रोल प्ले- आढावा

Print Friendly, PDF & Email

रोल प्ले- आढावा

Role Play

रोल प्ले हे असे तंत्र आहे ज्यामधून मुले दिलेल्या प्रसंगावर विचार करण्यास व नंतर ते प्रसंग नाट्यरुपात सादर करण्यास शिकतात. यामुळे मुलांना दुसरे ज्या परिस्थितीमध्ये आहेत ती परिस्थिती समजून घेण्यास व त्यांच्या भावना जाणून घेण्यास मदत होते. यामुळे सर्जनशील विचारांना चालना मिळते. आणि आत्मविश्वास वाढतो.

रोल प्ले अनेक प्रकारचे असू शकतात:
  1. प्रसंग साध्या अभिनयातून साकारणे.
  2. केवळ हावभाव (न बोलता हावभावातून प्रसंग सादर करणे).
  3. रेडियो प्ले (दुसरे केवळ ऐकू शकतील अशा प्रकारे प्रसंग सादर करणे)
  4. आणि आपल्या कल्पनेनुसार आपण यात अनेक वैविध्ये आणू शकतो.
रोल प्लेची पद्धत:

ज्या मुलांसाठी रोल प्ले हा प्रकार नवीन आहे ती मुले दिलेला प्रसंग नाट्यरुपात सादर करून सुरुवात करू शकतात. त्यांचा आत्मविश्वास जरा वाढला की ते गोष्टीचा निष्कर्ष आयत्या वेळी रचू शकतात किंवा गोष्टीचा निष्कर्ष त्यांना शेवटी जो मुद्दा मांडायचा आहे त्यानुसार बदलू शकतात.

अभिवृत्ती चाचणी आणि रोल प्ले यामधील फरक:

अभिवृत्ती चाचणीमध्ये मुलांना अनेक प्रसंगांची यादी दिली जाते आणि मुलांना प्रत्येक गोष्टीवर विचार करण्यास सांगितले जाते. ‘रोलप्ले’ मध्ये मुलांना एकच प्रसंग नाट्यरूपात सादर करायचा असतो. समजा आपण ‘प्रामाणिकता’ हे मूल्य विचारात घेतले असेल तर आपण मुलांना असे सांगू शकतो की त्यांनी असा एखादा प्रसंग सादर करावा जेव्हा प्रामाणिकता हे मूल्य आचरणात असताना मुलांची द्विधा मनस्थिती होऊ शकेल. उदा. मुले पुढील प्रसंग सादर करू शकतील:

  • उपाय अथवा तोडगा न देता समस्या मांडणे: उदा. काय करावे असा विचार मुलगा करत आहे. परिक्षेमध्ये लबाडी करावी की करू नये?
  • वर्तणुकीचे उदाहरण मांडावे उदा- मूल परिक्षेमध्ये लबाडी करत आहे.
  • जे योग्य वर्तन असले पाहिजे ते दाखविणे उदा.-लबाडी करण्याच्या संधी मिळूनही मूल प्रामाणिकपणेच वागते.

वरील सर्व प्रसंगांमध्ये रोल पेक्षा त्याचे विश्लेषण अधिक महत्त्वाचे आहे. व्यक्तीने प्रामाणिकता या मूल्याचा स्वीकार का केला पाहिजे आणि प्रत्येक प्रसंगी हे मूल्य का उचलून धरले पाहिजे हे विश्लेषणामधून दिसून येते. जर मुलांचे अजून मोठे गट असतील तर आपोआप प्रामाणिकता या मुल्याशी निगडित असे अजून विविध प्रसंग सादर करून त्याचे विश्लेषण करू शकू यामुळे या मुल्याचे महत्त्व व ते प्रत्यक्ष जीवनात उतरविणे हे अधिक चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल.

एखादे ठराविक मूल्य स्पष्ट करून सांगणारे रोल प्ले पुढील प्रमाणे सादर करता येतील:
  1. शिक्षकांनी मुलांना एखादा प्रसंग द्यावा व मुलांना तो नाट्यरुपात सादर करण्यास सांगावा.
  2. शिक्षकांनी मुलांना केवळ एक मध्यवर्ती कल्पना द्यावी व मुलांना त्यावर आधारित प्रसंग बसविण्यास सांगावा.
  3. प्रत्येक गटाने एक मूल्य निवडावे व त्यावरील कल्पना आणि प्रसंग त्यांनीच ठरवावा.
पायऱ्या:
  1. विषय निवडल्यावर चार ते पाच मूल्यांचा किंवा सोयीनुसार कमी-अधिक मुलांचा एक,असे मुलांचे गट करावेत प्रत्येक गटाला एकच मूल्य उदा. प्रामाणिकता हे मूल्य देऊन त्यांना त्यावर प्रसंग सादर करण्यास सांगावे. एक- दोन गटांना घरातले प्रसंग घेण्यास सांगावे, काही गटांना शेजारच्यांशी संबंधित प्रसंग घेण्यास सांगावे सर्व गटांना रोल-प्ले ची तयारी करण्यासाठी साधारण १० मिनिटे द्यावीत.
  2. प्रत्येक गटाला आपला रोल प्ले सादर करण्यास सांगावा. सांगावा. एखादा गट रोल प्ले सादर करत असताना इतर गट नीट लक्ष देऊन ऐकत आहेत नं, ते पहावे. प्रत्येक रोल- प्ले झाल्यानंतर सादर केलेल्या प्रसंगामध्ये प्रामाणिकता या मुल्याची गरज का होती हे समजण्यासाठी रोल-प्लेचे विश्लेषण करावे. पुढे दिलेले प्रश्न विचारुन देखील रोल-प्लेचे -विश्लेषण करता येईल.
    • या रोल प्ले मधील पात्रे त्यांच्या रोल प्ले मध्ये अशा प्रकारे का वागली?
    • त्यांचे असे वागणे बरोबर होते असे तुम्हाला वाटते का?
    • या प्रसंगामध्ये या पात्रांच्या समोर दूसरा कोणता मार्ग होता?

येथे या गोष्टीची नोंद घ्यावी की अशा प्रकारचे विश्लेषण करताना (रोल प्ले किंवा अभिवृत्ती चाचणीचे) बालविकास गुरुने हे लक्षात घ्यावे की त्याने/तिने स्वतःची मते मुलांवर न लादता विश्लेषण सुकर होण्यास केवळ मदत करावी आणि मुलांनी स्वतःचे स्वतःच विश्लेषण करून योग्य निर्णयाप्रत यावे. यासाठी मुलांना हळुवारपणे मार्गदार्शन करावे.

रोल- प्ले चे फायदे:
  1. आत्मविश्वास वाढतो
  2. सर्जनशील वृत्ती वाढते.
  3. मुले एकमेकांना सहकार्य करण्यास शिकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: