पहिल्या गटाच्या वर्ग उपक्रमाचा नमुना

Print Friendly, PDF & Email

वर्गामध्ये हा उपक्रम कसा करावा?

स्तब्ध बैठकीने सुरुवात करा. प्रार्थना, मार्गदर्शनानुसार कल्पित चित्र डोळ्यापुढे आणणे, ह्यांच्याद्वारे डोळे मिटून १ ते २ मिनीटे शांतता पाळणे.

एक विषय निवडा. विषय एक शब्दाचा असावा. फळ्याच्या मधोमध तो शब्द लिहावा. तो शब्द मुलांच्या वयाला शोभेलसा, आवडेल असा, असावा. त्यांना तो शब्द आणि त्याचा अर्थ माहित असेल असा शब्द निवडावा. प्रेम, शांती, सचोटी इ. सारखे भाववाचक शब्द निवडण्याचे टाळावे. तो शब्द मूर्तस्वरुप असावा. आपण म्हणू आपण रंग शब्द निवडला.

जेव्हा मुलांनी रंग ह्या शब्दाचा विचार केला तेव्हा त्यांच्या मनात आलेल्या सर्व शब्दांची नावे आपण त्यांना विचारुया. त्यांनी सांगितलेली सर्व शब्द फळ्यावर/ त्यांच्या वह्यांमध्ये लिहा. शब्दांचे आयोजन करु नका वा त्यांना आकडे घालू नका. खाली दिलेल्या नमुन्यासारखे मुले ‘रंग’ ह्या विषयाशी संबंधित शब्दांची संपूर्ण मालिका प्रस्तुत करतील. सर्व मुलांना ह्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा. त्यातील काही शब्द असंबध्द वाटतील. त्यावेळी मुलांनी हे शब्द का निवडले हे गुरुंनी त्यांना सौम्य शब्दात विचारावे. शब्द केवळ मुलांकडूनच आले पाहिजेत. ह्याची कृपया नोंद घ्यावी.

मनाचे मापन आणि वेब चार्टिंग (तक्ते बनवणे) सर्व गटांना connect व्हायला व शब्दांची वर्गवारीमध्ये विभागणी करायला सांगा. म्हणजे त्यांना योग्य वाटेल अशा विविध शीर्षकाखाली शब्दांचे गट बनवायला सांगा. उदा.-सहजगत्या यादि बनवलेले वरील शब्द खाली दिलेल्या शीर्षकाअंतर्गत वर्गीकृत करु शकता.

  • सर्व गटांना connect व्हायला व शब्दांची वर्गवारीमध्ये विभागणी करायला सांगा. म्हणजे त्यांना योग्य वाटेल अशा विविध शीर्षकाखाली शब्दांचे गट बनवायला सांगा. उदा.-सहजगत्या यादि बनवलेले वरील शब्द खाली दिलेल्या शीर्षकाअंतर्गत वर्गीकृत करु शकता.

आता वर्गातील मुलांच्या संख्येनुसार त्यांचे ५/६/७ मुलांचा एक गट असे गट बनवा. आणि वर ठरवलेल्या वर्गीकरण/शीर्षकावर आधारित मुलांना एक वेब चार्ट (तक्ता) बनवायला सांगा.

५) जेव्हा प्रत्येक गटाचा वेब चार्ट (तक्ता) तयार होईल तेव्हा त्यांना तो वर्गामध्ये सादर करण्यास सांगा. आता त्यावर चर्चा करा आणि संपूर्ण वर्गासाठी एका वेब चार्टवर (एका तक्त्यावर) या. अनुभवजन्य शिक्षणातील पुढील पातळीवर जाण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा आहे.

अंतिम वेब चार्ट असा दिसतो.

[वर्ग उपक्रमातील टप्पे: प्रशांती निलयम येथे जानेवरी २००९ मध्ये गट १ आणि २ साठी झालेल्या ” The Master Trainers” ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दरम्यान डॉ. पित्रे त्यांच्या ” अनुभवजन्य शिक्षण ” ह्यामधून घेतले आहेत. ]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: