आठवणींची आगगाडी

Print Friendly, PDF & Email
उद्दिष्ट
  1. ‘तीर्थयात्रा’ हा एक सांघिक उपक्रम असून, यांत मुले मनानेंच यात्रेला जातात व ते विविध तीर्थक्षेत्र आणि त्यांच्याशी संबंधित देव-देवतांना भक्तीभावाने आणि श्रद्धेने आठवतात.
  2. आपल्या वैविध्यपूर्ण आणि समृद्ध वारशाबद्दल या खेळात भर देण्यात आला आहे.
संबंधित मूल्ये
  • कल्पनाशक्ती
  • एकाग्रता
  • स्मरणशक्ती
  • भक्तिभाव
  • कुतूहल/ जिज्ञासा
खेळ कसा खेळायचा
  1. गुरु मुलांना गोल करून बसायला सांगेल.
  2. ती मुलांना उदाहरण देऊन हा खेळ कसा खेळायचा हे समजावून सांगेल.
  3. पहिला मुलगा म्हणेल, “मी यात्रेला पुरीला गेलो होतो आणि मला भगवान जगन्नाथांचे दर्शन झाले.”
  4. या पद्धतीने खेळ पुढे चालत राहील आणि प्रत्येक मूल पवित्रस्थान आणि त्याच्याशी जोडलेली देवता यांची नांवे सांगेल.
  5. मुलांनी आधीच सांगितलेल्या तीर्थक्षेत्राचे नांव जर एखाद्या मुलाने पुन्हा घेतले, किंवा त्याने कोणत्या स्थळाला भेट दिली, हे नंतर तो विसरला, तर तो मुलगा खेळातून बाद होईल.
गुरुंसाठी सूचना
  • हा खेळ खेळून झाल्यावर त्या तीर्थक्षेत्रांच्या महत्त्वाबद्दल वर्गात चर्चासत्र घेता येईल.
  • जर पूर्वी मुलांनी अशा पवित्र मंदिरांना प्रत्यक्ष भेट दिली असेल, तर ते आपला स्वतःचा अनुभव वर्गात सांगू शकतात.
  • हा खेळ ऑनलाइन पण चांगल्याप्रकारे खेळता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *