रघुकुल भूषण
भजनाचे बोल
- रघुकुल भूषण राजीव नयना
- ईश्वरांबा नंदन सत्यसाई रामा
- जानकी वल्लभ लावण्य रामा
- निरुपम सुंदर सुगुणाभि रामा
- प्रशांति निलया पावन धामा
- जय जय रामा प्रभू साई रामा (2)
अर्थ
रघुवंशाचे भूषण असणाऱ्या राजीव नयन, प्रभू रामाचा जयजयकार असो! भगवान सत्यसाईराम ईश्वराम्मांचा प्रिय पुत्र आहे. जानकीच्या प्रियतम,प्रभू रामाचे सौंदर्य अनुपम आहे. तेजस्वी, कांतीमान प्रभू राम गुणनिधान आहे. साक्षात प्रभू राम असणाऱ्या, पावन प्रशांति निलयम मधील आपल्या भगवान साईरामाचा जयजयकार असो!
स्पष्टीकरण
रघुकुल भूषण राजीव नयना | हे रघुकुल भूषण, राजीव नयना, प्रभू राम! तुझे सौंदर्य अनुपम आहे! |
---|---|
ईश्वरांबा नंदन सत्यसाई रामा | हे प्रभू साईरामा! तू सत्य स्वरूप आहेस. साक्षात प्रभू रामच पुन्हा एकदा ईश्वराम्मांच्या प्रिय पुत्राच्या रूपात अवतरला आहे! |
जानकी वल्लभ लावण्य रामा | जानकी वल्लभ, हे प्रभू रामा! तू अत्यंत कृपाळू आहेस आणि विश्वाचा स्वामी आहेस! |
निरूपम सुंदर सुगुणाभि रामा | हे निरुपम सुंदरा, प्रभू रामा! तू सद्गुणांचे भांडार आहेस! |
प्रशांति निलया पावन धामा | हे प्रभू रामा! प्रशांति निलयमला, तू तुझे दिव्यधाम म्हणून निवडले आहेस आणि तुझ्या दिव्य स्पर्शाने त्याला पुनीत केले आहेस |
जय जय रामा प्रभू साईरामा | प्रभू रामाचा आणि प्रभू साई रामाचा जयजयकार असो |
राग: मधुवंती (हिंदुस्तानी) धर्मावती (कर्नाटिक)
श्रुती: डी (पंचम)
ताल: कहरवा किंवा आदि ताल-आठ मात्रा
Indian Notation
Adopted from : https://archive.sssmediacentre.org/journals/vol_13/01MAR15/bhajan-tutor-Raghukula-Bhushana-Rajiva-Nayana.htm