राम, लक्ष्मण, सीता अयोध्येस परतले
राम, लक्ष्मण, सीता अयोध्येस परतले
राम आणि सीतेचे पुनर्मिलन झाले. त्यांचा वनवासही संपत आला होता व अयोध्येस परतण्याची घडी आली होती. रामाच्या आगमनाच्या वार्तेने भरत हर्षभरित झाला होता. रामाच्या स्वागताची तयारी करण्यासाठी त्याने नंदिग्रामाहून अयोध्येस प्रस्थान केले. ऋषीमुनी, विद्वान पंडीत, मान्यवर नागरिक, तीन राण्या व शत्रुघ्नासह तो रामाच्या भेटीस निघाला. दोघा भावांनी अत्यंत आदरपूर्वक रामाला साष्टांग नमस्कार घातला. समस्त नगरी हर्षोल्हासाने दुमदुमुन गेली. राजवाड्यामध्ये प्रवेश करताच वसिष्ठांनी अयोध्येचा सम्राट म्हणून रामाचा राज्याभिषेक करण्याची तिथी जाहीर केली. त्या दिवशी रामाने वसिष्ठ व इतर ऋषींना आणि तिन्ही मातांना साष्टांग नमस्कार घालून सीतेसह तो सिंहासनावर आरूढ झाला.
गुरुंनी मुलांना हे समजावून सांगावे की जसे रामाच्या अयोध्येतील आगमनाच्या निमित्त अयोध्येमध्ये उत्सवाचे वातावरण होते. गुढ्या, तोरणे उभारून समस्त नगरी सुंदर सजली होती. सर्वत्र आनंद भरुन राहिला होता. त्याचप्रमाणे जेव्हा आपण परमेश्वराचे आपल्या हृदयामध्ये स्वागत करतो तेव्हा आपण आपले हृदय शुध्द आणि निर्मल ठेवले पाहिजे आणि परमेश्वराला भावणाऱ्या सद्गुणांनी ते सुंदर सजवले पाहिजे.
खालील मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत.
आपल्यामध्ये असणाऱ्या मूल्यांची जाणीव असून ती मूल्ये आपल्या दैनंदिन जीवनात आचरणे हे आत्मोद्भव शिक्षणाचे सार आहे.
गुरुंनी दिवाळीमध्ये केल्या जाणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईचे व सजावटीचे उदाहरण देऊन अयोध्येमध्ये रामाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण नगरी कशी दिव्यांच्या रोषणाईने नटली होती व लोकांनी हा आनंद सोहळा कसा साजरा केला ते मुलांना सांगावे. दीप प्रज्वलनचा गर्भित अर्थ – वाईटांवर (दुष्टांवर) चांगल्याचा विजय/ अज्ञानावर ज्ञानाचा विजय – मुलांच्या वयानुसार त्यांना आकलन होईल अशा पध्दतीने त्यांना हे समजावून सांगणे.
अशा तऱ्हेने रामराज्याचा कालावधी सुरु झाला. ज्यामध्ये सत्य आणि धर्म ह्यांचे आचरण केले जात होते. परिणामस्वरूप प्रजा आनंद व शांतीपूर्ण जीवन जगत होती.
[रामकथा रसवाहिनी भाग 1, २, ३ ह्यामधून ह्या कथा घेण्यात आल्या आहेत. ]