अदनूरचा नंदनार
अदनूरचा नंदनार
६० वर्षापूर्वी नंद नावाचा एक मनुष्य खालच्या जातीत जन्माला आला होता. तो शंकराचा मोठा भक्त होता.
अगदी बालवयात सुद्धा तो इतर मुलांसारखा नव्हता. तो देवांच्या मातीच्या मूर्तीींशी खेळायचा आणि त्यांच्याभोवती नाच करायचा. तो त्याच्या देवांच्या मिरवणुका काढायचा, उत्सव करायचा, अदनुरच्या शिवमंदिराच्या उंच कळसाकडे तो नेहमी आश्चर्याने बघायचा, देव हा अतिशय मोठा, भव्य आणि अदभुत आहे अशी त्याची श्रद्धा होती. देवाच्या दर्शनाचा त्याची इच्छा दिवसेंदिवस तीव्र होत गेली.
तो जसजसा मोठा होत होता तसतशी त्याची कल्पनाशक्ती, उत्साह आणि देवावरची श्रद्धा वाढत होती. देवाला आनंद होईल असे काहीतरी करावेसे त्याला वाटू लागले. पण खालच्या जातीचा गरीब मनुष्य देवाची सेवा कशी करणार? मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्याला परवानगी दिलीच नसती. एक दिवस त्याला एक नामी कल्पना सुचली. ‘मंदिराच्या नगाऱ्यांसाठी मी चामडे पुरवले तर ?” मग त्याने चामडे विकत घेतले. ते भिजवले, नरम गेले, ते योग्य त्या आकारात कापले आणि ते घेऊन तो नगारेवादकांकडे गेला.
त्याचे खेळ आणि मनोरंजनाचे साधन हेच होते. त्याला काही मित्र होते. ते त्याच्या उत्साहामध्ये सहभागी होत आणि त्याला सहानुभूती दाखवत. तो नेहमी देवाच्या माहात्म्याबद्दल बोलायचा, गीते म्हणायचा आणि अत्यानंदाने नाचायचा. आपल्याला देवळात जाता येत नाही, पवित्र शिवलिंग बघता येत नाही, कर्पूर उजळून आणि इतर सामग्री घेऊन लोक पूजा करतात ते दृश्य बघता येत नाही, या विचाराने त्याच्या गालावरून अश्रू ओघळायचे. काही वेळा ईश्वराच्या चिंतनात तो इतका मग्न व्हायचा की बाहेरच्या जगाचे भानही विसरायचा.
त्या दिवसापासून तो आपले आयुष्य नटराजाच्या चिंतनातच घालवू लागला. नटराजाचीच स्तोत्रे गायचा, शेतात काम करीत असतानाही नटराजाबद्दलच बोलायचा. तो ईश्वरचिंतनात इतका मग्न होऊन गेला की त्याचा त्याने ध्यासच घेतला. आता चिदंबरमला जाणे लांबणीवर टाकणे शक्यच नव्हते. तो त्याच्या ब्राह्मण मालकाकडे गेला आणि म्हणाला “मालक, मला चिदंबरमला जायची इच्छा आहे. मला एक दिवस जायची परवानगी द्या.” तो मालक अतिशय संतापला आणि ओरडला “अरे नीच माणसा चिदंबरमला जायचे आहे काय? तुला त्यासाठी मारलेच पाहिजे.” नंदाला अतिशय धका बसला. पण तो काही बोलला नाही. ‘देवाची इच्छा’ असा विचार करून तो शांत बसला. त्याने असाही विचार केला ‘कदाचित माझी श्रद्धा अजून बळकट झाली नसेल. मला आणखी तप केले पाहिजे.’
कापणीचा हंगाम सुरु असतांना एक दिवस मालक तेथे आला, नंदाच्या चेहऱ्यावरील आनंद, नम्रता आणि शांतपणा पाहून तो अतिशय चकित झाला तो म्हणाला – “नंदा, तू अतिशय चांगला मनुष्य आहेस. तू तुझे कापणीचे काम व्यवस्थित कर. मी तुला चिदंबरम्ला जायला परवानगी देईन.”
नंद तर नाचायला आणि गायलाच लागला. तो शेताकडे धावला आणि आपले काम वेगाने करायला लागला. त्या दिवशी नंद त्याच्या मालकाकडे गेला आणि म्हणाला- “मालक आपण यावे आणि शेत बघावे.” मालकाने येऊन पाहिले आणि त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. सर्व भाताची कापणी पूर्ण झाली होती आणि धान्याची सोन्याची रास लावून ठेवली होती. मालक म्हणाला – “नंदा, तू सगळ्यांमध्ये सर्वात जास्त शुद्ध आणि पवित्र अंतःकरणाचा आहेस. या क्षणापासून मी तुझा सेवक आहे. तुझ्याद्वारे देवच माझ्या शेतात काम करतो आहे याची मला खात्री आहे.”
शेवटी नंद आपल्या मित्राबरोबर चिदंबरमला जायला निघाला. चिदंबरमला त्याला अग्रीतून चालायला सांगून त्याची परीक्षा घेतली गेली. भजन गात आणि नृत्य करीत तो अग्नीतून चालला आणि सुखरूप बाहेर आला. तो मोठा भक्त आहे याची लोकांची खात्री पातळी. शेवटी मंदिराच्या पुजाऱ्याने त्याला मंदिरात नटराजाच्या समोर नेले. नंद नाचायला, गेला लागला.
नटराजा नटराजा ।
नर्तन सुंदर नटराजा ।।
काही वेळाने तो जमिनीवर पडला. त्याचा श्वास नटराजामध्ये विलीन होऊन गेला.
Questions :
- नंद कोणत्या जातीचा होता?
- तो कसा बरे इतर मुलांकडून वेगळा होता?
- त्याने परमेश्वराची कशी सेवा केली?
- नंद हा एक महान भक्त आहेयावर ब्राह्मण पंडिताचा कसा विश्वास बसला?
- नंदीच्या चिदंबरम यात्रेचे वर्णन करा.
[चित्रण : जी. विश्वेश्वर, कोईमतूर]
[स्रोत : मुलांसाठी कथा भाग २ प्रकाशक :- श्री मिथ्य साई बुक्स आणि पुब्लिकेशन ट्रस्ट, प्रशांती निलयं ]