मुरली मनोहर श्याम मुरारी
भजनाचे बोल
- मुरली मनोहर श्याम मुरारी
- गोपाला साई गोपाला (२)
- राधा लोला हरे गिरिधारी
- गोपाला साई गोपाला(२)
अर्थ
हे भगवान कृष्णा, तुला आम्ही नमन करतो. हे राधेच्या प्रियतमा, तुला मुरली वादन अत्यंत प्रिय आहे.
स्पष्टीकरण
मुरली मनोहर श्याम मुरारी | हे सुंदर नीलवर्ण भगवान! अधरांवर मुरली असलेले तुझे रूप अत्यंत सुंदर दिसते. मुरा नावाच्या दैत्याचा तू वध केलास. मायेचा नाश करणारा तू, अत्यंत मोहक आणि अनंत आहेस. |
---|---|
गोपाला साई गोपाला (२) | वृंदावनातील गाईंची राखण करणाऱ्या हे भगवंता! तुझ्याशी ऐक्य होईपर्यंत तू आमच्या आत्म्यांचे रक्षण करतोस! साई कृष्णाच्या रूपाने भूतलावर आलेला तू आणि कृष्ण एकच आहात. |
राधा लोला हरे गिरधारी | हे प्रभु! तुझी महान भक्त असलेल्या राधेच्या प्रियतमा! गोपीजनांच्या संरक्षणासाठी तू गोवर्धन पर्वत उचललास! तू आमचा सनातन संरक्षक आहेस! राधेचे तुझ्या प्रति असलेले प्रेम देऊन तू आम्हाला आशीर्वादित कर. |
गोपाला साई गोपाला(२) | वृंदावनातील गाईंची राखण करणाऱ्या हे भगवंता! तुझ्याशी ऐक्य होईपर्यंत तू आमच्या आत्म्यांचे रक्षण करतोस! साई कृष्णाच्या रूपाने भूतलावर आलेला तू आणि कृष्ण एकच आहात. |
राग: सिंधू भैरवी
श्रुती: डी (पंचम)
ताल: कहरवा किंवा आदि ताल – आठ मात्रा
Indian Notation
Western Notation
Adopted from : https://archive.sssmediacentre.org/journals/vol_14/01AUG16/Radio-Sai-Bhajan-Tutor-Murali-Manohara-Shyam-Murari.htm