रामदास धडपड आणि दीक्षा

Print Friendly, PDF & Email
१. रामदास धडपड आणि दीक्षा

संन्यास घेण्यापूर्वी स्वामी रामदासांचे नाव विठ्ठलराव असे होते. उत्तर केरळातील कन्हानगड येथे १० एप्रिल १८८४ रोजी त्यांचा जन्म झाला. त्या दिवशी हनुमानजयंती होती. त्यांना केवळ पोटापाण्याला मिळवून देणारे शिक्षण आवडत नव्हते. परंतु घरच्या लोकांच्या दडपणामुळे त्यानी रंग आणि छपाई याचा स्वतःचा उद्योग सुरु केला.

विठ्ठलरावांनी रामनामाचा जप करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना खूप मनःशांती लाभली होती. पण त्यांचे आयुष्य काळज्या, चिंता आणि दुःख यानी व्यापले होते. त्यांच्या गृहजीवनात खूप तणाव होता. अशा अवस्थेत त्यांना एक आवाज ऐकायला आला- ‘निराश होऊ नकोस. माझ्यावर श्रद्धा ठेव. तुझी मुक्तता होईल. त्यानंतर विठ्ठलरावांचा ध्यानात अधिक वेळ जाऊ लागला, रामाबद्दलचे प्रेम अधिकाधिक वाढले, अगदी काही तासांची विश्रांती वगळता रात्र सुद्धा रामभजनात जायला लागली.

कोणतीही आर्थिक वा अन्य अडचण असो, ‘राम’ त्यांच्या मदतीला येत असे. रस्त्याने ते रामनाम म्हणत तर झोप म्हणजे रामनामाचा प्रदीर्घ जय असे! आवश्यक तेवढीच फळे आणि उकडलेले बटाटे एवढाच आहार घेऊन बाकीचे अन्न त्यांनी वर्ज्य केले होते. जगातील ऐहिक गोष्टींचे आकर्षण त्यांना वाटेनाचे झाले होते. अशी अवस्था असताना रामदासांच्या वडिलांनी त्यांना ‘ॐ श्री राम जय राम जय जय राम’ या राममंत्राचा उपदेश केला. रामदास आपल्या वडिलांकडे गुरुदेव या दॄष्टीनेच बघत होते. या मंत्रामध्ये मोठी शक्ती होती. त्याचा रामदासांच्या मनावर खूप प्रभाव पडला आणि त्यांच्या हृदयात भक्ती विकसित होऊ लागली. श्रीराम स्वामी रामदासांशी बोलले आणि त्यांना मर्गदर्शन केले. श्रीरामाने त्यांना भगवद्गीता, बुद्धाचे ‘आशियाचे धर्मदीप’ तसेच ख्रिस्त आणि म. गांधी यांचे विचार वाचण्यास सुचवले. आता बाकी सर्व भ्रमात्मक आहे आणि केवळ ‘राम’ आहे असे त्यांना जाणवू लागले. ऐहिक वस्तूच्या उपभोगाच्या इच्छा वेगाने गळून पडत होत्या आणि ‘मी’ व ‘माझे’ ही जाणीव क्षीण होत होती. एकदा रामदास रामनामाचे अमृत पिण्यात मग्न होऊन गेलेले असताना त्यांच्या मनात असे विचार येऊ लागले.

“हे रामा! जेव्हा तुझ्या दासाला अचानक तुझा प्रभाव जाणवतो, तुझे प्रेम समजते आणि जो कोणी तुझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याला खरी शांती आणि आनंद निश्चित मिळतो तर मग ‘मी माझे’पणा सांगणाऱ्या जगातील सर्व गोष्टींचा त्याग करून प्राप्त होणाऱ्या तुझ्या कृपाप्रसादामध्ये तो स्वत:ला झोकून का देत नाही? जेव्हा ‘मी हे करतो, मी ते करतो; हे माझे आहे, ते माझे आहे’ असे माणसे म्हणतात, तेव्हा ती स्वतःच संभ्रमित झालेली असतात. हे रामा! सगळे तुझे आहे आणि सर्व गोष्टी फक्त तूच करतोस. तुझ्या दासाची एकच प्रार्थना आहे की त्याचा अहंकार घालवून तू त्याला पूर्णतया मार्गदर्शन करावेस. रामाच्या शोधासाठी संन्याशाची वस्त्रे परिधान करुन, सर्व सोडून पृथ्वी पर्यटन करण्याची अंधुक इच्छा त्याच्या मनाला हेलकावे देऊ लागली. त्यावेळी त्याच्या समोरच असलेले ‘आशियाचे धर्मदीप’ हे पुस्तक सहज उघडण्यास रामाने सुचवले. बुद्धाचा महान सर्वसंग परित्याग ज्या ठिकाणी वर्णन केला होता त्या पानावर त्याचे लक्ष खिळले – “माझे हृदय जिथे अडकले होते असा हा सोनेरी पिंजरा सोडून द्यायचा क्षण आता आलेला आहे. सत्याचा शोध लागेपर्यंत सर्व लोकांसाठी म्हणून मी सत्याचा शोध घेईन.” त्याचप्रमाणे “नवा करार” हेही त्याने उघडले आणि ख्रिस्ताचे शब्द वाचले- “ज्याने कोणी माझ्या नामासाठी आपल्या घराचा, भावांचा, बहिणीचा, वडिलांचा, आईचा, पत्नीचा, मुलांचा किंवा देशाचा त्याग केला असेल त्याला त्यापेक्षा शंभरपटीनी मिळेल आणि चिरंतन आयुष्याचा लाभ होईल.” त्याचप्रमाणे भगवद्गीतेत म्हणले आहे “सर्व धर्म सोडून तू मलाच शरण ये. दुःख करु नकोस, मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन.”

या प्रमाणे बुद्ध, ख्रिस्त व कृष्ण या तीनही महान् अवतारांच्या शब्दातून रामच बोलला होता. सगळे संन्यास मार्गाकडे अंगुलिनिर्देश करीत होते. त्याचा निश्चय झाला होता. पहाटे पाच वाजता त्याचे ज्या जगाचे आकर्षण पूर्ण संपले होते व ज्यामध्ये आपले स्वतःचे म्हणावे असे काही दिसत नव्हते, त्या जगाचा त्याने निरोप घेतला. शरीर, मन, आत्मा सर्व काही प्रेम आणि दया यांना परिपूर्ण असलेल्या चिरंतन तत्त्वाच्या, रामाच्या पायाशी वाहिले होते.

स्वामी रामदास हे साधनेसाठी तयार झाले होते. रामाने मागदर्शन केले तिथे ते गेले; भिक्षा मागून अन्न मिळेल त्यावर उपजीविका केली. त्याने रामावर पूर्ण भरवसा ठेवला. तीर्थाटन आणि भारत भ्रमणानंतर केरळातील कन्हानगड येथे ‘आनंदाश्रम’ नावाचा आश्रम बांधण्याची त्याला प्रेरणा झाली. त्यांचे भक्त त्यांना प्रेमाने ‘पपा’ म्हणत. त्याच्या उपदेशाने रामनामाचा प्रकाश व प्रेम सर्व जगभर पसरले.

Source- Stories for Children – II

Published by- Sri Sathya Sai Books & Publications Trust, Prashanti Nilayam

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *