मानवसेवा हीच ईश्वर सेवा
मानवसेवा हीच ईश्वर सेवा
कोणे एके काळी एक थोर ख्रिश्चन संत जेरुसलेमला आला होता. दररोज लांबलांबून लोक त्याचे दर्शन घेण्यासाठी व आशीर्वाद मिळवण्यासाठी येत असत.
जेरुसलेमजवळ असलेल्या एका खेड्यात एक अत्यंत धार्मिक म्हातारी राहत होती. ती इतकी अशक्त व हडकुळी होती की तिच्या घरातही ती केवळ काठीच्या आधाराने काही पावलेच कशीबशी टाकीत असे. तिच्या घरावरूनच पुरुष, स्त्रिया आणि मुलांची जेरुसलेमच्या रस्त्यावर रीघ लागलेली ती रोजच्या रोज पाहात असे. तिच्याही मनात त्यामुळे विचार आला. “मरण्यापूर्वी जेरुसलेमच्या रस्त्यावर जाता जाता जरी मला मरण आले तरी देव माझ्यावर कृपा करील आणि माझा आत्मा स्वर्गात नेईल.”
थोड्या वेळाने तिने काही तरुण मुले व मूली तिथून जाताना पाहिली. ती त्या मुलांना विनवणीच्या स्वराने म्हणाली, “प्रिय मुलांनो! तुम्ही मला मदत करून तुमच्याबरोबर जेरुसलेमला न्याल का?” काही तरुणांनी तिच्याकडे रागाने टवकारुन करून पाहिले, काहींनी आश्चर्य व्यक्त करीत तिला वाकुल्या दाखवल्या तर इतर काही म्हणाले, “आजीबाई! तुम्हाला आमच्याबरोबर जेरुसलेमला नेण्याऐवजी आम्ही तुम्हाला तुमच्या थडग्याकडेच नतो की” यावर सगळे तिला मोठ्याने, कुचेष्टेने हसले आणि पुढे रस्त्याला गेले.
या नंतर आणखी थोड्या वेळाने एक तरुण धर्मगुरु त्या रस्त्याने आला. मोठ्या आशेने म्हातारीने त्यालाही हाक मारली, “प्रिय बंधो। कृपा करुन मला तुझ्या्रोबर जेरुसलेमला घेऊन जाशील का?” तो दयाळू धर्मगुरु म्हातारीजवळ आला आणि म्हणाला, “आजी, तुम्ही काही काळजी करु नका. तुम्ही माझ्या मस्तकाचा आधार घेऊन माझ्या खांद्यावर बसू शकाल मी अगदी आनंदाने तुम्हाला जेरुसलेमला घेऊन जातो पाहा!”. सगळे त्या पवित्र गावी पोहोचले. एका व्यासपीठावर एक महात्मा संत बसला होता व त्याच्या भोवती हजारो लोग गोळा झालेले त्यानी पाहिले. जी मुले ठेगणी होती त्याना काही तो महात्मा दिसेना. कारण मोठया लोकाच्या पाठी आड येत होत्या. त्यामुळे प्रत्येकाने एकमेकांच्या खांद्यावर चढायचे आणि महात्म्याचे दर्शन घ्यायचे असे ठरविले. प्रथम एका मुलाने आपल्या मित्राध्या खांद्यावर चढून महात्माचे दर्शन घेतले तो त्याला धक्काच बसला. कारण त्या महात्म्याच्या जागी जेरुसलेमला येताना रस्त्यात ज्या म्हातारीची त्यांनी टर उडविली होती तिचा सुरकुतलेला, पांढऱ्या केसांचा चेहरा त्याला दिसला.
त्याने पुनः पुन्हा आपले डोळे चोळले पण त्याला सतत तोच सुरकुतलेला, पांढऱ्या केसांचा चेहरा त्याच्याकडे पाहून हसतांना दिसला. “मला महात्मा संत दिसत नाहीये” तो ओरडला, “त्याच्या जागी आपण जिला रस्त्यावर सोडून आलो ती म्हातारी आजीबाई दिसते आहे. “प्रत्येकाने नशीबाची परीक्षा पाहिली आणि सगळयांना तोच तो अनुभव आला त्या दयाळु धर्मगुरुचा अनुभव मात्र वेगळा व तितकाच अद्भुत होता. त्या महात्म्याने आशीर्वादासाठी हात उभारलेला असताना त्या तरुण धर्मगुरूला त्या महात्म्याचे स्पष्ट व संपूर्ण दर्शन घडले. इतकेच नव्हे तर काही काळ त्याला असे वाटले की खांद्यावर बसलेल्या म्हातारीच्या ऐवजी तो महात्माच बसलेला आहे. आणि तो आपल्याला आशीर्वाद देत आहे. सर्व स्वर्गीय शांती व आनंद आपल्या हृदयात शिरत आहे असे त्याला वाटले. खरोखरच जेरूसलेमला आलेल्या त्या वर्षीच्या यात्रेकरूंमध्ये तो परम भाग्यवान ठरला कारण देवाची मुले म्हणून तो देवाइतकेच सगळ्यांवर प्रेम करत होता.
प्रश्न:
- जेरुसलेमला जाण्यासाठी म्हतारीला मदत करण्याचा निर्णय धर्मगुरुने का घेतला?
- म्हातारीला जेरुसलेमला घेऊन जाण्यासाठी तरुण मुलांमुलींनी नकार का दिला? त्याचा परिणाम काय झाला?
- समजा, तुम्ही त्या तरुण मुलांमध्ये असता, तर तुम्ही काय केले असते?