ॐ तत् सत्

Print Friendly, PDF & Email
ॐ तत् सत्
उद्दिष्ट- :

या अद्वितीय खेळामुळे मुलांना सर्वधर्मांमधील खाली नमूद केलेली सामान्य वैशिष्ट्ये पुन्हा आठवतील आणि तिची प्रशंसा करतील. ही वैशिष्ट्ये सर्वधर्मसमभावाचे महत्त्व सांगतात.

संबंधित मूल्ये
  • स्मरणशक्ती
  • सहनशीलता
  • बंधुभाव
  • प्रशंसा संघभावना
  • सर्व धर्म भजन ऐकणे
वस्तूंची आवश्यकता
  1. समूह अ- प्रत्येक धर्माचे चिन्ह दर्शवणारे, अशी ४ कार्डे
  2. समूह ब- समूह ब मधील प्रत्येक कार्डवर वरील ४ धर्मांच्या संबंधातील संकल्पनांची सरमिसळ असेल.
  3. उदा- एका कार्डवर बायबल, दिवाळी, मक्का, गुरु नानक, असे असेल तर दुसऱ्या कार्डवर ईद-उल-फितर, भगवद्गीता, येशु ख्रिस्त, सुवर्ण मंदिर असे लिहिलेले असेल. इतर कार्डांवरही अशाच रीतीने चार धर्मांविषयी लिहिले असेल.
गुरुंसाठी पूर्वतयारी

गुरुंनी वरील कार्डांचे दोन समूह आणि सेट बी मधील प्रत्येक धर्मासाठी निवडलेल्या शब्दांची नोंद स्वतःच्या संदर्भासाठी तयार ठेवावे.

नोंद-: प्रत्येक कार्डमध्ये असलेल्या शब्दांची संख्या निरनिराळी असू शकते. ती संख्या, किती मुले खेळत आहेत यावर अवलंबून असेल.

खेळ कसा खेळावा
  1. मुलांना गोलाकारमधे उभे राहण्यास सांगावे.
  2. समूह अ ची कार्डे गुरुजवळ राहतील.
  3. समूह ब ची कार्डे सरमिसळ करुन प्रत्येक मुलास सारख्या’ संख्येत वाटली जातील.
  4. मुले गोलाकार फिरत राहतील. (ॐ तत् सत् किंवा भजन लावले जाईल)
  5. गाणे थांबले की मुलांनी थांबावे. त्यानंतर गुरुने स्वतःजवळील एक कार्ड, ज्यावर एका धर्माचे चिन्ह आहे, ते दाखवावे)
  6. उदा: जर कार्डवर क्रॉस असे चिन्ह असेल,तर मुलांनी स्वतःजवळील कार्ड बघून त्या धर्माशी संबंधित शब्द वाचावेत (उदा. बायबल, अपोस्टल्स, चर्च इत्यादि)
  7. नंतर मुलांनी त्यांच्याजवळ असलेल्या शब्दाविषयी बोलावे. (उदा.- बायबल – ख्रिश्चनांचा पवित्र धर्मग्रंथ) मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी यासाठी अधिक गुण द्यावेत.
  8. गुरुंनी आपली नोंदवही तपासून पाहावी की एखादा शब्द सांगायचा राहून गेला आहे का? (उदा- एखाद्या मुलाजवळ ‘अपोस्टल्स’ हा शब्द असलेले कार्ड आहे, तथापि त्याला त्याचा अर्थ माहित नसेल.) अशावेळी गुरु त्या शब्दाचा अर्थ सांगू शकतो.
  9. एकदा ख्रिश्चन धर्म झाला की अशाप्रकारे इतर तीन धर्म घेऊ शकतात.
भिन्नता

ग्रुप २ साठी

  1. समूह अ मधे ६ ते ७ धर्मांची चिन्हे असावीत. समूह ब मध्ये या धर्मांसंबंधी काही शब्दांची सरमिसळ असावी. खेळ कसा खेळावा यात काहीही बदल नाही.
  2. समूह अ साठी धर्माऐवजी सण, संस्थापक/संत, तीर्थक्षेत्रे, धर्मग्रंथ, प्रार्थना स्थळ इ. शब्द घेऊ शकता.
  3. समूह ब मध्ये सण, धर्मग्रंथ इ.ची निरनिराळी नावे घेता येतील. प्रत्येक कार्डवर एक नाव-सण, धर्मग्रंथाचे नाव इ.
  4. गुरुंनी – पवित्र ग्रंथ असे म्हटले की मुलांनी आपल्या कार्डांमधून सर्व धर्मांची जुळणारी कार्डे दाखवायची

या उपक्रमाद्वारे मुलांना- “परमेश्वराचे पालकत्व आणि मानवाचे बंधुत्व” यातील सर्वधर्म समभाव समजेल.

“सर्व धर्म आपल्याला त्या एका परमेश्वराकडे घेऊन जातात जो प्रेमस्वरूप आहे.” ह्या बाबांच्या वचनाविषयी गुरुंनी सांगावे. आपण सर्व धर्मांचा आदर करावा. हा साई मार्ग आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *