प्रेम ईश्वर है
भजनाचे बोल
- प्रेम ईश्वर है ईश्वर प्रेम है
- हर धडकन मे साई समा है ईश्वर प्रेम है
- प्रेम ईश्वर है ईश्वर प्रेम है
- राम रहीम कृष्ण करीम
- झोराष्ट्र येशू नानक
- कोई भी नाम जपो रे मनवा ईश्वर प्रेम है
अर्थ
ईश्वर प्रेम आहे; प्रेम ईश्वर आहे. ईश्वर प्रेम आहे याचा निनाद करणाऱ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यामध्ये प्रभू साई सामावलेले आहेत. परमेश्वराची सर्व नामरूपे म्हणजे प्रेम आणि केवळ प्रेम आहेत. म्हणून राम, कृष्ण,रहीम, झोराष्ट्र, जीझस वा नानक, यापैकी परमेश्वराच्या कोणत्याही नामाची भक्ती करा. ईश्वर प्रेम आहे. प्रेम ईश्वर आहे.
स्पष्टीकरण
प्रेम ईश्वर है ईश्वर प्रेम है | परमेश्वर जो अन्य काही नसून शुद्ध आणि नि:स्वार्थ प्रेम आहे त्याचा आम्ही जयजयकार करतो. |
---|---|
हर धडकन मे साई समा है ईश्वर प्रेम है | हे प्रभू साई! आमच्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्याबरोबर तुझी स्पंदने निनादतात. या विश्वाला चैतन्यमय बनविणारे प्रेम तू आहेस. |
प्रेम ईश्वर है ईश्वर प्रेम है | परमेश्वर जो अन्य काही नसून शुद्ध आणि नि:स्वार्थ प्रेम आहे त्याचा आम्ही जयजयकार करतो. |
राम रहीम कृष्ण करीम | आम्ही तुला आनंददायी राम, अत्यंत दयाळू रहीम, मनमोहक कृष्ण आणि सर्व शक्तिमान दाता करीम ह्या नामांनी तुला साद घालतो. |
झोराष्ट्र येशू नानक | हे विश्वेश्वरा!आम्ही तुला साद घालतो. तू सुवर्ण प्रकशापैकी एक झोराष्ट्र आहेस,चांगुलपणाचे मूर्तीमंत स्वरूप असलेला येशू आहेस आणि अद्वैत नानक आहेस. |
कोई भी नाम जपो रे मनवा ईश्वर प्रेम है | आम्ही कोणत्याही नामाने तुला भजले तरी तू प्रेमातून आणि केवळ प्रेमातून अभिव्यक्त होणारा परमेश्वर आहेस. |
राग: जोग
श्रुती: सी (पंचम)
ताल: कहरवा किंवा आदिताल-मात्रा ८
Indian Notation
Western Notation
Adopted from : https://archive.sssmediacentre.org/journals/vol_11/01DEC13/bhajan-tutor-Prem-Eshwar-Hai.htm