नागमहाशय
नागमहाशय
नागमहाशय हे अहिंसा या नितीनियमाचे पालन करणारे जिवंत उदाहरण आहे. “दुखापत न करणे हा सर्वात मोठा गुण आहे” ज्यानी जीवनात हे शब्द: पाळले.
नागमहाशयांना कोणत्याही प्राण्यांचा त्रास बघवत नसे. त्यांच्या घराशेजारी एक छोटा तलाव होता. दरवर्षी पुरात बरेचसे मासे त्यात येत असत. एक दिवस एका कोळ्याने काही मासे पकडले आणि रिवाजाप्रमाणे तो नागमहाशयांना त्यांचा वाटा देण्यास आला. टोपलीत तडफडणाऱ्या माशांना पाहून नागमहाशयांना अतिशय वाईट वाटले. लगेच त्यांनी त्या कोळ्याने मागितलेली रक्कम त्याला दिली आणि माशांना पुन्हा तलावात सोडून दिले.
नंतर पुन्हा एक दिवस दुसऱ्या कोळ्याने त्या तलावातील मासे पकडले आणि विकायला त्यांच्याकडे आला. ह्यावेळी सुद्धा त्यांनी सर्व मासे विकत घेतले आणि पुन्हा तलावात सोडून दिले. कोळ्याला नागमहाशयांच्या वागण्याचे खूप आश्चर्य वाटले. जसे त्याला त्याची टोपली आणि पैसे मिळाले, तसे त्याने त्यांना वेडा समजून तिथून धूम ठोकली. नंतर तो कधी तिथे जवळपास फिरकलाही नाही.
नागमहाशय हे अहिंसा धर्माचे कट्टर समर्थक होते. ते विषारी सापही मारू देत नसत. एकदा एक विषारी कोब्रा त्याना त्यांच्या घराच्या बागेत दिसला. सगळेजण सतर्क झाले. त्यांच्या पत्नीने सापाला मारण्याचा सल्ला दिला. नागमहाशय तीव्र नकार देत म्हणाले, “खरंतर माणसाच्या मनातील साप त्याला मारतो. जंगलातील साप नव्हे.” त्यांनी हात जोडून सापाला विनंती केली, “तू मानस देवीचे मूर्त स्वरूप आहेस. तुझे वास्तव्य जंगलात असते. कृपा करून माझ्या गरीबाची झोपडी सोडून तुझ्या राहण्याच्या जागी परत जा.” चमत्कार असा की साप त्याचा फणा वाकवून त्यांनी दर्शविलेल्या दिशेला निघून गेला. नागमहाशय नेहमी म्हणत, “बाह्य जग हे स्वतःच्या मनाचे प्रतिबिंब असते. तुम्ही जगाला जसे द्याल, तसेच तुमच्याकडे परत येत असते. हे स्वतःस आरशात बघण्यासारखे आहे. तुम्ही जसा चेहरा दाखवाल, आरसा तुम्हाला तसेच प्रतिबिंब दाखवेल.”
प्रश्न:
- नागमहाशयांच्या सर्व प्राण्यांवरील दयेचे वर्णन करा