रामेश्वरम्
जेथे उपासक आणि उपासना दिव्य असतात
रामेश्वर हे दक्षिणेची कशी म्हणून प्रसिद्ध आहे. जेव्हा रावणाने सीतेला पळवून नेले त्यावेळी येथे श्रीरामाने शंकराची पूजा केली. प्रचंड सेतू बांधण्यासाठी दिवसभर वानर खूप कष्ट करीत. पण रावण रात्री येऊन तो मोडून टाकत असे. शेवटी जांबवानाने एक युक्ती काढली. त्याने पुलावर भगवान शिवाचे मंदिर बांधण्याचे ठरविले. ते मोडण्याचे रावणाने कधीही धाडस केले नसते. अशा रीतीने रामेश्वराचे मंदिर भांडले गेले.
राम सीतेसह अयोध्येला परतत असताना, त्यांनी हे मंदिर बांधले अशी ह्या मंदिराची एक आख्यायिका आहे. कृतज्ञतेचे भाव दाटून आल्यामुळे रामानी शिवाची उपासना करायचे ठरवले. शिवाच्या आत्मलिंगाचे प्रतीक म्हणून एक पाषाण आणण्यासाठी हनुमान तत्परतेने तेथून निघाले. परंतु ते पाषाण घेऊन परत येण्यापूर्वीच रामाने प्रतीक म्हणून स्वतःच एक लिंग साक्षात केले व उपासना सुरु केली. हनुमानास अत्यंत दुःख झाले परंतु रामाने हनुमानास ग्वाही दिली की त्याने आणलेल्या पाषाणाचे प्रथम पूजन केले जाईल
आजतागायत ही प्रथा चालू आहे. रामाने साक्षात केलेल्या दैवताचे पूजन करण्या आगोदर भक्ताला हनुमानाने आणलेल्या विश्वेश्वराची पूजा करावी लागते. असा ह्या तीर्थक्षेत्राचा महिमा आहे. भारतातील सर्व ठिकाणाहून भक्तजन येथे येतात. काशी हे तीर्थक्षेत्र मोक्षप्रदान करणारे आहे अशी भक्तांची श्रध्दा आहे तथापि रामेश्वराला भेट दिल्याशिवाय काशीयात्रा पूर्ण होत नाही.
[Source – Stories for Children – II]
Published by – Sri Sathya Sai Books & Publications Trust, Prashanti Nilayam