कर चरण श्लोका – पुढील वाचन
कर चरण श्लोका – पुढील वाचन
कथा
दिवस संपल्यावर, झोपायला जाण्यापूर्वी आपण दिवसभरात केलेली सर्व कर्म प्रभुचरणी अर्पण केली पाहिजेत. ही सर्व कर्म परमेश्वरास अर्पण करायची असल्यामुळे आपण केवळ सत्कर्म करायला हवीत जी परमेश्वरास अर्पण करण्याच्या योग्यतेची असतील. अशा तऱ्हेने आपण पावन होतो व केवळ सत्कर्म करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन मिळते तसेच कोणतेही वाईट विचार, उच्चार वा आचरण केल्यास आपल्याला वाईट वाटते.
हे दर्शवणारी संत जनाबाईंचा जीवनातील एक सुंदर कथा आहे.
संत जनाबाई ह्या १३ व्या शतकातील एक मराठी संत कवयित्री होऊन गेल्या. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील गंगाखेड येथे झाला. त्यांच्या आईच्या मृत्युनंतर त्यांचे वडील त्यांना पंढरपूरला घेऊन गेले लहानपणापासूनच त्या पंढरपूरमध्ये राहणाऱ्या दामाशेठ ह्यांच्याकडे घरकाम करत होत्या. दामाशेठ हे संत नामदेवांचे वडील होते.
त्या पंढरपूरचे पूज्य दैवत पांडुरंगाच्या भक्त होत्या. काहीही केले की ती “पांडुरंगार्पण” असे म्हणत असे. याचा अर्थ असा, “मी हे पांडुरंगाला अर्पण करीत आहे.” खेड्यातील पारंपरिक पद्धती प्रमाणे, ती गायींचे शेण गोळा करायची, त्याचा गोवऱ्या (शेणाची गोळे) थापून भिंतीवर वाळायला टाकायची. या गोवऱ्या (शेणाची गोळे) स्वयंपाकासाठी इंधन म्हणून आजही वापरल्या जातात. जनाबाई शेणगोळा, “पांडुरंगार्पण” नेहमीप्रमाणेच “पांडुरंगार्पण” असे म्हणत फेकत असे. रोज दुपारी सगळ्यांची जेवणे झाली की ती जमीन शेणाने सारवीत असे. (हा त्यावेळचा खेड्यातील रिवाज/रित परंपरा असे) आणि राहिलेला शेणगोळा, नेहमीप्रमाणेच “पांडुरंगार्पण”. असे म्हणून बाहेर फेकत असे. ती जे करी तोच त्याचा खरा अर्थ नव्हता (म्हणजे ती जे शेण बाहेर फेकत असे ते शेण पांडुरंगावर पडावे असा तिचा हेतू नसे) पण प्रत्येक कर्म करताना पांडुरंगाला अर्पण करण्याची तिला इतकी सवय झाली होती की स्वत:चे हेही कर्म ती त्यालाच अर्पण करी त्याचा परिणाम काय होईल याची तिला कल्पना नव्हती. परंतु घडत असे होते की-त्याच खेड्यामध्ये पांडुरंगाचे एक देऊळ होते.
रोज घडणारा हा प्रकार पाहून देवळातला पुजारी फार संतापला. त्याने आता गुन्हेगाराचा छडा लावण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी दुपारी त्याने शोध घेण्यास सुरवात केली.
शोध घेता घेता जेव्हा तो जनाबाईच्या घराजवळ आला तेव्हा त्याने “पांडुरंगार्पण” असे म्हणणारा आवाज ऐकला आणि जनाबाईला शेणगोळा प्रत्यक्ष फेकतानाही पाहिले. त्याच्या लक्षात आले की जनाबाईच गुन्हेगार आहे आणि रोज घडणाऱ्या दुष्कृत्याला तीच जबाबदार आहे. तो अतिशय संतापला आणि त्या रागाच्या भरात छडी आणून त्याने जनाबाईच्या उजव्या हातावर छडीने फटके द्यावयास सुरवात केली. तो इतका जोरात मारत होता की वास्तविक जनाबाईचा हात त्यामुळे अगदी लटका पडावयास पाहिजे होता पण तिला काहीही झाले नाही. नंतर जेव्हा पुजारी देवळात परत आला तेव्हा त्याला दिसले की पांडुरंगाच्या मूर्तीला उजवा हात नाही. तो तुटला होता व खाली पडला होता.
तेव्हा मात्र जनाबाई निष्पाप आणि फार थोर आहे याची जाणीव पुजाऱ्याला झाली. तो पुन्हा जनाबाईकडे आला आणि त्याने तिची क्षमा मागितली. त्याने आळोखले कि जनाबाई या पांडुरंगाच्या परम भक्त होत्या.
जनाबाईच्या समर्पणाबाबतची आणखीही एक कथा आहे. ती जेव्हा गोवऱ्या थापत असे व उन्हात सुकविण्यासाठी ठेवत असे तेव्हा पुन्हा “पांडुरंगा, पांडुरंगा” असे म्हणत असे. याचा परिणाम झाला की जे तिच्या जवळील गोवऱ्या घेऊन इंधन म्हणून जाळीत, तेव्हा त्यांच्या घरी धुरातून “पांडुरंगा, पांडुरंगा” असा आवाज येत असे. त्या पांडुरंगाला अर्पण केलेल्या आहेत आणि त्या गोवऱ्या “पांडुरंगाच्या” आहेत असे जणू तो आवाज जाहीर करीत असे. म्हणून लोक जनाबाईचे शेणाचे गोळे विकत घेण्यास अधिक पसंती देत असत.
अशा तऱ्हेने जनाबाईने आपले हलक्या प्रतीचे सर्व काम निरपेक्ष भावनाने परमेश्वरास अर्पण करून पावन बनवले.
जर आपण अशा तऱ्हेने सर्व प्रभुचरणी अर्पण केले तर आपले जीवनही पावन होई.
[Illustrations by Sai Easwaran, Sri Sathya Sai Balvikas Student]
[Source: Sri Sathya Sai Balvikas Gurus Handbook – Year I]