सुंदर हातांची गोष्ट

Print Friendly, PDF & Email
सुंदर हातांची गोष्ट

स्पष्टीकरण:

प्रामाणिकपणे व भरपूर मेहनत करून आपण धर्माने (सदाचाराने) पैसा कमावू शकतो. त्यासाठी आपल्याला पाचही बोटांची टोके एकत्र आणावी लागतात आणि त्याच्या सहकार्याने आपण चांगले काम करून पैसा कमावतो. म्हणून आपण म्हणतो की धनाची देवता लक्ष्मी आपल्या हाताच्या बोटांच्या अग्रावर वास करते, जी आपल्याला सत्कर्म करण्यासाठी व श्रमाने पैसा कमावण्यासाठी प्रेरित करते.

आपल्याला ज्ञान अर्जित करण्यासाठी हाताच्या तळव्यामध्ये पुस्तक धरावे लागते. तसेच लेखन आणि वाचन करण्यासाठी तळव्याचे सहाय्य घ्यावे लागते. म्हणून आपण म्हणतो ज्ञान व विद्येची देवता सरस्वती हाताच्या तळव्यात मध्यभागी वास करते. जी आपल्याला पुस्तक धरण्यासाठी, एकाग्रतेने अभ्यास करण्यासाठी व ज्ञानसंपादन करण्यासाठी सहाय्य करते. तळहाताच्या खालच्या भागातील हालचाल, लोकांनी, प्राण्यांनी वा सापांनी केलेल्या हल्ल्यापासून स्वसंरक्षण करण्यासाठी आपल्याला सहाय्यकारी ठरते. म्हणून आपण म्हणतो की जगाचे रक्षण व पालन करणारे भगवान विष्णु वा गोविंदा तळहाताच्या सांध्यापाशी वास करतात. ते आपल्याला इतरांनी केलेल्या हल्ल्यापासून स्वसंरक्षण करण्यास सहाय्य करतात. तसेच आपले पोषण करतात आणि धर्माला अनुसरून केलेल्या सर्व कार्यासाठी व त्याच्या प्रयत्नासाठी मार्गदर्शन करतात.

सुंदर हातांची गोष्ट

Angel to look for pretty hands

एकदा देवाने एका देवदूताला सांगितले की पृथ्वीवर जा आणि सगळ्यात सुंदर हात असलेल्या माणसाला माझ्याकडे घेऊन ये.

देवदूत रात्री पृथ्वीवर आला. त्याला वाटले रात्री सगळीजण गाढ झोपेत असतात, तेव्हा आपल्याला त्यांचे हात जवळून बघता येतील, देवदूत प्रथम एका राजवाड्यात गेला.

Angel upset unable to find

त्याने बघितले राणीचे हात खूप सुंदर दिसत होते, त्यावर सुरेख मेंदी होती, भरपूर बांगड्या व अंगठ्या तसेच इतर दागिने घालून ते सुशोभित दिसत होते. पण जेव्हा देवदूताने महालात प्रवेश केला तेव्हा त्याला तिने केलेल्या वाईट गोष्टींचा दुर्गंध आला, तिच्या हाताने तिने खूप लोकांना शिक्षा केलेली होती, अशीच गोष्ट राजाच्या बाबतीत सुद्धा होती. नंतर देवदूताने सरदार, प्रधान, व्यापारी अशा बऱ्याच जणांच्या घरी भेटी दिल्या, त्याला वाटले कुणी तरी सत्कर्म केले असेल! पण त्याला असे कुणीच आढळले नाही. नंतर देवदूत देवळातील पूजाऱ्यांकडे गेला.

Angel got fragrant from farmer

पण तिथेही त्याला पापकर्मे केलेली आढळली. तसेच ते अहंकाराने भरलेले होते. शेवटी थकून जाऊन देवदूत एका शेतात जाऊन विसावला. एका झाडाखाली बसलेला असताना त्याला चांगल्या कर्माचा सुगंध आला. अंधारात त्याने आजूबाजूला बघितले तर एक शेतकरी दमून भागून उघड्यावर जमिनीवर झोपला होता. देवदूताने वाकून शेतकऱ्याचे हात बघितले. तर ते खरबरीत, काळे दिसत होते. पण ते तेजाने चमकत होते. शेतकरी गाढ झोपला होता. पण तिथूनच सत्कर्माचा सुगंध दरवळत होता.

Angel takes farmer to god

देवदूत शेतकऱ्याला घेऊन देवाकडे गेला. पण देवदूताला प्रश्न पडला होता. त्याने देवाला विचारले या शेतकऱ्याचे हात राजा-राणीपेक्षा सुंदर कसे? देव देवदूताच्या कामावर खुश झाला होता, त्याने त्यांना दिलेले काम उत्तम प्रकारे केले होते. देवाने उत्तर दिले की शेतकरी, देवाने त्याला दिलेल्या दोन सशक्त हातांबद्दल देवाचे आभार मानतो. या बलवान हाताने तो कामे करतो. शेतकऱ्याला माहीत आहे की या हातांनी देवाचे काम करायचे आहे. म्हणून शेतकरी शेतातील त्याचे ज्ञान दुसऱ्यांना पण देतो आणि स्वत:च्या शेतात उत्तम पीक घेतो. त्यामुळे त्याच्या शेतात भरपूर जोंधळा पिकतो. गरजूंना तो ज्वारी देतो तसेच जखमी लोकांची, पशुंची, प्राण्यांची सेवा करतो. त्याच्या कर्तृत्वाचा अभिमान न बाळगता त्याने धन, समृद्धी मिळवली आहे आणि त्याच्या सत्कर्मामुळे आता तो स्वर्गात येऊन देवात विलीन झाला आहे, अशाप्रकारे शेतकऱ्याला देवत्व प्राप्त झाले आहे.

[Illustrations by Dhanusri, Sri Sathya Sai Balvikas Student]

[Source: श्री सत्यसाई बालविकास गुरू हॅन्डबुक, गट १ वर्ष पहिले द्वारा: श्री सत्यसाई बुक्स अॅन्ड पब्लिकेशन्स ट्रस्ट धर्मक्षेत्र, महाकाली केव्हज् रोड, अंधेरी ईस्ट, मुंबई.]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: