रावणाचा अंत
रावणाचा अंत
राम व त्याच्या सैन्याबरोबर प्रदीर्घ काळ चाललेले हे युध्द समाप्त करण्यासाठी रावण युद्ध भूमीवर गेला. रामावर निश्चित विजय प्राप्त करण्यासाठी ‘पाताळ होम’ नावाचा विधी करण्याची रावणाची इच्छा होती. बिभीषणाने तातडीने ही बातमी रामाच्या कानावर घातली. तो यज्ञ पूर्ण होऊ नये म्हणून त्या यज्ञात विघ्न आणण्याचा रामाने अंगद आणि हनुमानास आदेश दिला. रावणाचे सैन्य नष्ट झाले. रामाने वानरसेनेस विश्रांती घेण्यास व रावण आणि त्याच्यामधील युद्ध पाहण्यास सांगितले. तेवढ्यात रावण मोठमोठ्या गर्जना करत तेथे आला. रामाने त्याला म्हटले, मी जे सांगतो आहे ते ऐक, जगात तीन प्रकारचे लोकं असतात. एक पाटलि वृक्षाप्रमाणे असतात ज्यांना सुंदर फुलोरा येतो परंतु फळे धरत नाहीत. म्हणजेच ते नुसतेच बोलतात. परंतु बोलल्याप्रमाणे थोडेसुद्धा आचरण करत नाहीत. दुसरे केळीच्या झाडाप्रमाणे असतात. ज्याला फळे व फुले दोन्ही येतात. जे बोलल्याप्रमाणे आचरण करतात. जे बोलतात ते निश्चयपूर्वक आचरणात आणणारे लोक ह्या प्रकारात मोडतात. आणि तिसरे ज्याला फुले येत नाहीत फक्त फळे येतात अशा फणसाच्या झाडाप्रमाणे असतात. जे न बोलता कार्य करतात, कधीही बढाया मारत नाहीत ते सर्वोत्तम पुरुष असतात”. रावणाच्या अनैतिक शासनानेच त्याच्या कुलाचा विनाश ओढवल्याचे रामाने त्याला सांगितले.
गुरुंनी मुलांना सांगावे की त्यांनी न बोलता काम करायला शिकले पाहिजे. मुलांनी बढाया मारु नयेत. आणि केलेल्या कामाच्या बदल्यात कधीही कोणतीही अपेक्षा ठेवू नये. गुरुंनी मुलांना स्वामींच्या जीवनातील ‘चेप्पिनात्तु चेस्तारा’ ह्या प्रसंगाविषयी सांगावे.
खाली दिलेली अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत.
कर्तव्य हाच परमेश्वर, कर्म हीच पूजा
रावणाने रामावर अपशब्दांचा भडिमार केला. आणि रामावर बाणांचा समूह सोडला. परंतु रामाने त्यावर अग्निबाण सोडल्यामुळे रावणाचे बाण भस्मसात झाले. रामाच्या बाणांनी रावणाचे मस्तक धडावेगळे झाले की त्याजागी पुन्हा नवीन मस्तक निर्माण होत होते.
गुरुंनी मुलांना सांगावे की एकदा नकारात्मक गुण वा वाईट सवयी जडल्या की त्या सहजासहजी सुटत नाहीत. जेव्हा आपण एखादी वाईट सवय सोडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा दूसरी वाईट सवय उद्भवते आणि आपण त्या दुष्टचक्रात अडकतो म्हणून आपण चांगल्या सवयी आणि योग्य मूल्ये अंगी बाणवण्यासाठी सतर्क राहिले पाहिजे आणि लहान वयातच ही अंगी बाणवायला हवीत अन्यथा नंतरच्या काळात ह्यासाठी खूप संघर्ष करावा लागेल.
खाली दिलेली अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत.
ABC OF LIFE – ALWAYS BE CAREFUL सदैव सतर्क राहा./चांगले बना ,चांगले पाहा,चांगले करा/ लवकर निघा, सावकाश हाका, सुरक्षित पोहोचा.
हे युद्ध अठरा दिवस चालले. चौदा वर्षांचा वनवास संपण्यास थोडेच दिवस शिल्लक होते. राक्षसांचा शेवट जवळ आल्याचे देवांना माहित होते. त्यामुळे धर्माचा विजय पाहण्यासाठी त्यांनी आकाशात गर्दी केली. रामाने रावणावर सोडलेल्या बाणांच्या गुच्छाने रावणाचे हात आणि मस्तके छेदली. तो चैत्र शुध्द चतुर्दशीचा दिवस होता. सर्व वानरसेना अत्यंत आनंदीत झाली. रामाचे शौर्य आणि पराक्रम पाहून ते थक्क झाले.
गुरुंनी मुलांना समजावून सांगावे की वाईटाने चांगल्यावर विजय मिळवण्याचा कितीही प्रयत्न केला तर त्याला अपयश येते. परंतु तोपर्यंत आपण चिकाटीने आपली चांगली मूल्ये अनुसरली पाहिजेत. आपण संयम न सोडता निर्धाराने,चिकाटीने नकारात्मक गुणांवर मात करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मुलांनी सदैव चांगले राहावे, सदैव सर्वांना मदत करावी व कधीही कोणाला दुखवू नये, सर्वांवर प्रेम करावे, सर्वांची सेवा करावी, दुर्जनांची संगत टाळावी, चांगले पाहा,चांगले करा. ह्या सर्व गोष्टी कशा कराव्यात ह्याविषयी गुरुंनी त्यांना मार्गदर्शन करावे. -ह्या दिव्य मार्गदर्शक तत्त्वाचे अनुसरण करून आपण संपूर्ण जीवन एक चांगली व्यक्ती म्हणून व्यतीत करू.
खाली दिलेली अंतर्भूत मूल्ये मुलांच्या मनावर बिंबवावीत. गुरूंचे अनुसरण करा- वाईटास तोंड द्या – शेवटपर्यंत लढा द्या -खेळाची सांगता करा.
रावणाच्या मृत्युनंतर, रामाने लक्ष्मण, जांबवान, सुग्रीव आणि अंगदला बोलावले व नल,नील व इतरांना घेऊन बिभीषणाचा लंकाधिपती म्हणून राज्याभिषेक करण्यासाठी लंकेला जाण्यास सांगितले. रामाने रावणाचा पराभव केला ही सुवार्ता सीतेला देण्यासाठी रामाने हनुमानास तिच्याकडे पाठवले. लवकरच सीतेला पालखीतून रामाकडे आणण्यात आले.