तळहाताचा खेळ

Print Friendly, PDF & Email
तळहाताचा खेळ
उद्दिष्ट

हा एक मनोरंजक, चित्तवेधक खेळ आहे.

संबंधित मूल्ये

आत्मसन्मान (आदर)
इतरांमधील चांगले पाहण्याची दृष्टी.

आवश्यक साहित्य

प्रत्येक मुलासाठी १ कागद व १ पेन्सिल.

गुरुंसाठी पूर्वतयारी

काही नाही.

खेळ कसा खेळायचा
  1. गुरूने मुलांना वर्तुळ करून बसण्यास सांगावे.
  2. प्रत्येक मुलाने कागदावर आपले नाव लिहावे. व त्यावर तळहात ठेऊन पेन्सिलीने हाताच्या पंजाच्या ठसा (चित्र) काढावा. आउटलाइन काढावी आणि तो कागद पुढील शेजारच्या मुलाला द्यावा.
  3. पुढील मुलाने त्या ठसा उमटवलेल्या कागदावर त्या मुलाबद्दल काहीतरी चांगली गोष्ट किंवा गुण लिहावा व तो कागद पुढच्या मुलाला द्यावा.
  4. याप्रमाणे वर्गातील प्रत्येक जण प्रत्येक मुलाबद्दल काहीतरी चांगली गोष्ट त्याच्या कागदावर लिहिल आणि शेवटी त्या त्या मुलाच्या तळहाताच्या ठश्यावर त्या मुलाबद्दल लिहिलेली माहिती वर्गात वाचून दाखवली जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: