पशुपती तनया
भजनाचे बोल
- पशुपती तनया बाल गजानन
- तुम हो विघ्नविनाशा गणेशा
- तुम हो विघ्न विनाशा
- हे शिव नंदन बाल गजानन
- विद्या बुध्दी प्रदाता
- मंगल कर हे मंगल कर हे
- सुंदर साई गणेशा गणेशा
- सुंदर साई गणेशा
अर्थ
भगवान शिवाचा (पशुपती) प्रिय पुत्र श्री गणेशाचे नामस्मरण करा. तो विघ्नहर्ता आहे. हे शिवनंदन श्री गजानना!
विद्या आणि बुध्दि प्रदान करणाऱ्या, मंगलदायक श्री गणेशाचे नामस्मरण करा.
स्पष्टीकरण
पशुपती तनया बाल गजानन | हे सर्व जीवांचा स्वामी असणाऱ्या भगवान शिवांचा प्रिय पुत्र श्री गजानना |
---|---|
तुम हो विघ्नविनाशा गणेशा | हे श्री गणेशा तू सर्व विघ्नांचा नाश करतोस. |
तुम हो विघ्न विनाशा | हे प्रभु ! तू विघ्नहर्ता आहेस. |
हे शिव नंदन बाल गजानन | हे श्री गणेशा, तू भगवान् शिवाचा प्रिय पुत्र आहेस |
विद्या बुध्दी प्रदाता | हे श्री गणेशा तू आम्हाला विद्या आणि बुध्दी प्रदान करतोस. हे गजानना आम्ही तुला त्रिवार वंदन करतो. |
मंगल कर हे मंगल कर हे | हे श्री गणेशा आमच्यावर सदा तुझे कृपाकटाक्ष राहू दे आणि आमच्यावर तू सदैव मांगल्याचा वर्षाव कर. |
सुंदर साई गणेशा गणेशा | हे प्रभु साई! तुमचे सौंदर्य वर्णनातीत आहे! आमच्यासाठी तुम्हीच आमचे श्री गणेश आहात. सुंदर साई गणेशा |
सुंदर साई गणेशा | हे प्रभु साई! तुमचे सौंदर्य आणि तुमचे ऐश्वर्य अनुपम आहे, अतुल्य आहे |
राग-मोहनम् (कर्नाटिक); भूपाली (हिंदुस्तानी)
श्रुती – डी (पंचम)
ताल- कहरवा किंवा आदितालम ८ ताल
Indian Notation
Western Notation
https://archive.sssmediacentre.org/journals/vol_13/01JAN15/bhajan-tutor-Pasupathi-Tanaya-Bala-Gajanana.htm