पोस्ट बॉक्स

Print Friendly, PDF & Email
पोस्ट बॉक्स
उद्दिष्ट

हा एक आगळा वेगळा आणि मनोरंअजक खेळ आहे.

संबंधित मूल्ये

वेगवेगळ्या धर्मांविषयी माहिती.

साहित्य

विविध धर्मांची कार्डस, ५/६/साबणांचे बॉक्स, एक लाकडी बोर्ड.

गुरुंनी करावयाची तयारी

प्रमुख धर्मांची माहिती देणारी वेगवेगळी कार्ड बनवावीत वा गोळा करावीत. (उदा.- धर्माचे नांव, संस्थापक, धर्मग्रंथ,सण, शिकवण, पवित्र स्थाने, महत्त्वाची प्रार्थनास्थळे इ.)
वेगवेगळ्या धर्मांची चिन्हे साबणाच्या रिकाम्या बॉक्सवर लावून ती एका बोर्डवर पोस्ट बाॕक्ससारखी चिटकवावीत.

खेळ कसा खेळावा
  1. गुरुंनी मुलांना २/३ गटांमध्ये विभाजित करावे.
  2. सर्व कार्डस पिसून एका गटाकडे द्यावीत.
  3. त्या गटाला दिलेल्या कार्डांच्या संख्येवर आधारित, मुलांना विचार करण्यास २ ते ३ मिनिटे द्यावीत.
  4. त्या गटातील मुलांनी योग्य त्या पोस्टबॉक्स मध्ये योग्य ते कार्ड घालावे.
  5. दिलेला वेळ संपल्यानंतर, त्यांनी योग्य पोस्टबॉक्समध्ये, योग्य कार्ड घातले आहे की नाही हे तपासावे आणि प्रत्येक योग्य कार्डास गुण द्यावेत.
  6. एका मागोमाग एक सर्व गटांनी हा खेळ खेळावा. ज्या गटास जास्तीत जास्त गुण मिळतील तो गट विजयी होईल.
बदल

प्रशांती निलयमचे चिन्ह असलेला एक बॉक्स – सर्व धर्मांचे सार – हे सुद्धा ठेवू शकता. – पुट्टपर्तीमध्ये साजरे होणाऱ्या ऊत्सवांची कार्डसही बनवू शकता (ईश्वरम्मा दिवस, शिवरात्री, आषाढी एकादशी इ.)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *