पुरुषः स परः-पुढील वाचन
पुरुषः स परः-पुढील वाचन
पुरुषः स परः पार्थ भक्त्या लभ्यस्त्वनन्यया
यस्यान्तः स्थानि भूतानि येन सर्वमिदं ततम्
(अध्याय 8, श्लोक 22)
हे पार्था ! तो सनातन अव्यक्त परम पुरुष अनन्य भक्तीनेच प्राप्त होणार आहे. सर्व प्राणिमात्र त्या परमात्म्याच्या ठिकाणी आहेत. आणि त्या परमात्म्याने अखिल विश्व व्यापले आहे.
बाबा म्हणतात, ” सर्व प्राणिमात्र ज्याच्यामध्ये वास करतात आणि जो सर्व प्राणिमात्रांमध्ये वास करतो त्या परमात्म्यास सर्वसमावेशक प्रेमाने प्रसन्न करून घेणे शक्य होते, रिक्त वा यांत्रिक विधी वा उपचाराने नव्हे.
ह्या जगतास जगदीशाने व्यापून टाकले आहे.
परमेश्वराचे अस्तित्व आणि त्याचा महिमा अनुभवण्यासाठी कोणतीही विशेष जागा नाही कारण सर्व तोच आहे, सर्वत्र आहे, सदैव आहे.
गोपिकांची भक्ती
एक दिवस श्रीकृष्णाने त्याला तीव्र डोकदुखीचा त्रास होत असल्याची बतावणी केली आणि केवळ एका भक्ताच्या चरणांची धूळ लावल्यावर तो त्या त्रासातून मुक्त होऊ शकेल असे त्याने सांगितले. श्रीकृष्णाचे मस्तक आपल्या पायधुळीने दूषित होईल ह्या कारणास्तव रुक्मिणी, सत्यभामा आणि नारदमुनी त्यासाठी तयार नव्हते.
जेव्हा नारदमुनी गोपिकांना भेटले तेव्हा त्या त्यांची पायधूळ देण्याचे तयार असल्याचे त्यांना समजले. गोपिकांच्या दृष्टीने त्यांच्या प्रिय कृष्णाची वेदनांमधून त्वरित मुक्तता होणे हेच सर्वात महत्त्वाचे होते. नारदाने त्यांना, त्यांच्या त्या कृतीचे गंभीर परिणाम होतील असे सांगितले तरीही त्यांचा निर्धार कायम होता. गोपिकांनी त्यांची पायधूळ देताक्षणीच कृष्णाची डोकेदुखी नाहिशी झाली.
दिव्यत्व प्रत्येक गोष्टीमध्ये विद्यमान आहे. प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक पायामध्ये तसेच पायधूळीमध्ये त्याचे अस्तित्व आहे. गोपिका प्रत्येक गोष्टीमध्ये, त्यांच्या पायामध्ये तसेच त्यांच्या पायधूळीमध्ये कृष्णाला पाहत होत्या. त्यामुळे त्यांच्या मनाची द्विधावस्था नव्हती. ना त्यांच्या मनात पापभीती होती.
गोपिकांनी दर्शवलेलं हे सर्वसमावेशक प्रेम म्हणजे भक्तीचे सर्वश्रेष्ठ रुप आहे ह्याचा नारदांना बोध झाला.