनाने शरीरातील कफ, पित्त व वात ह्यांचे दुष्परिणाम कमी होतात. पदार्थामधील गूळ हा दृष्टि सुधारण्यासाठी हितकारक आहे. हे सर्व पदार्थ परमेश्वरास प्रसन्न करण्यासाठी बनवले जात नसून आरोग्य वृध्दीच्या हेतूने बनवले जातात. ह्या पदार्थांपासून मिळणारी ऊर्जा दीर्घायुष्य लाभण्यासाठी उपयुक्त ठरते.”

Sai Baba SS 10/98 P-255

[http:// www.ssso.net/ganesh/gan1.htm]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *