मनोजवं श्लोका – पुढील वाचन
मनोजवं श्लोका – पुढील वाचन
वायुपुत्र आजंनेय हनुमान् रामदूत म्हणून प्रसिद्ध आहे. अत्यंत आणीबाणीच्या वेळी त्याने संदेश पोचविला. त्यावेळी हनुमंताखेरीज अन्य कोणीही प्रसंग निभावून नेऊ शकला नसता, म्हणून तो राम दूत म्हणून माहीत आहे. रामाने इतर वानर हाताशी असताना त्याचीच दूत म्हणून निवड का केली? त्याचे कारण हनुमान् ‘बुद्धिमतां वरिष्ठं’ बद्धिमंत व्यक्तींमध्ये सर्वश्रेष्ठ होता हे आहे.
जेव्हा विभीषण रामप्रभूंना शरण गेला व युद्धामध्ये रामाचा पक्ष स्वीकारण्याची इच्छा त्याने प्रकट केली तेव्हा प्रभूंनी हनुमंताचा सल्ला विचारला होता. रामाने हनुमंताला विभीषणाचे काय करायचे असे विचारले होते.
जेव्हा लक्ष्मण मूर्छित पडला आणि द्रोणाचलावरून सूर्योदयाच्या आत संजीवनी वनस्पती आणायची होती तेव्हा मनाच्या वेगाने जाऊन द्रोणाचलावर पोहचून वेळेत परत येऊ शकेल असा फक्त एक हनुमानच होता. सीतेचा शोध करण्यासाठी समुद्र ओलांडायचा होता. तेव्हा एका प्रचंड उड्डाणात पलीकडे लंकेत पोचणारा केवळ हनुमानच होता.
पण हनुमंताने केलेले सर्वात आश्चर्यकारक काम म्हणजे त्याने भरताला पोहचविलेला संदेश होय, रामाला किश्किंधेला जाऊन सुग्रीवाचा पाहुणचार घेणे आवश्यक होते त्यामुळे त्याला अयोध्येला पोचायला विलंब होणार होता इकडे चौदा वर्षे वाट पाहिल्यानंतर भरत एक क्षणभरदेखील थांबायला तयार नव्हता. अग्निप्रवेश करुन जीवनाचा अंत करण्याचा बेतात तो होता, अशा आणिबाणीच्या क्षणी आणि इतक्या थोडक्या वेळात प्रवास कसन भरताचे प्राण वाचवू शकला तो हनुमानच! म्हणूनच त्याला पाठविण्यात आले आणि त्याने काम फत्ते केले.
असा शूर वीर होता हनुमान! म्हणूनच आपण रोज सकाळी त्याला वंदन केले पाहिजे.
हनुमानाची भक्ती
राज्याभिषेकानतर एक दिवस सीता आणि रामाचे तीन बधु भेटले व त्यानी रामाच्या सेवेतून हनुमंताला वगळण्याचा बेत केला रामाची सेवा आपणच वाटून घ्यावी अशी त्याची इच्छा होती हनुमंताला सेवा करण्याची पुरेशी संधी आधीच मिळाली आहे असे त्यांना वाटत होते, महणून त्यांनी पहाटेपासून रात्रीपर्यंत रामाची काय काय सेवा करावी लागते याची आठवून आठवून संपूर्ण यादी केली व त्यातली कामे आपआपसात वाटून घेलली. त्यांनी ती यादी व कामाचे वाटप प्रभूसमोर ठेवले. त्यावेळी हनुमान उपस्थित होता. रामाने या नव्या कार्यपद्धतीसंबधी ऐकले, ती यादी वाचली आणि हसून संमती दिली. त्याने हनुमंताला सागितले की सर्व कामे इतरांवर सोपविण्यात आली आहेत तेव्हा आता तू. विश्रांती घ्यावीस हनुमंताने विनती केली की ती यादी वाचण्यात यावी. ते केल्यानतर एक काम राहिले आहे असे त्याच्या लक्षात झाले, ते काम म्हणजे जांभई आली असता चुटक्या वाजविणे हे होते. राम सम्राट असल्याने अर्थातच त्याला हे काम स्वतः करू देणे उचित नव्हते! ते काम नोकरानेच करायला हवे अशी त्याने विनंती केली. हे काम हनुमंतावर सोपविण्याचे रामाने मान्य केले.
हे हनुमंताचे फारच मोठे सुदैव ठरले. कारण त्यामुळे सतत प्रभूंची सेवा करण्याचा अधिकार त्याला प्राप्त झाला. कोणाला केव्हा जांभई येईल हे कोण सागू शकणार? आणि त्याला सतत प्रभूच्या मनोहर मुखाकडे पाहात राहावे लागणार, जाभई आली की चुटकी याजवायला तयार हवे ना! एक मिनिटसुद्धा तो दूर जाऊ शकत नव्हता की क्षणाची विश्रांती घेऊ शकत नव्हता. प्रभूची सेवा करण्यासाठी सतत त्याच्या संनिध राहायला निळाले तर तुम्ही आनदी झाले पाहिजे आणि त्याच्या आज्ञा पालन करण्यासाठी नेहमी दक्ष असले पाहिजे.