ध्यानाचे ज्ञान – बालविकास गुरुंसाठी संदर्भ

Print Friendly, PDF & Email
ध्यानाचे ज्ञान – बालविकास गुरूंसाठी संदर्भ
प्रार्थना विरुद्ध ध्यान

“परिपुर्तीसाठी दोन मार्ग आहेत: प्रार्थना आणि ध्यान. प्रार्थना तुम्हाला परमेश्वर चरणी दीन याचक बनवते. ध्यान परमेश्वरास तुमच्याकडे येण्यास प्रवृत्त करते व त्यांच्यापर्यंत उन्नत होण्यास तुम्हाला प्रेरित करते. एकास निम्न स्तरावर आणि दुसऱ्यास उच्च स्तरावर असे न करता तुम्हा दोघांना एकत्र आणण्याकडे त्याचा कल असतो” (सत्य साई स्पीक्स ५ ‘Lamps lit from the same flame’)

ध्यानाचे प्रशिक्षण

“कोणीही व्यक्ती दुसऱ्याला ध्यानाचे प्रशिक्षण देऊ शकतो का? किंवा प्रशिक्षित करण्याचा दावा करू शकतो का? एखाद्यास शारीरिक पवित्रा, विशिष्ठ ढब, पाय, पावले, हात, मान, डोके वा पाठ इ. ची विशिष्ठ स्थिति तसेच श्वासाचा वेग व श्वास घेण्याची पद्धत इ. गोष्टी शिकवणे शक्य आहे परंतु ध्यान ही एक आंतरीक प्रक्रिया आहे; ह्यामधून ध्वनित होणारी परम शांतीची अनुभूती व्यक्तिनिष्ठ असते. ह्यामध्ये मन रिक्त करून ते अंतरंगातील दिव्यत्वाचा स्फुल्लिङ्गामधून उद्दभवणाऱ्या तेजाने भरून टाकले जाते. ही गोष्ट अशी आहे की कोणतेही पाठ्यपुस्तक तुम्हाला हे शिकवू शकणार नाही व कोणताही ध्यानाचा वर्ग तुम्हाला हे सांगू शकत नाही.” (सत्य साई स्पीक्स VII, ‘Questions Answered’)

“तुम्ही ध्यान आणि जप ह्यामध्ये प्रगती करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही तसेच एखाद्या संताशी संपर्क साधून त्यांच्याकडून जपासाठी मंत्रदीक्षा घेण्याचीही गरज नाही. तुमच्या अंतर्यामी वास करणाऱ्या परम्मेश्वराची प्रार्थना करा, तुम्हाला मार्गदर्शन मिळेल.” (सत्य साई स्पीक्स VII, ‘The Commentary on the message’)

ध्यानाचे वेळपत्रक

पहाट होण्या आगोदरची वेळध्यानासाठी सर्वोत्तम आहे. (पहाटे ३-६, ‘पहाटे ४.३० ते ५. १५ शुभ काल’) (सत्य साईं स्पीक्स VI, ‘Eyelids and the Pupil’)

ध्यानामध्ये सातत्य राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वामींनी तिन्हीसांजेसही काही मिनीटेध्यान करावे असे सुचवले आहे.

रूपावरील ध्यानावर स्वामींचा उपदेश

विद्यार्थ्यांनी, ज्योत, मूर्ती व फोटो ह्यासारख्या कोणत्याही वस्तूकडे डोळ्याची पापणीही न लवू देता पूर्ण एकाग्रतेने लक्ष केंद्रित करून १२ सेकंद पाहावे असे स्वामींनी त्यांना सांगितले. ह्याला धारणा म्हणतात १२ धारणांनी एक ध्यान बनते. ह्याचा अर्थ असा आहे की ध्यानाचा कालवधी १२ x १२ =१४४ सेकंद असावा.

योग्य तऱ्हेने केलेल्या ध्यानाचा कालावधी २ मिनीटे २४ सेकंदाहून अधिक असणे आवश्यक नाही.

अशी १२ ध्याने ही एका समाधीसमान आहेत. १२ x १४४ = २८ मिनीटे ४८ सेकंद,

तथापि, ह्याचा अर्थ असा नाही की काही मिनीटे वा काही तास बसण्याने ध्यान झाले. परमेश्वराचे सदा सर्वत्र चिंतन होणे आवश्यक आहे.

श्री रमण अनुस्वार हवा एकदा विचारण्यात आले, “ध्यान किती वेळ करणे आवश्यक आहे? १५ मि., ३०मि. ४५ मिनीटे वा एक तास ?” त्यांनी सांगितले, “तुम्ही ध्यान करत आहात ह्याचे विस्मरण होईपर्यंत तुम्ही ध्यान सुरु ठेवले पाहिजे. जोपर्यंत तुम्ही ध्यान करत आहात ही दैहिक जाणीव तुमच्यामध्ये असते तोपर्यंत ते ध्यान नाही.”

तुमचा देह आणि मन ह्यांची जाणीव व तुमचे विचार पूर्णतया लुप्त झाले पाहिजेत. केवळ ज्यावर ध्यान केले जाते त्या वस्तूच्या अस्तित्वाची म्हणजेच अन्य काही नसून दिव्यत्वाच्या अस्तित्वाची अनुभूति असावी. ध्यानावस्था म्हणजे तुम्ही अनुभूती घेत आहात ह्या जाणिवेशिवाय घेत असलेली अनुभूती.

ध्यानासाठी पवित्रा

ध्यानाला बसण्यासाठी तुम्ही प्रार्थनेसाठी वापरत असलेले विशेष आसन/ कापड/ उशी घ्यावी. हे आसन शरीरातील विधुतप्रवाह आणि भूमी ह्यांच्यामधील विद्युतरोधनाचे कार्य करते. पाठीचा कणा ताठ ठेवून सरळ बसा कारण “जेव्हा शरीर ताठ व शांत असते तेव्हा मनही सरळ आई शांत असते. जर तुम्ही तुमच्या देहावर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या मनावर कसे नियंत्रण ठेवू शकणार?” हात शिथिल करण्याच्या दोन पध्दती आहेत. अ) एका हाताचा तळवा दुसऱ्या हाताच्या तळव्यावर ठेवून ते मांडीवर ठेवा आणि दोन्ही हातांच्या अंगठ्यांची टोके जुळवा किंवा ब) तुमचे हात गुडघ्यांवर ठेवा. तळवे उघडून बोटे चिन्मुद्रेत ठेवा सोहमच्या उच्चारणासाठी श्वासाचे नियमन करताना “जीभेचे टोक हळूवारपणे दातांच्या मागील बाजूस लावा.” (सत्य साई स्पीक्स XI, ‘Bhakti, stage by stage’)

(Source; http://www.sathyasai.org/devotion/meditation.html)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: