मनोजवं श्लोका – उपक्रम

Print Friendly, PDF & Email
मनोजवं श्लोक – उपक्रम

उपक्रमाचे उद्दिष्ट – बालविकास गट १ च्या मुलांना नामस्मरणाचे महत्त्व आणि परमेश्वराचे नाम आपले निरंतर रक्षण करते आणि अत्यंत अवघड कार्य पूर्ण करण्यास आपणास कसे सहाय्य करते हे समजावून देणे.

साहित्य – मणी, दोरा, कात्री

जपमाळ बनवण्याचा उपक्रम

गुरुंनी हनुमनाच्या जीवनातील कथा मुलांना संगाव्यात व त्याने श्रीरामांचे नाम घेऊन अत्यंत अवघड कार्ये कशी पार पाडली हे समजावून ध्यावे. त्याचबरोबर मुलांना हे ही समजावून सांगावे की आपण हाती घेतलेले एखादे कार्य सहजतेने व आत्मविश्वासाने पार पाडण्यासाठी, परमेश्वराचे नाम आपल्याला धैर्य दृढ़निर्धार व बुद्धी देते.

  1. २७ मण्यांचे वाटप करावे. (त्यातील २६ मणी एका आकाराचे नेहमीचे मणी असावेत व एक गुरु मणी आकाराने थोड़ा मोठा वा आकाराने सारखा मणी असेल तर वेगळ्या रंगाचा असावा) त्याबरोबर प्रत्येक मुलाला दोराही द्यावा.
  2. ते २७ मणी दोऱ्यात ओवण्यासाठी एक सपाट व स्वच्छ पृष्ठभागावर ठेवण्यास सांगावे.
  3. दोरयाच्या शेवटी गाठ मारावी. व मुलांना त्या दोरयामध्ये मणी ओवण्यास सांगावे.
  4. मुलांना प्रत्येक मणी ओवताना शांतपणे सतत जय श्री राम उच्चारणयास सांगावे.
  5. २६ मणी ओवून झाल्यानंतर, २७ वा गुरु मणी ओवून गोंडा लावण्यासाठी गुरुंनी मुलांना मदत करावी.

उपक्रमावर आधारित प्रश्नावली
  1. तुम्हाला हा उपक्रम आवडला का?
  2. तुम्ही बनवलेली जपमाळ सकारात्मक ऊर्जेने संभारीत झाली आहे असे तुम्हाला वाटते का? का?
  3. जेव्हा आपण परमेश्वराचे नाम घेऊन एखादे कार्य करतो तेव्हा काय घडते?

येथे ह्या सम्पूर्ण उपक्रमादरम्यान पूर्ण लक्ष परमेश्वराच्या नामोच्चारणावर केंद्रित असायला हवे. वर्गाच्या अखेरीस जपमाळ मुलांना देऊन त्या देवघारामध्ये (वेदिकेवर) ठेवण्यास सांगावे. मुलांना देखील त्यांच्या पसंतीनुसार कोणत्याही एका मंत्राचे २७ वेळा उच्चारण करण्यास सांगावे – गायत्री मंत्र, ॐ श्री साई राम वा ॐ नमः शिवाय, जय श्रीराम इ. मुलांना विशिष्ठ दिवशी विशिष्ठ मंत्राचे उच्चारण करण्यासाठी तुम्ही सांगू शकता उदा. गणेश चतुर्थीच्या दिवशी जपमाळेच्या सहाय्याने २७*४ म्हणजेच १०८ वेळा श्री गणेशाय नमः ह्या मंत्राचे उच्चारण करण्यास सांगू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *