Meaning and प्रतीकात्मकता

Print Friendly, PDF & Email

Meaning and प्रतीकात्मकता

शिवरात्री

‘शिवरात्री’ म्हणजे ‘मंगल रात्र’. दर महिन्याच्या कृष्ण पक्षातील १४वा दिवस म्हणजे शिवरात्र होय. माघ (फेब्रुवारी-मार्च) महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीस महाशिवरात्र म्हटले जाते.

शिवरात्र ‘मंगल रात्र’ का मानली जाते? चंद्राला १६ कला असतात त्याचप्रमाणे मनालाही १६ कला असतात. शिवरात्रीच्या दिवशी १५ कलांचा लय होतो आणि केवळ १ उरते. मनाला ईश्वराभिमुख करून ती उरलेली एक कला दिव्यत्वामध्ये लय पावू शकते. ह्या दिवशी परमेश्वराचे चिंतन करून मनावर पूर्ण नियंत्रण ठेवणे शक्य होते. म्हणून शिवरात्री मंगल दिन मानला जातो.

शिवमंदिरास भेट, शिवलिंगास पंचामृताचा (दूध, दही, तूप, साखर आणि मध) अभिषेक आणि शिवलिंगास बिल्वपत्रे वाहणे हया धार्मिक प्रथांचे पालन करून शिवरात्री साजरी केली जाते. लोक दिवसा आणि रात्री उपवास करतात आणि भजन, नामसंकीर्तन करून पूर्ण रात्र जागरण करतात.

प्रतीकात्मकता

लिंग हे आदि अंत रहित आणि अनंताचे प्रतीक आहे. कारण त्याला अवयव नाहीत, चेहरा नाही, मागील पुढील अंग नाही तसेच त्याला सुरुवात नाही आणि शेवटही नाही.

‘लिं’ हा शब्द लियतेचे प्रतिनिधीत्व करतो (ज्यामध्ये सर्व नामरुपे लय पावतात) आणि ‘ग’ हा शब्द गम्यतेचे प्रतिनिधित्व करतो. सर्व नामरुपे परिपूर्ततेसाठी ज्याच्या दिशेने पुढे जातात.

उपवास म्हणजे अन्न वर्ज्य करणे. उपवासाचा शब्दशः अर्थ आहे की परमेश्वराच्या निकट रहाणे. (उप – निकट वास – रहाणे) उपवास केल्यावर, मनावर नियंत्रण ठेवणे आणि त्याला ईश्वराभिमुख करणे अधिक सोपे जाते. परमेश्वराच्या निकट राहणे हयाचा अर्थ आपले विचार, उच्चार आणि आचार अत्यंत शुद्ध आणि पवित्र असायला हवेत. नुसते अन्न वर्ज्य करणे म्हणजे उपवास नव्हे.

जागरण म्हणजे विचार, उच्चार आणि आचार ह्याविषयी जागरूकता.

बिल्वपत्र हे सत्व, रजस आणि तमस ह्या त्रिगुणांचे प्रतीक आहे. मनुष्याने विवेक, भक्ती आणि वैराग्य ह्याच्याद्वारे त्रिगुणा पलीकडे गेले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: