सचित्र कोडे
सचित्र कोडे
उद्दिष्ट:
हे एक प्रेरणादायी शब्दकोडे आहे. मुलांचे कलात्मक पैलू व्यक्त व्हावा ह्या दृष्टीने ह्या खेळाची रचना करण्यात आली आहे. दुसऱ्या मुलांनी काढलेले चित्र ज्या शब्दाचे, वाक्प्रचाराचे वा कल्पनेचे प्रतिनिधित्व करते त्याचा अनुमान लावण्यास खेळाडूंना सांगितले जाते.
संबंधित मूल्ये:
- कल्पनाशक्ती
- सृजनशीलता
- कुतूहल
- जिज्ञासू वृत्ती
- मनःचक्षुसमोर काल्पनिक चित्र उभे करण्याची कला.
साहित्य:
- व्हाईट बोर्ड आणि पेन, पेन्सिल, पेपर
- शब्दांची यादी आणि चिठ्ठ्या
गुरुंनी करावयाची तयारी
- गुरुंनी विषयाची – विशिष्ठ संकल्पनेची यादी तयार करावी. यादीमध्ये खाली दिलेल्या वर्गवारीचा समावेश असायला हवा.
- अध्यात्म: भगवान कृष्ण, विष्णू. शिव, सुब्रमण्यम, गणेश, बुध्द, जीझस, झोरास्ट्र
- व्यक्तिमत्व: गांधीजी, चाचा नेहरू, कवी भारतीयार, विवेकानंद, छत्रपती शिवाजी,
मीराबाई - मूल्ये आणि उपमूल्ये: आनंद, प्रेम, सर्वांबरोबर वाटून घेणे, आस्था, ऐक्य, शांती.
न्याय, मैत्री, ऊर्जा, देशभक्ती, एकाग्रता, शांतता (स्तब्धता ), स्वच्छता, त्याग - इन्द्रियांची ग्रहण क्षमता: ध्वनी, स्पर्श, चव, दृष्टी, गंध
- साई वचने:
- प्रार्थना करणाऱ्या ओठांहून* *सेवा करणारे हात अधिक पवित्र असतात
- झिरो नव्हे हीरो बना.
- सर्वांवर प्रेम करा, सर्वांची सेवा करा.
- हात समाजात, मस्तक जंगलात
- साइलेन्स म्हणजे साई लेन्स
- पैसा येतो आणि जातो परंतु नैतिकता येते आणि वाढते.
- काळाचा अपव्यय म्हणजे जीवनाचा अपव्यय
- चांगले पाहा
- स्थिर राहण्यासाठी अभ्यास करा
- जीवन एक खेळ आहे तो खेळा
- त्यानंतर गुरुंनी यादीतील एक एक शब्द प्रत्येक चिठ्ठीवर लिहून चिठ्ठ्या तयार कराव्या
खेळ कसा खेळावा
- एका मुलाला, शब्द/ वाक्प्रचार लिहिलेली एक चिठ्ठी द्यावी (उदा.-प्रेम)
- त्यानंतर गुरुंनी त्या मुलाला ‘प्रेम’ ह्या शब्दाचे प्रतिनिधित्व करणारे एक चित्र फळ्यावर काढण्यास सांगावे
- त्या चित्राच्या सहाय्याने (उदा. ❤), वर्गातील बाकीच्या मुलांनी त्या चिठ्ठीवर प्रेम शब्द लिहिला आहे असे सांगितले पाहिजे. अशा प्रकारे त्यांनी शब्दाचा तर्क केला पाहिजे.
- कोणत्याही मुलाने शाब्दिक संकेत वा भोवतालच्या वस्तुकडे अंगुली निर्देश करु नये – ह्या सूचना गुरुंनी मुलांना द्याव्यात.
- जर मुलांना त्या चित्रांवरुन तो शब्द संमजू शकत नसेल तर गुरुंनी चित्र काढणाऱ्या मुलास त्या शब्दाशी संबंधित अधिक चित्रे काढण्यास सांगावे. नेमके उत्तर मिळे पर्यंत नवीन संकेत, नवीन चित्रे, अशा नवीन दिशांनी प्रयत्न करावे.
- एकदा शब्दाचे अनुमान योग्य ठरले की दुसऱ्या मुलास दूसरी चिठ्ठी उचलण्यास सांगावी.
- परंतु जर एखाद्या मुलास बरेच प्रयत्न करूनही शब्द नेमकेपणाने चित्रबद्ध करता आले नाही तर तीच चिठ्ठी दुसऱ्या मुलास द्यावी.
- जोपर्यंत त्या वर्गवारीतील (उदा.- साई वचने) सर्व शब्द संपत नाहीत तोपर्यंत आणि प्रत्येक मुलाला खेळण्याची संधी मिळेपर्यंत आशा तऱ्हेने खेळ सुरु ठेवावा.
हा गमतीजमतीचा खेळ म्हणजे कला आणि सर्जनशील काल्पनिक चित्र ह्यांचा मिलाफ आहे.