आधी केले मग सांगितले

Print Friendly, PDF & Email
आधी केले मग सांगितले

संतांनी जे आचरणात आणलेले असते तेच ते आपल्याला शिकवितात. म्हणूनच त्यांच्या उपदेशात अशी शक्ती असते की ज्यामुळे आपले हित साधते.

थोर सद्गुरु रामकृष्ण परमहंसांच्या शिष्यांमध्ये, एक दरिद्री स्त्री होती. एके दिवशी ती आपल्या मुलाला घेऊन त्यांच्याकडे आली व म्हणाली “गुरुदेव या माझ्या मुलाला रोज मिठाई खायला हवी असते. या सवयीने त्याचे दात खराब होत आहेत. मिठाई महाग असल्यामुळे मलाही ती रोज विकत आणणं अवघड झालयं. मी उपदेश केला, इशारे दिले, मारलं सुद्धा, पण सारं व्यर्थ! कृपा करून ही सवय बंद करण्यासाठी त्याला काही उपदेश करा आणि त्याला आशीर्वाद द्या.

Ramakrishna asking the woman to bring the boy later

रामकृष्णांनी त्या मुलाकडे पाहिले पण त्याच्याशी बोलण्याऐवजी, त्यांनी त्या बाईला मुलाला घेऊन पंधरा दिवसांनी यायला सांगितले. दोन आठवड्यानंतर बाई पुन्हा मुलाला घेऊन आली. दोघे खाली बसल्यावर श्रीरामकृष्णांनी प्रेमळपणाने त्या मुलाकडे पाहिले आणि ते म्हणाले, “बाळा तुझ्यासाठी मिठाई आणावी म्हणून तू आपल्या आईला रोज त्रास देतोस हे खर आहे?” मुलाने मान खाली घातली व ‘होय महाराज’ असे म्हणून तो गप्प बसला. “तू बुद्धिमान दिसतोस, ही मिठाई तुझे दात खराब करीत आहे हे तुला माहीत आहे. तुझ्या आईलाही तुझी चिंता लागली आहे जर तिला दररोज मिठाईवर पैसे खर्च केले तर ती तुला नवी पुस्तके आणि कपड़े कसे आणू शकेल? तुझ चुकत आहे असे नाही वाटल तुला? “रामकृष्णांचे शब्द बाळाच्या अंतःकरणाला भिडले. त्याने रामकृष्णांकडे पाहिले आणि “होय महाराज” असे म्हणून तो पुन्हा गप्प बसता. “मग आजपासून तू मिठाई मागण्याचे सोडशील? रामकृष्णांनी कळकळीने विचारले. या वेळी तो मुलगा हसला आणि म्हणाला “होय महाराज, आजपासून मिठाईसाठी हट्ट करून आईला त्रास देणार नाही आणि मिठाई पण खाणार नाही” मुलाच्या उत्तराने रामकृष्णाला संतोष वाटला त्यानी प्रेमाने त्याला जवळ घेतले आणि सांगितले. “मुला तू चांगला आहेस. तुझ्यासाठी चांगले काय, वाईट काय, हे तुला कळतय. तू नक्कीच सुखी होशील.” मुलाने नमस्कार केल्यावर रामकृष्णांने त्याला आशीर्वाद दिला आणि ते इतर भक्तांकडे वळले.

Ramakrishna advices the boy second time

मुलगा उठून बाहेर गेला. त्याची आई कृतज्ञतेने म्हणाली, “गुरुदेव, हे उपदेशाचे चार शब्द सांगण्यासाठी तुम्ही आम्हाला दोन आठवडे थांबायला का लावलतं? रामकृष्ण हसले आणि म्हणाले, “हे पाहा, दोन आठवड्यांपूर्वी तुम्ही आलात तेव्हा मीही अधून मधून भक्तांनी आणलेली मिठाई खात होतो. जे मी स्वतः जवळपास रोज करत होतो. ते करू नकोस असा मी तुमच्या मुलांना कसं बरं सांगणार? म्हणून त्या दिवसा पासून मी निठाई खाणं थांबवलं. त्यामुळे तुमच्या मुलाला हा उपदेश करण्याची ताकद मला मिळाली कारण मी स्वतः ते केले होते. जेव्हा आपण जे करतो ते शिकवतो तेव्हा आपल्या शब्दांना प्रामाणिकपणाचं वजन येत आणि ते ऐकणाऱ्याला मानवतात, “खोलीत असणाऱ्या सर्व भक्तांना असे वाटले की त्यांना परमहंसाकडून मोठाच धडा शिकायला मिळाला.

प्रश्न:

रामकृष्णानी आईला व मुलाला परत यायला का लावले? मिठाई विषयी उपदेश लगेच का नाही केला?
माणूस जे आचरणात आणत नाही ते त्याने शिकविले तर काय होते?
स्वतः न करता तुम्हाला काहीतरी करायला सांगणाऱ्या व
स्वतः करून तुम्हाला काहीतरी करायला सांगणाऱ्या व्यक्तीबाबतचा तुमचा अनुभव वर्णन करा. दोन्ही व्यक्तींचा तुमच्यावर काय परिणाम झाला?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *