कोणतेही काम उच्च वा हलक्या प्रतीचे नसते

Print Friendly, PDF & Email
कोणतेही काम उच्च वा हलक्या प्रतीचे नसते

जसा भारतामध्ये महात्मा गांधींचा ‘राष्ट्रपिता’ म्हणून सन्मान केला जातो, तसा अमेरिकेमध्ये जॉर्ज वॉशिंगटन ह्याचा राष्ट्रपिता म्हणून सन्मान केला जातो. ते उमद्या, मनाचे शूरवीर शिपाई होते. त्यांचा देश व त्यांचे बांधव ह्यांची सेवा करण्याची त्यांची मनोमन इच्छा होती.

George helps soldiers to lift the beam

अमेरिकेच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या दरम्यान जॉर्ज देशाच्या लष्कराचे प्रमुख बनले. एक दिवस लष्कराच्या तळावर सर्वकाही व्यवस्थित आहे ह्याची खात्री करून घेण्यासाठी ते घोड्यावरून फेरी मारत होते. तळावरील एका कोपऱ्यात एका नवीन इमारतीचे बांधकाम सुरु होते. सैन्यदलाचा कॅप्टन सहा शिपायांना जड लोखंडी सळ्या इमारतीच्या वरच्या मजल्यावर घेऊन जाण्याचा आदेश देत होता. त्या सळ्यांचे वजन खूप जास्त असल्यामुळे, ते सहाही जण आदेशाचे पालन करण्यासाठी खूप प्रयत्न करत होते. परंतु त्या कॅप्टनला त्यांची काहीही कदर नव्हती. त्यांच्या मदतीस जाण्या ऐवजी तो दुरूनच मोठ्याने ओरडत होता, “उचला, उचला”.

George - head of the American army

जॉर्जना ते सहन झाले नाही. ते कॅप्टनजवळ गेले व म्हणाले, “ती सळई खूप जड आहे. तुम्ही त्यांना थोडी मदत का करत नाही? कॅप्टन उत्तरला,” हे शिपायांचे काम आहे. तुम्हाला दिसत नाही का मी कॅप्टन आहे ते?” जॉर्ज म्हणाले, ” क्षमा करा, मला माहित नव्हते. “ते घोड्यावरून खाली उतरले व त्यांनी शिपायांना सळ्या वरपर्यंत नेण्यास मदत केली. नंतर कॅप्टनकडे वळून म्हणाले, “कॅप्टन, पुढच्या वेळेस जेव्हा असे काम करायचे असेल व शिपाई कमी असतील तेव्हा मला बोलवा. मी अमेरिकेचा लष्करप्रमुख आहे. मला मदतीस यायला आवडेल.”

ते शब्द ऐकून कॅप्टनला धक्का बसला. तो त्यावर काही बोलण्याआधीच जॉर्ज घोड्यावर स्वार होऊन तंबूकड़े गेले. जॉर्ज नी त्या अहंमन्य कॅप्टनला मोठा धडा शिकवला.

सर्वजण सारखेच असतात. मग त्यांच्या कामाचे स्वरुप कोणतेही असो! म्हणून प्रत्येकाचा आदर केला पाहिजे. प्रत्येकाला प्रेम दिले पाहिजे. मनुष्य करत असलेल्या कामाच्या स्वरूपावर त्याचे उच्च, नीच स्तर ठरत नसून ते त्याचे सद्गुण व दुर्गुण ह्यावर ठरते.

प्रश्नावली
  1. कॅप्टनची काय चूक होती?
  2. जॉर्ज वॉशिंगटनचे शब्द ऐकल्यानंतर कॅप्टनला धक्का का बसला?
  3. तुम्ही कॅप्टनच्या जागी असता तर तुम्ही काय केले असते?
  4. मनुष्याला उच्च ,उदात्त बनवणाऱ्या काही सद्गुणांची व मनुष्याला नीच पातळीवर नेणाऱ्या काही दुर्गुणांची नावे सांगा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *